टेक मराठी दिवाळी अंक – २०१७

नमस्कार,

तर आम्ही पुन्हा सज्ज झालो आहोत या वर्षीच्या अंकासाठी. तुम्हीही उत्सुक असालच!!

“टेक मराठीचा” दिवाळी अंकाचे हे ४थे वर्ष! टेक मराठीच्या वाचकांनी व लेखकांनी नेहमीच टेक मराठीवर प्रेम केलं आणि त्याची पावतीम्हणजे गेले ३ वर्ष चालू असलेला दिवाळी अंक खूप जणांनी वाचला, अभिप्राय कळवले. चांगलं सांगितलं तसंच वाईटही सांगितलं. या प्रवासात आम्हाला साथ दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार!

आम्हाला मागे आलेल्या सुचनेप्रमाणे या वर्षी लेखकांसाठी काही विषयांची यादी देत आहोत. विषय हेच हवेत असे नाही पण एक संदर्भ म्हणून तुम्ही यातले काही निवडू शकता. काही वेगळे लिहायचे असेल तर स्वागतच आहे,फक्त तो टेक्नोलॉजीशी निगडीत असावा.

विषय :

 • Linux: घडामोडी, सिक्युरिटी फीचर्स, कसे निवडावे
 • एमबेडेड सिस्टम्स 
 • आपल्या क्षेत्रातील टेक्नोलॉजी : Bio- medical,bio-chemistry, environment engineering, agriculture, social sector, education, health, food  etc.
 • Cryptocurrency
 • BitCoin
 • BlockChain
 • Artificial Intelligence
 • E-waste
 • काही उपयुक्त मोबाईल ऍप्स 
 •  Cyber crimes
 • Smart City
 • Robotics
 • CMS

हे विषय अगदी व्यापकदृष्ट्या लिहिले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लिहू शकता

बाकी नियमावली माहिती आहेच, तरी खाली देत आहे.

हे लेखन विनोदी, माहितीपर, अनुभव कथन, लघु कथा, लेखमाला  अशा कोणत्याही सदरात असावेत.

आपले लिखाण ई स्वरूपात आमच्याकडे पाठविण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टो. २०१७ आहे. 
तुम्ही जर वेब साईट करणे, डिझाईन  करणे यामध्ये मदत करू इच्छित असाल तर आम्हाला जरूर कळवा.

नियमावली :

 •  लेखांसाठी शब्दमर्यादा २०० पासून पुढे  कितीही :)
 •  दिवाळी अंकासाठी साहित्य रविवार ८ ऑक्टो, २०१७ पर्यंत पोहोचले पाहिजे.
 •  दिवाळी अंकासाठी स्वलिखित आणि संपूर्णपणे अप्रकाशित साहित्य पाठवावे.
 • साहित्य सॉफ्ट-कॉपीस्वरूपात आणि देवनागरी लिपीमध्येच पाठवावे. देवनागरीत नसलेले साहित्य स्वीकारले जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
 •  साहित्य पाठवताना ते शक्यतो व्याकरणाच्या आणि शुद्धलेखनाच्या नियमांत बसेल असे पाहावे.
 •  साहित्य स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे सर्वाधिकार संपादक मंडळ राखून ठेवत आहे. साहित्य नाकारण्याचे कारण किंवा स्पष्टीकरण देण्यास संपादक मंडळ बांधील नाही. याबाबत संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील.
 •  संपादक मंडळास पाठवलेल्या साहित्यात काही बदल करायचा असल्यास आधी संपादक मंडळाशी sampadak@techmarathi.com येथे संपर्क साधावा. एकच साहित्य पुनः:पुन्हा पाठवू नये.
 •  साहित्य मिळाल्याची पोच पाठवली जाईल. साहित्य सुपूर्त केल्यानंतर २४ तासांत पोच न मिळाल्यास संपादक मंडळाशी sampadak@techmarathi.com  येथे संपर्क साधावा.

दिवाळी अंकाबाबतीतील सर्व प्रश्न ,सूचना वा माहितीसाठी sampadak@techmarathi.com  येथे संपर्क साधावा.

गेल्या वर्षीच्या अंकाची लिंक : http://techmarathi.com/diwaliank2016/
धन्यवाद
 

टेक मराठी दिवाळी अंक २०१६ प्रकाशित

tm_coming_soon_4

नमस्कार,

दर वर्षीप्रमाणे यंदाही टेक मराठी दिवाळी अंक आपल्या भेटीस आला आहे. एकदम वेगळे विषय घेऊन. तर आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय याची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहोत.

हा अंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा ही विनंती.

अंक बघण्यासाठी क्लिक करा:

http://techmarathi.com/diwaliank2016

धन्यवाद!

 

निवेदन: दिवाळी अंक २०१६

नमस्कार मित्र,मैत्रीणींनो

टेक मराठी दिवाळी अंक २०१६ ची तयारी सुरु करण्याची वेळ आली आहे. तर उचला आपली लेखणी (ई -लेखणी) आणि लिहायला सुरुवात करा. जुन्या लोकांना तर माहिती आहेच काय लिहायचे आहे ते!

नवीन लोकांसाठी हे आवाहन:

या वर्षीच्या “टेक मराठी दिवाळी अंक २०१६” साठी लेख, कविता आणि कथा या स्वरूपात  टेक्नोलॉजी संदर्भात लिखाण पाठविण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत.

सदर लेखन लेख, कविता, विडंबनपर काव्य, चारोळी, व्यंगचित्र यांपैकी कोणत्याही साहित्यप्रकारात आणि  विनोदी, माहितीपर, अनुभव कथन, लघु कथा अशा कोणत्याही सदरात असावेत.

आपले लिखाण ई स्वरूपात आमच्याकडे पाठविण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टो. २०१६ आहे.

तुम्ही जर वेब साईट करणे, डिझाईन  करणे यामध्ये मदत करू इच्छित असाल तर आम्हाला जरूर कळवा.

नियमावली :

 • लेखांसाठी किमान शब्दमर्यादा २००
 • दिवाळी अंकासाठी साहित्य रविवार १५ ऑक्टो, २०१६ पर्यंत पोहोचले पाहिजे.
 • दिवाळी अंकासाठी स्वलिखित आणि संपूर्णपणे अप्रकाशित साहित्य पाठवावे. साहित्य सॉफ्ट-कॉपीस्वरूपात आणि युनिकोडमध्येच पाठवावे. युनिकोडमध्ये नसलेले साहित्य स्वीकारले जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
 • साहित्य पाठवताना ते शक्यतो व्याकरणाच्या आणि शुद्धलेखनाच्या नियमांत बसेल असे पाहावे.
 • साहित्य स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे सर्वाधिकार संपादक मंडळ राखून ठेवत आहे. साहित्य नाकारण्याचे कारण किंवा स्पष्टीकरण देण्यास संपादक मंडळ बांधील नाही. याबाबत संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील.
 • संपादक मंडळास पाठवलेल्या साहित्यात काही बदल करायचा असल्यास आधी संपादक मंडळाशी sampadak@techmarati .com येथे संपर्क साधावा. एकच साहित्य पुनः:पुन्हा पाठवू नये.
 • साहित्य मिळाल्याची पोच पाठवली जाईल. साहित्य सुपूर्त केल्यानंतर २४ तासांत पोच न मिळाल्यास संपादक मंडळाशी sampadak@techmarathi.com  येथे संपर्क साधावा.

दिवाळी अंकाबाबतीतील सर्व प्रश्न ,सूचना वा माहितीसाठी sampadak@techmarathi.com  येथे संपर्क साधावा.

 

स्मार्ट सिटी साठी सिस्टीम्स् थिंकिंग

[टेक मराठी दिवाळी अंकातील लेख आता टेक मराठी वेब साईटवर देखील प्रकाशीत होतील. यातील आजचा लेख
“स्मार्ट सिटी साठी सिस्टीम्स् थिंकिंग” -प्रशांत मिरजकर.]

 

” certification committee”  पैकी एक जण मंचावर येऊन बोलू लागला… कधी नव्हे ते प्रत्येकजण लक्षपूर्वक ऐकत होता….

प्रमाणपत्रात “नापास” हा शेरा पाहून सगळे चांगलेच वैतागले होते.४० जणांच्या गटामधे एकाच प्रमाणपत्रावर अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याचं शिक्कामोर्तब, ही संपूर्ण गट आणि कंपनीसाठीही मोठीच नाचक्कीची आणि संतापाची बाब होती आणि म्हणूनच ” certification committee”  ला पाचारण करण्यात आले होते. वक्ता बोलत होता….

”  systems thinking ” , प्रणालिबद्ध व्यवस्थेची मानसिकता यावर आपण ३ महिने तांत्रिक शिक्षण घेतलं आणि तुम्ही सर्वच जण आम्हांला प्रभावीपणे ते वापराल अशी खात्री वाटत होती.  “system thinking ”  ह्या विषयाचा हरेक पैलू या गटाला इत्यंभूत कळला आहे अशी आमची शिक्षक म्हणून धारणा होती.परंतु तसं अजिबातच नसल्याचं परिक्षांच्या दरमन्यान आमच्या लक्षात आलं. नाही … मला साक्षर , निरक्षर हा वाद घालायचा नाहीये… साक्षर तुम्ही जरूर आहात पण ”  systems thinking ”  च्या बाबतीत तुम्ही सुशिक्षित होऊ शकला नाहीत म्हणून हा निकाल. “मेक इन इंडिया / डिजिटल इंडिया” हे आपलं स्वप्न असेल तर वैयक्तिक दृष्ट्या   “systems thinking ”  च्या तत्वांचा वापर आपण कसा करू शकू याचं उत्तर “हे तर प्रशासन, सरकार, अधिकारी, यंत्रणा, व्यवस्था यांचं काम आहे” हे मिळणं म्हणजे आम्हाला आमचाच पराभव वाटू लागला… म्हणून खरं तर हा सगळा उहापोह… आज एक व्यक्ती म्हणून परत एकदा आपण सगळ्या गोष्टिंचा थोडक्यात विचार करू आणि इथे सगळेच  IT  मधून असल्याने तिथून सुरू करू…. एखाद्या कामात चूक ( bug)  सापडते म्हणजे नक्की काय होतं तर रचनेमधल्या एक किंवा अधिक गोष्टी अपेक्षित काम अपेक्षित पद्धतीने किंवा ठराविक वेळेत करत नाहीत. मग आपण रचनेचा आराखडा, त्याची अंमलबजावणी या सगळ्या गोष्टींचा विचार छोट्या छोट्या भागांपुरता आणि शेवटी सामाईकपणे पूर्ण यंत्रणा म्हणून करून ही चूक सुधारतो. आता या  IT  मधल्या प्रणालीचा रोजच्या आयुष्यात काय संबंध असा प्रश्न सगळ्या चेहऱ्यांवर दिसतो आहे; तर असा विचार करा की आपण आपली गाडी घेऊन फिरायला निघतो , माहित नसलेलं एखादं ठिकाण बघायला…. अशा वेळी आजकाल आपला सगळ्यात जवळचा वाटणारा मित्र किंवा राजू गाईड म्हणू आपण कोण असेल तर  GPS Tracker;  हा राजू गाईड आपण थांबलो की थांबतो, आपण पळू लागलो की पळतो आणि नुसता पळत नाही तर अजून बाकी असलेलं अंतर, आपल्या वेगानुसार तिथे पोहोचायला लागणारा वेळ, ही सगळी माहिती विनासायास पुरवत राहतो… पण विनासायास आपल्याला… हे सगळं बिनबोभाट घडतं कारण आपला मोबाईल किंवा गाडीमधला  GPS Tracker  , लाखो किलोमिटर दूर वसलेला उपग्रह, या दोन्हीला जोडणारे दुवे आपापलं काम नेमक्या वेळात, ठरलेल्या पद्धतीने, अथकपणे करतात म्हणून… यापैकी कुणीही समन्वयाचे भान सोडले की आपलं “जाते थे जापान पोहोंच गये चीन” असं काहीतरी व्हायचं… असंच काहीसं आपल्याला आनंद देणाऱ्या सगळ्या सुविधा ,  infrastructure, social media  यांचही…. सगळं कसं छान आहे.. प्रत्येक ”  system”  सतत माझ्या सेवेला हजर आहे

पण तरीही रोजच्या ट्रॅफिक ने वैताग येतोच, प्रदूषणाने छातीची आणि भ्रष्टाचाराने डोक्याची चाळण होतेच, पाण्याची बोंब आणि शेतात हरवलेले कोंब, प्रत्येक सरकारी कामात एजंट नाहीतर येरझाऱ्याचं बालंट, शिक्षणाच्या नावाखाली पोरांचे हाल आणि  AC में बैठके भी झडते हुए बाल :) … पण माझं काय संबंध नाही का या सगळ्याशी? मी काय करणार यात…. या सगळ्याचा त्या  bug concept  शी काय संबंध?

तर डोळे आणि डोकं पूर्ण उघडे ठेवून रोजच्या ”  systems  चा विचार करुया आणि त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे मी या  systems  चा कसा अविभाज्य घटक आहे याचा… ट्रॅफिक चा रोजचा विषय घेऊया… स्मार्ट ट्रॅफिक लाईट सिस्टीम आहे… पोलिसांची फौज तैनात आहेत… खड्डे असले तरी बऱ्यापैकी पक्के रस्ते आहेत…लेन ची शिस्त परिभाषित आहे… रेडिऒ ठराविक वेळाने शहरातले “ट्रॅफिक अपडेट” देत आहे… जवळ जवळ सगळ्या मुख्य रस्त्यांवर समांतर वाहनतळ व्यवस्था आहे… प्रत्येक रस्त्याची वेगमर्यादा नमूद केलेली आहे; एकेरी वाहतूक कुठे ,दुहेरी कुठे … सायकल मार्ग, पदपथ सगळं निश्चित आहे… तरीही रोज ट्रॅफिक सुरळीत नाही! मग ह्या  systems  मधे एवढे  bug  आले कुठून… कोणता घटक , कोणता दुवा गहाळ झालाय? याचं उत्तर ”  systems thinking ”  ची तत्वं वापरून शोधायचा प्रयत्न करूया…कधी गर्लफ्रेंड मागे बसली म्हणून तर कधी गाडीच लेटेस्ट आहे म्हणून..कधी ऑफिसला उशिर झाला म्हणून तर कधी वाऱ्याशी स्पर्धा करायची म्हणून हा “मी” कट मारतो…. उजवीकडे वळायचं  म्हणून डाव्या लेनमधून अचानक उजव्या लेनमधे घुसतो.रस्त्यात मित्र दिसला म्हणून गाडी हवी तिथे थांबवून गप्पा कुटतो. या गोष्टी “मी” वैयक्तिक पातळीच्या सुविधांसाठी केल्या तरी  system  म्हणून याचा परिणाम काय हा विचार “मी” करत नाही. यात एक घटकाने म्हणजे “मी” लेन या संसाधनाचा ( resource )  गैरवापर केल्याने इतर घटकांसाठी हे संसाधन योग्य प्रकारे उपलब्ध न झाल्याने यंत्रणेमधला समन्वय बिघडतो. याचा परिणाम म्हणून यंत्रणा अपेक्षेप्रमाणे चालत नाही आणि बिघडवणारा घटक “मी” मला सोडून यंत्रणेतील इतर सर्व घटकांना दोष देतो. रोजच्या आयुष्यामधल्या अगदी छोट्या गोष्टीचं हे उदाहरण आहे…

 

सहज आठवलं .. परवा एकदा एक चिमुकली बाबाच्या पाठीमागे बसून गुणगुणत होती …. “गंमत झाली, काल मला स्वप्न पडलं छानसं, हिरव्या लाल दिव्याचा आदेश पाळायला लागली माणसं”…पुढचं काही ऐकूच आलं नाही मग…. तर ह्याच “मी” ने  यंत्रणेचा भाग म्हणून “माझी” भूमिका चोख बजावली ..म्हणजे वेगळं काहीच नाही पण “माझी सोय” हा एकमेव विचार सोडून… ठरलेले नियम “माझ्यासाठी” आहेत म्हणून पाळले तर हेच चित्र अगदी उलट व्हायला किती वेळ लागेल? आणि मुळात वाहन चालवणे ही फक्त गरज पेक्षा आनंद देणारी कृती होईल असं वाटतंय का? माझा वेळ , इंधनासाठी लागणारा पैसा, मनाची शांती हे फक्त कुणीतरी केलेले नियम पाळल्याने मला मिळू शकतात.. इतकंच नाही तर माझ्याकडून अनाठायी वाया जाणारं इंधन वाचल्यामुळे जिथे पोहोचतच नाही अशा ठिकाणी कुणाला तरी मिळण्याची शक्यता माझ्यामुळे निर्माण होते… शहरासाठी बनवल्या गेलेल्या सुविधांचं आयुष्यमान वाढू शकतं… पर्यावरण रक्षण , भ्रष्टाचारावर रोख हे फायदे तर अगदी नाही बघितले तरी डोक्याचा भुगा करणारी वाळवी माझ्यातून काढली की कुठेच उरणार नाही हे तरी  “सिस्टीम्स थिंकर” म्हणवून घेणाऱ्या “मला” कळतंय का?

फक्त “प्रोफेशन” मधे नाही तर माझ्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक यंत्रणेचा “मी” हा सर्वात महत्वाचा घटक आहे आणि नागरिक म्हणून, या समाजाचा घटक म्हणून प्रत्येक रचनेमधल्या “माझ्या” भूमिका “मी” डोळसपणे निभावतो आहे आणि प्रत्येक संसाधन जाणिवपूर्वक वापरतो आहे, हेच “स्मार्ट” असल्याचं लक्षण आहे… “स्मार्ट सिटी” या संकल्पनेमधे तज्ञ “वीज , पाणी, वेस्ट मॅनेजमेंट, स्वच्छता, ई-गव्हर्नंस आणि अशा कित्येक गोष्टींचा विचार करत आहेतच”… परंतु “माझ्यासाठी यंत्रणा” हा विचार बदलून “मी यंत्रणा” हा विचार प्रत्येक नागरिकाचा नसेल तर हे स्वप्न… कल्पनाविलासाच्या पलिकडे जाऊन साकारणं केवळ अशक्य आहे… ’पिंडी ते ब्रह्मांडी’ हा निसर्गनियम आहे… आपले अवयव आपापलं काम अविरत करत आहेत म्हणून आपण निरोगी आयुष्य जगतो आहे. तसंच “मी” समाजाचा अवयव आहे मग मी हातावरलं बोट आहे की धडामधलं पोट हा विचार गौण ठरतो…  systems thinking  ही सवय रक्तात भिनली तर स्मार्ट सिटी हेच आपलं प्रमाणपत्र असेल… नाही तर कागद मिळवून पुढे जाणं इतकचं या कोर्सचं स्वरूप होईल… शेवटी हातावरच्या १० बोटांवर  systems thinking  ची व्याख्या मांडता येईल “हे जर व्हायचं असेल तर हे “मला” च करावं लागेल” ….

गेल्या ३ महिन्यात जे कळलं नाही ते मागच्या ३० मिनिटात मांडायचा प्रयत्न ” certification committee” ने केला आणि पुढच्या प्रवासाचा  systems thinkers  वर सुपूर्त केला.

प्रशांत मिरजकर.

प्रेसिडेंट, बायोऍनॅलिटिकल टेक्नोलॉजिज,पुणे.

 

प्रकाशन :टेक मराठी दिवाळी अंक २०१५

नमस्कार,

टेक मराठीचा यंदाचा दिवाळी अंक आज आम्ही प्रकाशित करीत आहोत. या वेळी “डीजीटल इंडिया” आणि “मेक इन इंडिया” या संकल्पनेवर आधारीत अंक प्रकाशित करीत आहोत.
हा अंक पाहण्यासाठी पहा: http://techmarathi.com/diwaliank
हा संपूर्णपणे ऑनलाईन प्रकाशित करीत आहोत जेणेकरुन आपल्या प्रतिक्रिया आपण यावर सहज नोंदवू शकता.

हा प्रयत्न आपल्याला आवडेल अशी आशा आहे. हा दिवाळी अंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा ही विनंती.

आपल्या मित्रांना, आप्तांना जरूर शेअर करा.
धन्यवाद!
 

टेक मराठी दिवाळी अंक २०१५

गेल्या वर्षी प्रथमच “टेक मराठीचा” दिवाळी अंक प्रकाशित झाला आणि अतिशय लोकप्रिय झाला.  आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार !

यावर्षी “डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया” अशी थीम घेऊन दिवाळी अंक आपल्या भेटीस येत आहे.

या वर्षीच्या “टेक मराठी दिवाळी अंक २०१५” साठी लेख, कविता आणि कथा या स्वरूपात  टेक्नोलॉजी संदर्भात लिखाण पाठविण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत.
हे लेखन विनोदी, माहितीपर, अनुभव कथन, लघु कथा अशा कोणत्याही सदरात असावेत. हे लेखन लेख, कविता, विडंबनपर काव्य, चारोळी, व्यंगचित्र यांपैकी कोणत्याही साहित्यप्रकारातील असावे.
आपले लिखाण ई स्वरूपात आमच्याकडे पाठविण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टो. २०१५ आहे.
तुम्ही जर वेब साईट करणे, डिझाईन  करणे यामध्ये मदत करू इच्छित असाल तर आम्हाला जरूर कळवा.

नियमावली :

 •  लेखांसाठी शब्दमर्यादा २००-२५०
 •  आपले लेख थीमशी सुसंगत असावेत मात्र त्यावरच असावेत अशी सक्ती नाही
 •  दिवाळी अंकासाठी साहित्य रविवार २५ ऑक्टो, २०१५ पर्यंत पोहोचले पाहिजे.
 •  दिवाळी अंकासाठी स्वलिखित आणि संपूर्णपणे अप्रकाशित साहित्य पाठवावे. साहित्य सॉफ्ट-कॉपीस्वरूपात आणि देवनागरी लिपीमध्येच पाठवावे. देवनागरीत नसलेले साहित्य स्वीकारले जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
 •  साहित्य पाठवताना ते शक्यतो व्याकरणाच्या आणि शुद्धलेखनाच्या नियमांत बसेल असे पाहावे.
 •  साहित्य स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे सर्वाधिकार संपादक मंडळ राखून ठेवत आहे. साहित्य नाकारण्याचे कारण किंवा स्पष्टीकरण देण्यास संपादक मंडळ बांधील नाही. याबाबत संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील.
 •  संपादक मंडळास पाठवलेल्या साहित्यात काही बदल करायचा असल्यास आधी संपादक मंडळाशी sampadak@techmarathi.com येथे संपर्क साधावा.
 • एकच साहित्य पुनः:पुन्हा पाठवू नये.
 •  साहित्य मिळाल्याची पोच पाठवली जाईल. साहित्य सुपूर्त केल्यानंतर २४ तासांत पोच न मिळाल्यास संपादक मंडळाशी sampadak@techmarathi.com  येथे संपर्क साधावा.

दिवाळी अंकाबाबतीतील सर्व प्रश्न ,सूचना वा माहितीसाठी sampadak@techmarathi.com  येथे संपर्क साधावा.

