टेक मराठी सभा – ऑक्टोबर २०१०

या महिन्यातील टेक मराठी सभेची माहिती पुढीलप्रमाणे-

  • विषय: द्रुपल वापरून मराठी वेब-साईट्स कशा करायच्या?

वक्ते: प्रसाद शिरगांवकर

श्री. प्रसाद शिरगावकर हे मराठी वेब-साईट डॉट कॉमचे संस्थापक असून, मराठीमध्ये नवनवीन दर्जेदार अत्याधुनिक संकेतस्थळे निर्माण करण्यासाठी कार्यरत आहेत. गेल्या महिन्यातील सभेत त्यांनी ” मराठी ब्लॉग / वेब-साईट कशा तयार करायच्या”,  याविषयी मार्गदर्शन केले. याचाच पुढील भाग म्हणुन हे सत्र आयोजीत केले आहे.

  • विषय: मराठी विकीपिडीयाचा वापर/ फायदे

वक्ते: विजय सरदेशपांडे

श्री. विजय सरदेशपांडे हे मराठी विकिपिडियाच्या विकिपीडिया स्वागत आणि साहाय्य चमूचे सदस्य आहेत.  मराठी विकिपिडियामधे त्यांचे भरीव योगदान आहे.

कधी : दि. २३ -१०-२०१०

वेळ: दुपारी ५:३० ते ७:००

स्थळ: Symbiosis Institute Of Comp. Studies & Research(SICSR), अतुर सेंटर, गोखले क्रॉस रोड, मॉडेल कॉलनी, पुणे.

गुगल नकाशा: http://bit.ly/93USLP

आपण सर्वांनी या सभेला अवश्य उपस्थित रहावं.

ही सभा विनामूल्य आहे, कृपया येथे नावनोंदणी करावी.

3 thoughts on “टेक मराठी सभा – ऑक्टोबर २०१०

  1. अतुल, सध्या तरी ही सभा पुण्यातच असते. जर मुंबईमध्ये कोणी पुढाकार घेऊन आयोजीत करणार असेल तर जरूर संपर्क करावा. हा उपक्रम जास्त व्यापक करता आला तर आम्हाला आनंदच आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)