उबंटुची ओळख

खुप जणं ऑपरेटींग सिस्टम म्हणजे विंडोज असेच समजतात. बरेचवेळा लोकांना दुसरे पर्याय आहेत हे माहितदेखील नसते. विंडोज वापरायला आपल्याला ती प्रत विकत घ्यावी लागते. पण किंमत जास्त असल्याने बरेचवेळा लोकं पायरेटेड प्रत वापरणेच पसंत करतात. या गोष्टीचे बरेच तोटे आहेत. यावर उपाय असा की, अशी एखादी ऑपरेटींग सिस्टम वापरायची की जी विनामुल्य उपलब्ध असेल. एक प्रसिद्ध पर्याय म्हणजे लिनक्स! पण गैरसमज असा आहे की, लिनक्स खूप अवघड आहे आणि ते वापरायचं म्हणजे आपल्याला कॉम्पुटरबद्दल खूप माहिती असायला हवी. ही गोष्ट थोड्या प्रमाणात खरीपण आहे. यालाच पर्याय म्हणून कॅनोनिकलने सुरू केलेली ऑपरेटींग सिस्टम म्हणजे उबंटु!

“उबंटु” ह्या लेखमालिकेअंतर्गत हा पहिला लेख. यात उबंटुची ओळख करून दिली आहे. आम्ही याविषयी अजुन माहिती पुढील लेखांद्वारे देणार आहोत.

खुप जणं ऑपरेटींग सिस्टम म्हणजे विंडोज असेच समजतात. बरेचवेळा लोकांना दुसरे पर्याय आहेत हे माहितदेखील नसते. विंडोज वापरायला आपल्याला ती प्रत विकत घ्यावी लागते. पण किंमत जास्त असल्याने बरेचवेळा लोकं पायरेटेड प्रत वापरणेच पसंत करतात. या गोष्टीचे बरेच तोटे आहेत. यावर उपाय असा की,  अशी एखादी ऑपरेटींग सिस्टम वापरायची की जी विनामुल्य उपलब्ध असेल. एक प्रसिद्ध पर्याय म्हणजे लिनक्स! पण गैरसमज असा आहे की,  लिनक्स खूप अवघड आहे आणि ते वापरायचं म्हणजे आपल्याला कॉम्पुटरबद्दल खूप माहिती असायला हवी. ही गोष्ट थोड्या प्रमाणात खरीपण आहे. यालाच पर्याय म्हणून कॅनोनिकलने सुरू केलेली ऑपरेटींग सिस्टम म्हणजे उबंटु!

उबंटु इनस्टॉल केल्यानंतर आपली डेक्सटॉप स्क्रीन अशी दिसेल.

काय काय गोष्टी उपलब्ध आहेत?

उबंटु वापरायला खूप सोपी आहे. त्यात तुम्हाला नेहमी लागणारं ऑफिस, लॅन, वायरलेस कनेक्शन, इंटरनेट, चॅटिंगचे पर्याय अगदी सहजपणे वापरता येतात. यासाठी लागणारी सर्व सॉफ्टवेअर उबंटुमधे अंतर्भूतच असतात, म्हणजे आपण उबंटु इनस्टॉल केले की ह्या सर्व गोष्टी उपलब्ध असतातच. वेगळ्या इनस्टॉल करून घेण्याची गरज नाही.

पुढे दिलेल्या चित्रात आपण पाहू शकता की, मोझिला इंटरनेट ब्राऊजर अगोदरपासूनच उपलब्ध आहे.

खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे, आपल्या टुलबारवर सर्व मेन्यु, मोझिला इंटरनेट ब्राऊजर, हेल्प याबरोबरच वायरलेस कनेक्टिविटी, ई-मेल/ चॅट ई.चे पर्यायदेखील उपलब्ध आहेत. (खालील चित्र मोठे करून पहायचे असल्यास त्यावर क्लिक करा.)

ऑफिस- अगदी आवश्यक असणारे हे सॉफ्ट्वेअरही उबंटुमधे अगोदरपासूनच उपलब्ध असते. चित्रात दाखविल्याप्रमाणे ऑफिस या मेन्युखाली आवश्यक ते सर्व पर्याय उपलब्ध आहेत. ऑफिस वेगळे इनस्टॉल करण्याची गरज नाही.

ऑडियो-व्हिडीयो: गाणी ऐकण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी, फोटो पाहण्यासाठी लागणारी सॉफ्टवेअरस चित्रात दाखविल्याप्रमाणे साऊंड ऍंड व्हिडियो या मेन्युअंतर्गत उपलब्ध असतात.

नविन सॉफ्टवेअर इन्स्टॉल कसे करायचे?