 

 

दीपिन लिनक्सची ओळख


टेक मराठी दिवाळी अंकातील लेख आता टेक मराठी वेब साईटवर देखील प्रकाशीत होतील. यातील आजचा लेख “दीपिन लिनक्सची ओळख !” लेखक : मंदार वझे

(सर्व प्रथम मी हे नमूद करू इच्छीतो की deepin linux चा उच्चार डीपिन आहे की दीपिन हे माहीत नाही. ह्या लेखामधे दीपिन असा उच्चार गृहीत धरला आहे)

दीपिन लिनक्स हे उबुन्टु लिनक्सवर आधारीत असून -चीनमधील कंपनीने deepin desktop environment (DDE) तयार केले आहे . DDE मुळे मात्र दीपिन लिनक्स फारच वेगळे झाले आहे.

उबुन्टुवर आधारीत असल्यामुळे, उबुन्टुवर उपलब्ध असलेले सर्व software दीपिनमधे आपोआपच उपलब्ध आहे,परंतू दीपिनमधे फक्त DDE हे एवढेच वेगळेपण नाही. दीपिन teamने दीपिन मूव्ही, दीपिन म्युझिक, दीपिन गेम असे पण software दीपिनमधे उपलब्ध आहे.

deepin linux 2

आपण एकेका software कडे बघुया:

DDE मधे वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम मधल्या चांगल्या गोष्टी घेतल्या आहेत. उदा. Windows 8 प्रमाणे उजव्या बाजूला control panel आहे. mouse उजवी कडील खालच्या कोपऱ्यात नेला असता control center अचानक प्रकट होते – ही hot corners ची किमया. चारी कोपऱ्यामधे mouse नेला असता कोणता program सुरू व्हावा हे तुम्हाला ठरवता येते.
OS X प्रमाणे dock आहे. dock वरून नेहेमी लागणारे programs सुरू करू शकतो. ह्याशिवाय dock चा उपयोग window task bar आणि system tray सारखापण होतो.

नेहेमीच्या मेन्यू ऐवजी इथे लाँचर आहे. super key (विंडोजचा लोगो असलेली key)दाबून लाँचर चालू करता येतो. लाँचर उघडला की वेगवेगळ्या ग्रुप्स मधे वेगवेगळे programs आहेत (Internet, Games, Productivity, Utilities, System वगैरे) जर तुम्हाला कुठला program हवा आहे ते माहीत असेल,तर super key पाठोपाठ program चे नाव type करा. उदा. तुम्हाला calculatorकिंवा text editor (gedit) चालू करायचे असेल तर Utilities ग्रूप शोधायची गरज नाही – super key पाठोपाठ calc किंवा edi इतके टाईप केलेत की calculator किंवा text editor एवढेच program दाखवले जातात.

दीपिन टर्मिनल हा अजून एक मला आवडलेला program.(पण जर तुम्हाला टर्मिनल वापरायची गरज पडत नसेल तर कदाचीत तुम्हाला काही फरक पडणार नाही.)

दीपिन screenshot हा अजून एक अतिशय उपयुक्त program. लाँचर मधून किंवा Ctrl+Alt+A ह्या शॉर्टकटने चालू करता येतो – मग तुम्हाला हव्या त्या भागाचा screenshot घेता येतो . पण इतकेच नाही, त्यानंतर गरज असल्यास, त्या screenshot वर काही बाण, चौकोन वगैरे करून screenshot जास्त उपयुक्त करता येतो.

ह्या लेखात दीपिन लिनक्सची फक्त ओळख इतकेच असल्यामुळे जास्त विस्तारात जात येत नाही, परंतु जाता जाता एक नक्की सांगू इच्छीतो की ज्या लोकांनी मला दीपिन लिनक्स वापरताना super+tab वापरताना बघीतलं आहे त्या प्रत्येकाने “हे काय, windows मधे असे करता येते का?” असे हमखास विचारलेले आहे :)
super+tab वापरून मला चालू असलेल्या वेगवेगळ्या programs मधे जाता येते. windows मधे जर आपण alt+tab वापरले असेल, तर आपल्याला super+tab नक्की आवडेल.

 

deepin linux1

दीपिन लिनक्स परीपूर्ण आहे का? तर “नक्कीच नाही” असेच म्हणावे लागेल. दीपिनची २०१४ edition जरा unstable होती, त्यात देवनागरी लिपीचा चांगला support नव्हता, पण २०१४.१ मधे खूप सुधारणा केल्या आहेत. देवनागरी लिपीचा support सुध्दा ibus द्वारे आहे (हा लेख मी दीपिन २०१४.१ वापरून लिहिला आहे )
अजून एका बाबतीत सुधारणेला वाव आहे – तो म्हणजे भाषेचा अडसर. दीपिन चीनमधे विकसीत केले गेले असल्या मुळे, बहुतांशी माहिती chinese मधेच आहे. पण दीपिन विकसीत करणाऱ्या लोकांना हा प्रश्न माहीत आहे – त्यांचे कर्मचारी इंग्रजीचं प्रशिक्षण घेत आहेत.

दीपिन लिनक्सबद्दल अधिक माहिती :http://www.linuxdeepin.com/index.en.html
स्क्रीनशॉटस : http://www.linuxdeepin.com/feature2014.en.html
इंग्लीश फोरम : http://www.linuxdeepin.com/forum/8

 

अ अ अॅन्ड्रॉईड चा !


टेक मराठी दिवाळी अंकातील लेख आता टेक मराठी वेब साईटवर देखील प्रकाशीत होतील. यातील आजचा लेख ” अ अ अॅन्ड्रॉईड चा !” लेखक : मंदार नाईक

ई-दिवाळी अंक डाउनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.कोणे एके काळी, जेव्हा मी पुण्यनगरी मध्ये माझा स्वत:चा व्यवसाय सुरु केला, तेव्हा माझ्याकडे एक मोठ्ठा संगणक होता, ज्याने एक आख्खं टेबल व्यापलं होतं. त्याला आम्ही ‘डेस्कटॉप पीसी’ असं म्हणायचो. (अजूनही म्हणतो) त्याला एक डायल अप इंटरनेट कनेक्शन जोडलेलं होतं. जोडीला एक घरचा दूरध्वनी. मी बाहेर कुठे मीटिंग ला गेलो, की नेमके घरी फोन येणार, घरचे बिचारे लोक निरोप लिहून घेणार, मी पुन्हा घरी आलो की, मी ते निरोप वाचून डेस्कटॉप पीसी चालू करून ई-मेल वाचणार, असं आयुष्य निवांत होतं.

मग आले लॅपटॉप. ते बॅगमध्ये ठेवले, की कुठेही घेऊन जा, आणि तिकडे बसून काम करा. यांना एक वाय फाय कनेक्शनची सोय होती. म्हणजे, जिथे मी जायचो, तिथे वाय-फाय इंटरनेट असलं, आणि त्याचा पासवर्ड त्या लोकांनी मला दिला, तर मी कुठेही ई-मेल पाहू शकायचो. जोडीला आले पेजर, मग मोबाईल. आता लोक मला कुठेही गाठायला लागले. कामाची बोलणी विनाविलंब व्हायला लागली.

पण नुसतीच बोलणी व्हायची. एक तर प्रत्येक ठिकाणी लॅपटॉप घेऊन जाणं अजूनही खूप अवघड होतं, आणि त्यात घेऊनही गेलो, तरी प्रत्येक ठिकाणी वाय फाय इंटरनेट मिळेलच याची शाश्वती नाही !

जेव्हा वर्षोनुवर्षे जगभर खूप लोकांना ही समस्या सतावू लागली, तेव्हा त्यातून एक विचार पुढे आला, मोबाईल वरच इंटरनेट, ई-मेल, डेटा फाईल्स, इत्यादी सगळं मिळालं तर? म्हणजे फोन सुद्धा, आणि काम सुद्धा, दोन्ही एकत्र !

आणि ही कल्पना वस्तुस्थितीत आली साधारणत: एकोणीसशे नव्वद च्या दशकात, जेव्हा आय बी एम, मायक्रोसॉफ्ट, नोकीया, सॅमसंग इत्यादी कंपन्यांनी Palm OS, Symbian, Windows CE, Bada अशा ऑपरेटिंग सिस्टिम्स वापरून मोबाईल आणि पी.डी.ए. (Personal Digital Assistant) नामक मोबाईलची सुधारीत आवृत्ती बाजारात आणली.

साधारणत: विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्टची Windows Mobile OS, ब्लॅकबेरी लिमिटेडची Blackberry OS अशा अनेक सुधारीत ऑपरेटिंग सिस्टिम्स बाजारात आल्या.

मोबाईलच्या क्षेत्रात क्रांती घडवली ती स्टीव जॉब्स यांनी. सन २००७ ला अॅपल कंपनीनं iPhone नामक ‘स्मार्टफोन’ बाजारात आणला. iPhone नं मोबाईल मार्केट हलवून सोडलं. iPhone हा screen touch interface नं काम करणारा जगातला पहिला मोबाईल फोन. या screen touch interface मुळे मोबाईलवर काम करणं सामान्य लोकांसाठी कितीतरी पटीनं सोप्पं झालं.

मोबाईल जगतातील पुढची क्रांती अॅन्डी रुबीन यानं गुगलच्या साथीनं घडवली. त्यानं अॅन्ड्रॉईड  ही Open source ऑपरेटिंग सिस्टिम बाजारात आणली. या आधीच्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टिम्स या पेड लायसन्स प्रकारात मोडणा-या होत्या, म्हणजेच त्यांचे पैसे येन केन प्रकारेण ग्राहकाला पडायचे. Open source license खाली येणा-या सिस्टिम्स ग्राहक एकही पैसा खर्च न करता (चकटफू) वापरू शकतो. या कारणानं अॅन्ड्रॉईड  वापरणारे डिव्हाईसेस (मोबाईल, टॅबलेट इत्यादी) खूप कमी दरात ग्राहकांना मिळू लागले.

Android

भारत हा काटकसरी लोकांचा देश आहे. भारतीय मार्केट हे सगळ्या जगात ‘चोखंदळ’ म्हणून प्रसिद्ध आहे. भारतीय लोक एखादया वस्तूची उपयुक्तता, गुणवत्ता, आणि किंमत याची योग्य ती सांगड घालून खरेदी करतात. अॅन्ड्रॉईड च्या आधी असलेलं जागतिक स्मार्टफोन मार्केट उपयुक्तता आणि गुणवत्ता यात आघाडीवर होतं, पण किंमती भरमसाट असल्यानं ते भारतीय ग्राहकाला पटवण्यात फारसं यशस्वी झालं नाही. पण अॅन्ड्रॉईड नं यात चांगलीच मुसंडी मारली.

आज जागतिक स्मार्टफोन बाजारातला ८० टक्के, तर भारतीय बाजारातला ९० टक्क्यांच्या वर हिस्सा फक्त एकटया अॅन्ड्रॉईड नं व्यापला आहे, यावरून अॅन्ड्रॉईड ची ग्राहाकांवरची पकड स्पष्ट दिसून येते.

सॅमसंग, झोलो, मायक्रोमॅक्स, लेनोव्हो इत्यादी आघाडीवरच्या स्मार्टफोन बनविणा-या कंपन्या अॅन्ड्रॉईड  वापरत आहेत. एवढंच नाही, तर आता गुगल ग्लास, गुगल टेलिव्हिजन इत्यादी डिव्हाईसेस वर सुद्धा अॅन्ड्रॉईड  वापरली जात आहे. यावरून अॅन्ड्रॉईड चा व्यापक वापर आणि उपयुक्तता सहज लक्षात येते.

अॅन्ड्रॉईड ची एक गम्मत म्हणजे इंग्रजी अक्षर A पासून सुरु होऊन त्याची पुढची व्हर्जन्स आता K पर्यंत आली आहेत, आणि यातली C पासून पुढची सर्व नावं म्हणजे खाण्याच्या गोष्टी आहेत. Alpha, Beta, Cupcake, Donut, Eclair, Froyo, Gingerbread, Honeycomb, Ice cream sandwich, Jelly bean, Kit Kat ही अॅन्ड्रॉईड ची नावं. तोंडाला पाणी सुटलं लिहितांनाच !

असं काय आहे या अॅन्ड्रॉईड  मध्ये की जनमानसाची एवढी पकड यानं घेतलीये? पाहुया अॅन्ड्रॉईड चे काही वैशिष्टये.

फोन संभाषण (Telephonic features) – अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम voice call, video call, conference call इत्यादी संभाषण सुविधा पुरवते.

मेसेजिंग (messaging) – अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम SMS (Short Messaging Service) आणि MMS (Multimedia Messaging Service) दोन्हीला सपोर्ट करते.

इंटरनेट कनेक्टीव्हीटी (Internet connectivity) – अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम वाय-फाय द्वारे इंटरनेट कनेक्शन वापरू शकते. शिवाय, आपण आपल्या सर्व्हिस प्रोव्हायडरला (Idea, Airtel, BSNL etc.) सांगून आपल्या सीम कार्ड द्वारे डेटा कनेक्शन प्लॅन अॅक्टिवेट करू शकतो, ज्या द्वारे आपल्याला 2G अथवा 3G सर्व्हिस अॅन्ड्रॉईड  मध्ये वापरता येते. (2G चा स्पीड कमी असतो, पण 3G चा स्पीड जास्त असला तरी त्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते हे लक्षात घेऊन जेथे इंटरनेट स्पीड खूप जास्त गरजेचा आहे तेथेच 3G वापरणे कधीही सोयीस्कर ठरते.)

अॅप्स (APPs) – स्मार्टफोनवर वापरल्या जाणा-या प्रोग्रॅम्सना अॅप्स म्हणतात. अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये आपण अनेक उपयुक्त अॅप्स गुगलच्या गुगल प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करू शकतो, आणि वापरू शकतो. यामध्ये अनेक वर्तमानपत्रे, social networking APPs, गेम्स, इत्यादींचा समावेश होतो. यापैकी काही अॅप्स हे पूर्णपणे फुकट असतात, तर काहींना पैसे पडतात.

मल्टी टास्कींग (Multitasking) – अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम एकाच वेळेला अनेक अॅप्स वापरण्याची सोय देते. यापैकी एक अॅप हे स्क्रीनवर असते, तर बाकीचे लपलेले (hidden) असतात, ज्यांना ग्राहक एका पूर्वनियोजित कृतीने कधीही पाहू शकतो, आणि ते पुढे चालू ठेवू शकतो.

गुगल सर्च (Voice based Google search facility) – अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये आपण बोलून सुद्धा अनेक गोष्टी शोधू शकतो. उदाहरणार्थ, “शनिवार वाडा” असं बोलल्यास अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम आपल्याला शनिवार वाडा असलेलं ठिकाण, त्याची माहिती, तेथपर्यंत जाण्याचा रस्ता, जायला लागणारा वेळ, इत्यादी सर्व माहिती पुरवते.

गुगल नेव्हिगेशन (Google navigation) – यामध्ये आपण दोन ठिकाणांना जोडणारे रस्ते शोधणे, त्यांमधील अंतर शोधणे, जवळची सार्वजनिक ठिकाणे (बस थांबा, खानावळ, शाळा) शोधणे, आपण आत्ता कुठे आहोत हे GPS (Global Positioning System) च्या सहायाने बघणे इत्यादी सुविधा आपल्याला वापरता येतात.

गुगल कॅलेंडर (Google calendar) – यामध्ये आपण आपले इव्हेंट्स, सुट्ट्यांचे दिवस, वाढदिवस इत्यादी पाहू शकतो, आणि त्यांचे रीमाईन्डर्स लावू शकतो.

एकाच गुगल अकाऊंटने सगळं काही (One Google account for all) – अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम ग्राहकाचा एक गुगल अकाऊंट घेते, आणि तोच एक अकाऊंट गुगलच्या विविध सर्व्हिसेस करता वापरते. उदाहरणार्थ, Google mail (ज्यामध्ये आपले ई-मेल्स व फोन कॉन्टॅक्टस् साठवले जातात), Google Maps (ज्यामध्ये आपण आपली घर व कचेरीची ठिकाणे साठवू शकतो, व वेळेला त्याचा उपयोग नेव्हिगेशन करता करू शकतो), Google Keep (ज्यामध्ये नोट्स साठवल्या जातात), Google Play (जेथून अॅप्स डाऊनलोड केले जातात), Google Drive (आपल्या फाईल्स करता ऑनलाईन स्टोअर) इत्यादी. एक अजून चांगली सुविधा म्हणजे, आपल्या स्मार्टफोनवर वापरलेल्या अकाऊंटद्वारे ही माहिती गुगल सर्व्हर वर साठवली जाते, जी आपण आपल्या डेस्कटॉप / लॅपटॉप वर सुद्धा कधीही वापरू शकतो, अगदी आपला स्मार्टफोन जवळ नसतांना सुद्धा आपले सगळे ई-मेल्स, फोन कॉन्टॅक्टस् इत्यादी  सर्व आपल्याला सहज मिळते.

प्रादेशिक भाषा वापर (Multi language support) – अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिममध्ये आपण अनेक प्रादेशिक  भाषांचा वापर करू शकतो. आपल्या मातृभाषेत संदेश (SMS) पाठवण्याचा आनंदच काही वेगळा !

वापरातील सुलभता (Accessibility) – कमी अथवा न ऐकू येणा-या, कमी अथवा काहीच न दिसणा-या व्यक्तींकरता अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम काही सुलभ सुविधा देते. यामध्ये स्क्रीनवर बोट टेकवल्यास आपण काय क्रिया करणार आहोत, याची आगाऊ सूचना देणे, केलेली क्रिया ग्राहकाला ऐकवणे, स्क्रीन वरील अक्षरे मोठी दाखवणे, स्क्रीनचा प्रकाश वाढवणे इत्यादी  सुविधा येतात.

