टेक मराठी नव्या स्वरूपात!!

नमस्कार!
टेक मराठी आता एका नव्या स्वरूपात येत आहे. आजवर टेक्नॉलॉजी विषयक अनेकविध विषयांवरील माहिती लेखांद्वारे आपल्यासमोर आली. टेक मराठी सभांतून व्याख्याने झाली. आपला प्रतिसाद उल्लेखनीय होता.

आता यापुढील पाऊल म्हणून आम्ही “महामेळावा ” आयोजीत करीत आहोत. त्याच्प्रमाणे टेक मराठीच्या वाचकांसाठी काही नविन गोष्टींची घोषणा करीत आहोत.
महामेळावा: हा महामेळावा दि १० व ११ डिसे. २०११ रोजी पुणे येथे संपन्न होईल. याविषयी अधिक माहिती आपण येथे पाहू शकता.
लेखांसाठी आवाहन: टेक मराठी ही चळवळ व्यापक करायची असेल तर त्यात अनेकविध लोकांचे योगदान मिळणे आवश्यक आहे.या नविन स्वरूपाच्या निमित्ताने आम्ही आपणांस लेखांसाठी आवाहन करीत आहोत. आपण जर टेक्नॉलॉजीसंदर्भात काही लिखाण करू इच्छित असाल तर आपले हार्दीक स्वागत आहे. आपले लिखाण write@techmarathi.com या पत्यावर आम्हाला पाठवा. ते आम्ही टेक मराठीवर जरूर प्रकाशीत करू.
टेक मराठी निबंध स्पर्धा: टेक मराठी महाविद्यालयीन व पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजीत करीत आहे. याबद्दल अधिक माहिती येथे मिळेल.
टेक मराठी मासिक सभा: आपल्याला टेक्नॉलॉजीविषयक एखादी सभा आयोजीत करायची असेल, विषय सुचवायचा असेल तर आम्हाला जरूर कळवा. आपल्याला वक्ते म्हणून सहभागी व्हायचे असेल तरी जरूर संपर्क करावा.

टेक मराठीच्या वाचकांना हा बदल निश्चित आवडला असेल अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद!

1 Comment

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)