सॉफ्टवेअर सेंटर आणि साईन-ऍप-टेक मॅनेजर मधे विविध सॉफ्टवेअरचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तुम्हाला हवे ते सॉफ्टवेअर कोणाच्याही मदतीशिवाय तुम्ही स्वत: अगदी सहजपणे इनस्टॉल करू शकता .

साईन-ऍप-टेक मॅनेजरला जाण्यासाठी, चित्रात दिल्याप्रमाणे सिस्टिम-> ऍडमिन -> साईन-ऍप-टेक मॅनेजर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला खालील स्क्रीन दिसेल. त्यात दिल्याप्रमाणे, आपल्याला हवी ती कॅटेगरी आपण निवडली ही त्याच्या संबधीत सॉफ्टवेअर आपल्याला शेजारी दिसतात. आपल्याला हवी ती  सॉफ्ट्वेअर चेक बॉक्सद्वारे निवडायची आणि “अप्लाय” म्हणायचे. इंटरनेटवरून ती लोड होतात, यासाठी बाकी काही करायची आवश्यकता नसते.

त्याशिवाय चित्रात दाखविल्याप्रमाणे ऍप्लिकेशन  या मेन्युअंतर्गत सॉफ्टवेअर सेंटर हादेखील एक पर्याय उपलब्ध आहे.

जिथे सध्या उपलब्ध सर्व सॉफ्टवेअरची यादी शिवाय विविध कॅटेगरीनुसार उपलब्ध सॉफ्टवेअरची यादी, फिचर्स व नविन उपलब्ध यानुसार वर्गीकरण करून उपलब्ध असतात. आपल्याला हवे ते सॉफ्टवेअर निवडून “गेट सॉफ्टवेअर” हे बटण दाबायचे.

“उबंटु” ह्या लेखमालिकेअंतर्गत हा पहिला लेख. यात उबंटुची ओळख करून दिली आहे. आम्ही याविषयी अजुन माहिती पुढील लेखांद्वारे देणार आहोत.

नुकतेच उबंटुने नविन व्हर्जन बाजारात आणले आहे. ते तुम्ही येथे जाऊन डाऊनलोड करू शकता.

हा लेख कसा वाटला ते अवश्य कळवा.

लेखक Nikhil Kadadi

मी प्रोग्रॅमर तसेच टेक मराठी व कृष्णा इनफ़ोसॉफ्ट यांचा सहसंस्थापक आहे. मला Python आणि संबधीत फ्रेमवर्क्स यांमध्ये तसेच Drupal, Joomla, Wordpress इ. व सामान्यपणे सॉफ्ट्वेअर डेव्हलपमेंटमधील सर्व गोष्टींमध्ये रस आहे. ट्विटर_अकाउंट, फेसबुक

18 thoughts on “उबंटुची ओळख”

  1. @Vishwas विंडोज एक्स पी चांगले ही वाईट हा मु्द्दाच नाहीये. उबंटु ओ एस चे काय फिच्रर्स आहेत ते महत्वाचं.

  2. लेख खूप आवडला. उबंटू बद्दल आजून माहिती द्यावी. तसेच अजून दुसऱ्या ओपरेटिंग सिस्टीम बद्दल माहिती द्यावी.

  3. आपण दिलेली माहिती फार उपयोगाची वाटली.
    त्याबद्दल धन्यवाद !
    पण मला उबुंतू विषयी आणखी विश्तृत माहिती मराठी मध्ये कोठे मिळेल त्याबद्दल थोडेशे सुचवावे.

  4. तुम्ही खूप छान प्रयत्न करत आहात मी सुधा अशाच एका प्रयत्नाची वाट पाहत होतो थांक्यौ सो मच

  5. जेणे करून it हे सर्व साधारण माणसापर्यंत पोह्न्चेल आणि ते सर्वाना सोप वाटायला लागेल मी एक it चा विद्यार्थी आहे.

  6. खूपच आनंद झाला tech मराठी विषयी माहिती मिळाल्यावर. मी महाराष्ट्र शासनाचा शासकीय कर्मचारी आहे मला सध्या संगणक कक्षाचे कामकाज सांभाळण्याची जबाबदारी दिलेली असून माझे संगणक ज्ञान अधिक अद्यावत करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. कृपया मराठीत संगणक माहिती देणारे विविध संखेत्स्थळे सुचवा

  7. mala ubuntu vaparayache aahe.. mi web designer aahe, mala dreamweaver, photoshop tikade vaparata yeil ka? majhe marathi sites che kam khup asate tar mala marathi type karanyasathi kay karave lagel?

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत