टेक मराठीची पहिली सभा!


आम्ही या महिन्यापासून टेक मराठीची सभा आयोजीत करण्याचे ठरवीले आहे . टेक मराठीचे वाचक, लेखक, सल्लगार ही सर्व मंडळी एकत्रित यावी व टेक मराठी परीवाराची प्रत्यक्ष भेट व्हावी, हा या सभेमागचा मुख्य उद्देश आहे.
आपण नुसते एकत्र न येता, काही उपयुक्त माहिती आपल्याला मिळावी या उद्देशाने, दर वेळी काही विषय ठरवून, त्यावर मान्यवर मंडळींची मते आपण ऐकणार आहोत. त्यानंतर व्यक्तीगत भेटींसाठी वेळ ठेवण्यात येईल. यामुळे या सभेचे स्वरूप औपचारिक व अनौपचारीक असे मिश्र असेल. सभेबद्दल माहिती:

*        विषय: Software Development क्षेत्रातील Java Platform वरील  trends

वक्ते: हर्षद ओक-हे Rightrix Solutions चे संस्थापक व IndicThreads.com चे संपादक आहेत. Java या विषयावर त्यांनी ३ पुस्तके लिहिली आहेत. शिवाय, त्यांच्या technology तील योगदानामुळे ते Oracle ACE Director and a Sun Java Champion म्हणून नावाजले आहेत.

* विषय: बराह, क्विलपॅड व गूगल ट्रास्लिटरेटर वापरून मराठी typing कसे करायचे?

वक्ते: मंदार वझे- हे गेले १५ वर्षं IT क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या Avaya India Pvt Ltd या संस्थेत ते Senior Module Lead म्हणून कार्यरत आहेत.

* विषय: लिपिकार वापरून मराठी typing कसे करायचे?

वक्ते: नेहा गुप्ता व प्रणम शेट्ये –  लिपीकार टीम

केव्हा –  दि. १९ जून २०१० रोजी दुपारी ४:०० ते सायंकाळी ७:००

स्थळ: Symbiosis Institute Of Comp. Studies & Research(SICSR), अतुर सेंटर, गोखले क्रॉस रोड, मॉडेल कॉलनी, पुणे.

Google Map: http://bit.ly/93USLP

आपण सर्वांनी या सभेला अवश्य उपस्थित रहावं.

**ही सभा सर्वांसाठी विनामूल्य आहे, मात्र कृपया http://techmarathi.eventbrite.com/ येथे  नोंद करावी.

लेखक पल्लवी

मी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून कार्यरत आहे. तसेच टेक मराठी व कृष्णा इनफ़ोसॉफ्ट यांची सहसंस्थापक आहे. मुख्यत: डॉट नेट टेक्नॉलॉजीवर काम करते. ट्विटर_अकाउंट, माझा_मराठी_ब्लॉग, माझा_ब्लॉग

5 thoughts on “टेक मराठीची पहिली सभा!”

 1. हे संमेलन फारच गरजेचे आहे. यातून झालेली फळ निष्पत्ती पुढच्या सर्व मराठी बांधवांना खूपच मोलाची ठरणार आहे.
  कार्य-क्रमा साठी मनापासून शुभेच्छा ! निलेश

 2. नमस्कार!
  या कार्यक्रमाची व्हिडीओ शुटींग केली जावून ती युट्यूब वर टाकली जावी व तीची एक लिंक या संकेतस्थळावर दिली जावी ही विनंती.

 3. नमस्कार!
  संगणकावर मराठी टंकन करणं आता नेहमीचं झालंय. पण येणार्‍या काळात मोबाईल हॅंडसेटवर मराठी कसे टंकन करणार? विशेषत: क्येरटी किबोर्ड वर. हा प्रश्न मला महत्वाचा वाटतो. कारण मोबाईल हॅंडसेट वर मराठी आली की विविध मराठी सॉफ्ट्वेअर देखील विकसित करता येतील. जी विशेषता ग्रामिण भागात उपयोगी पडतील.

  कळांची संख्या कमी ठेवत कळफलकाचा लेआउट कसा असणार? कसा असायला हवा? ह्या बाबत विचार व्हायला हवा असे वाटते.

 4. @निलेश: आभार !
  @सतीश- आपल्या सूचना खूप चांगल्या आहेत. आम्ही याचा नक्की विचार करू.
  संगणकावर मराठी टंकन करणं आता नेहमीचं झालं असलं तरी अनेक लोकांना त्याबद्दल फार माहिती नाहीये, म्हणून तो विषय घेतला आहे. पण येणार्‍या काळात मोबाईल हॅंडसेटवर मराठी कसे टंकन करणार? याचाही अवश्य विचार करू.

 5. आपल्या बहुसंख्य वंचित मराठी लोकांची आठवण रहावी यासाठी प्रत्येक प्रसंगात एक तरी भाग असावा . अधिक सांगणे न लगे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत