उबुंटु प्रणाली संगणकावर कार्यान्वयीत करणे.

मागच्या लेखात आपण उबुंटु प्रणाली बद्दल थोडक्यात माहिती पहिली.
आता आपण ती कार्यान्वयीत कशी करायची ते पाहू . त्याच्या वेगवेगळ्या पायर्‍या आहेत.

पायरी  १.   प्रथम संगणकाच्या  ” BIOS” settings मध्ये जाऊन  boot priority option “CD” असा ठेवा आणि नंतर उबुंटु १०.१० ची CD , CD ड्राइव्हमधे ठेऊन पुन्हा: चालू (Restart) करा. (म्हणजे तुमचा संगणक तुम्ही टाकलेल्या उबुंटु १०.१० ची CD वापरून चालू होईल …)

पायरी  २.   संगणक चालू झाल्यावर तुम्हाला निवड करण्यासाठी मेनू दिसेल. त्यातल्या “Boot  From CD ” या पर्यायावर जाऊन enter करा.   त्यातल्या   ” Install Ubuntu 10.10 ” या आयकॉनवर क्लीक  करा.

पायरी  ३.    एक नवीन विंडो दिसेल. त्यातला  “English”  पर्याय निवडून  ” Forward ” या बटणावर क्लिक करा.

पायरी  ४.     पुढची विंडो तुमच्या संगाणकाची माहिती दर्शवेल. (उर्वरित रिकामी जागा ई..)  ” Forward ” या बटणावर क्लिक करा.

पायरी  ५.     पुढची विंडो तुम्हाला कोठे  ” Install ” करायचे ते विचारेल.  शेवटचा पर्याय  ” Specify partition manually ” निवडा आणि  ” Forward ” या बटणावर क्लिक करा.

पायरी   ६.    पुढची विंडो तुम्हाला कोणत्या  ” partition ”  वर  ”  install ”   करायचे आहे ते विचारेल.

हिरवा पट्टा (sda1) हे माझ्या  हार्ड डिस्कचे पहिले partition आहे. त्यावर  ” Windows ”   इंस्टॉल आहे. भगवा आणि निळा हे माझे दुसरे दोन  partition आहेत.  पांढरा पट्टा म्हणजे ते रिकामी जागा (free space) आहे. आपण त्याच्यावर उबुंटु install करणार आहोत. त्याच्या खालच्या तक्त्यात (10818 MB) free space वर जाऊन  ” Add ”  हे  बटण दाबा.

याठिकाणी आपल्याला लागणारी जागा मोजण्यासाठी पुढील सूत्र तुम्ही वापरू शकता.

रॅम २ जी.बी. पर्यंत असल्यास:

swap partitions = रॅमची साईज (RAM Size) * २

जर रॅम २ जी.बी. पेक्षा जास्त असेल तर:

swap partition = रॅमची साईज (RAM Size) * १

** जर तुमच्या हार्ड डिस्कवर पुरेशी जागा असेल तर कधीही रॅमची साईज (RAM Size) * २ हे सूत्र वापरणे उत्तम.

रूट पार्टीशनसाठी ५० जी.बी. एवढी जागा पुरेशी असते, जर हार्ड डिस्कची जागा कमी असेल तर २० जीबी एवढी ठेवली तरी चालते.



पायरी ७.  ” Create New Partition ”   नवीन  विंडो  उघडेल.  New partition size  आणि  Mount  Point  ” /  ”  निवडून  ” Ok ” वर क्लिक करा.

पायरी ८.   पुढची  विंडो तुमचे तयार झालेले  ” partition ” दाखवेल.  (/dev/sda8).  आता  उर्वरित  free  space वर क्लिक करून  ” Add ”  हे बटण दाबा.

पायरी ९.   परत ” Create New Partition ”   नवीन  विंडो  उघडेल.  New partition size  आणि  Use as : ” swap area ” निवडून  ” Ok ” वर क्लिक करा.

पायरी  १०.  पुढची  विंडो तयार झालेले नवीन ” Partition ” दाखवेल.  ” Boot  loader ”  ” /dev /sda ” निवडून  ” इंस्टॉल नाऊ ” वर क्लिक करा.

पायरी  ११.  Where are you ?   Time  Zone  Kolkata  निवडून  ” Forward ”  वर क्लिक करा.

पायरी १२.   Keyboard  layout   ” USA ” निवडून  निवडून  ” Forward ”  वर क्लिक करा.

पायरी १३.   Who are you ?  पूर्ण माहिती भरून  ” Forward ”  वर क्लिक करा.

पायरी १४.   Welcome  Window, इनस्टॉलेशनची प्रगती दर्शवेल.

ती  पूर्ण झाल्यावर संगणक परत चालू होण्या पूर्वी  “CD”  काढून  ” BIOS ”  मधून  ” Boot priority ”  परत  ” Hard Disk  ”  ठेवा आणि संगणक परत चालू करा.

अभिनंदन आपण यशस्वीरीत्या उबुंटु इंस्टॉल केले!

या लेखात काही नविन मुद्दे श्री. नरेश खलासी यांच्या सुचनांनुसार जोडले आहेत.

7 thoughts on “उबुंटु प्रणाली संगणकावर कार्यान्वयीत करणे.

  1. खूपच छ्यान आपला प्रयत्न आहे. त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन! परंतु हि सिस्टीम कुठे मिळेल? आणि जर हि सिस्टीम पूर्णतः मराठीतून हातालान्यास मिळाली तर त्यातली मजा जरा जास्तीची असेल. धन्यवाद.

  2. सर खपूच छान … मी आशाच computer बद्दल माहिती देणाऱ्या website शोधत होतो हा blog मला marathi suchi या website वर मिळाला ..

    आभारी आहे सर खूपच छान ….

  3. धन्यवाद
    मी अपला आभारी आहे.

    हरीभाउ आपल्याला उबुन्तु ची DVD / CD
    इन्टरनेट वरुन डाउनलोड करता येइल. कृपया ही लिंक वापरा http://www.ubuntu.com/desktop/get-ubuntu/download

    मराठी भाषा दीसण्या साठी SCIM मधे जून मराठी भाषा निवडा.
    कृपया https://help.ubuntu.com/community/SCIM ही लिंक वापरा.

  4. good article.
    i have winxp on my pc. if i want to install ubuntu, can i? will it affect my os and other programs? how to uninstall ubuntu? plz reply.
    thanks.

  5. मला manually partition करायच्या आहेत दोन्ही पण swap आणि ext4
    कसे करायचे ते आणि मला विंडोज चा बूट लोडर हवा

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)