फाईल्स हस्तांतरण (Files transfer between devices) – अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे आपण Bluetooth connectivity सुविधा वापरून आपल्या स्मार्टफोनमधील फाईल्स दुस-या डिव्हाईसवर (संगणक, मोबाईल, स्मार्टफोन, टॅबलेट इत्यादी) ट्रान्सफर करू शकतो. शिवाय, दुस-या डिव्हाईसवरील फाईल्स आपल्या स्मार्टफोन वर आणू शकतो. यासाठी आपला व समोरचा डिव्हाईस Bluetooth supported असणं गरजेचं आहे.

मल्टिमिडीया (Multimedia support) – अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिममधील गॅलरी, कॅमेरा, म्युझिक प्लेअर, साऊंड रेकॉर्डर, व्हिडीओ प्लेअर अशी अनेक अॅप्स आपल्याला  फोटो, गाणी, व्हिडीओ यांचा मनमुराद आनंद देतात.

फोन सुरक्षितता (Phone security features) – अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम आपल्याला फोन लॉकिंग करता विविध पर्याय देते. यात प्रामुख्याने पॅटर्न लॉक (यामध्ये ठराविक पद्धतीने बिंदू जोडत गेल्यास स्क्रीन अनलॉक होतो), पिन / पासवर्ड लॉक (यामध्ये ठराविक key combination टाईप केल्यास स्क्रीन अनलॉक होतो), व्हॉईस लॉक (यामध्ये ठराविक व्यक्ती ठराविक शब्द बोलल्यास स्क्रीन अनलॉक होतो), फेस लॉक (यामध्ये ठराविक व्यक्तीचा चेहरा स्मार्टफोनच्या समोर धरल्यास अथवा ठराविक व्यक्तीच्या चेह-याने ठराविक क्रिया केल्यास, उदाहरणार्थ डोळे मिचकावणे, स्क्रीन अनलॉक होतो).

याशिवाय अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिममध्ये घातलेले काही अॅप्सही आपल्यासाठी सुरक्षिततेची व्यवस्था करतात. क्विक हील अॅन्टिव्हायरस ठराविक फोन नंबर्स वरून येणारे फोन्स अथवा संदेश ब्लॉक करतं, अॅपलॉक हे अॅप एक पूर्वनियोजित पासवर्ड टाकल्याखेरीज आपल्याला बाकीचे कुठलेही अॅप्स वापरू देत नाही.

अशा पद्धतीनं स्मार्टफोन हे आता एक चालतं बोलतं ऑफिस झालंय. जग खूप छोटं झालंय, अगदी खिशात बसायला लागलंय. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो, अगदी स्मार्टफोनचा सुद्धा ! सतत स्मार्टफोन्सवर लक्ष दिल्याने कामातलं लक्ष उडणं (distraction), वैयक्तिक संबंधांमधले बिघाड इत्यादी समस्या आत्तापासूनच भेडसावतायेत. सदैव संपर्कात राहिल्यानं थोडासुद्धा निवांतपणा मिळेनासा झालाय. त्यामुळे चिडचिड, उदासीनता, सततची चिंता इत्यादी  मानसिक समस्या उद्भवत आहेत.

स्वत:वर ताबा ठेवून स्मार्टफोनच्या आहारी न जाता त्याचा वापर करायला शिकूया. तर करूया सुरुवात?

अ अ अॅन्ड्रॉईड  चा…

 

[लेखक : मंदार नाईक ]

*छायाचित्र इंटरनेटवरून साभार

 

प्रकाशन :टेक मराठी ई दिवाळी अंक २०१४

नमस्कार,

टेक मराठीस आपण वाचकांनी नेहमीच उत्तम प्रतिसाद आणि प्रोत्साहन दिले. त्याचमुळे लेख, कार्यशाळा, कार्यक्रम यापुढील टप्पा म्हणून आज टेक मराठीचा पहिला-वहिला दिवाळी अंक आपल्या हाती देताना आम्हांस अतिशय आनंद होत आहे.
तंत्रज्ञान हे आज अविभाज्य अंग झाले आहे. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान माणसाला मदत करते आहे . यांची विविध अंगे जाणून घ्यायला, काही मजेशीर अनुभव, कविता, कथा, लेख आणि काही विशेष मुलाखती या साऱ्यांचा मेळ साधून नविन लोगोसह एक परिपुर्ण ई-अंक आपल्यासमोर सादर करीत आहोत.
आपले अभिप्राय जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. हा ई-अंक PDF स्वरूपात उपलब्ध आहे.  http://wp.me/PRgxJ-nG या ठिकाणाहून तुम्ही डाऊनलोड करू शकता.
आपल्या मित्रांना, आप्तांना जरूर शेअर करा.
धन्यवाद!
 

GIT : आपल्या computer वर install कसे करायचे? [भाग ३]

आपण मागील लेखात पाहिल्याप्रमाणे, आपल्याला लागणारी  पहिली गोष्ट म्हणजे GIT!
GIT ही प्रणाली आपल्या मशीनवर install करण्यासाठी http://git-scm.com/downloads येथून ती download करावी आणि पुढीलप्रमाणे ती install करता येईल.
Linux वर फक्त खालील command Terminal मध्ये run केली, की GIT install होईल.
sudo apt-get insall git-core
Windows वर तुम्ही download केलेली exe run करा.
GIT Install1
येथून “Next ” Click करा.

GIT Install2

हे License Agreement आहे. येथून “Next ” Click करा.

 

GIT Install3

ह्या ठिकाणी आपल्याला आपल्या सोयीनुसार path देता येतो. येथून “Next ” Click करा.

GIT Install4

GIT Install5

GIT Install6

वरील सर्व ठिकाणी आपण काहीही बदल न करता फक्त “Next” करत रहा.

 

GIT Install7

GIT Install8

 

त्यानंतर Installation चालू होईल आणि ही शेवटची स्क्रीन दिसेल. तुमच्या मशीनवर GIT install झाले असेल.

आपल्या “Programs” मध्ये “GIT Bash”अशा पर्यायाची भर पडलेली दिसेल.

आता राहिले Smartgit, ते आपण पुढील भागात पाहू.