टेक मराठी सभा -२

टेक मराठीच्या पहिल्या सभेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! या महिन्यात दुसरी सभा आयोजीत करण्याचा आमचा मानस आहे. यावेळीदेखील आपण सर्व चांगला प्रतिसाद द्याल ही अपेक्षा आहे. सभेबद्दल माहिती:

 • विषय: मराठी ब्लॉग / वेब-साईट कशा तयार करायच्या, याविषयी मार्गदर्शन

वक्ते: श्री. प्रसाद शिरगावकर
श्री. प्रसाद शिरगावकर हे मराठी वेब-साईट डॉट कॉमचे संस्थापक असून, मराठीमध्ये नवनवीन दर्जेदार अत्याधुनिक संकेतस्थळे निर्माण करण्यासाठी कार्यरत आहेत.

कधी : दि. २५ -०९-२०१०

वेळ: दुपारी ४:०० ते ७:००
स्थळ: Symbiosis Institute Of Comp. Studies & Research(SICSR), अतुर सेंटर, गोखले क्रॉस रोड, मॉडेल कॉलनी, पुणे.

Google Map: http://bit.ly/93USLP

आपण सर्वांनी या सभेला अवश्य उपस्थित रहावं.

सूचना: काही अपरिहार्य कारणांमुळे पुर्वघोषित “इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट”  हे सत्र रद्द करावे लागत आहे, याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. श्री प्रसाद शिरगावकर यांचे सत्र पुर्वनियोजीत कार्यक्रमानुसारच होईल.

कृपया सहकार्य करावे.

**ही सभा सर्वांसाठी विनामूल्य आहे.

11 thoughts on “टेक मराठी सभा -२

 1. नवीन मराठी ब्लॉग करणाऱ्यांना मार्गदर्शनाची खूपच आवश्यकता वाटते. कार्यक्रमास शुभेच्छा.वेबसाईट तयार करणे तर त्याहून किचकट वाटते!

 2. हाय पल्लवी,

  पहिल्या सभेप्रमाणे या वेळीसुद्धा eventbrite येथे नोंदणी करणे आवश्यक आहे का? असल्यास त्याची लिंक काय आहे?

  – विवेक

 3. विवेक,
  यावेळी कोणतीही नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही थेट सभेला येऊ शकता.

 4. नमस्कार पल्लवी,
  काही कारणास्तव मला पहिल्या सभेला उपस्तीत राहता आले नाही. पण या सभेला मी नक्की येयील माझ्या friends ला सोबत घेऊन. आम्हाला नक्कीच हि सभा उपयोगी पडेल हि आशा. सभेसाठी शुभेच्छा.
  – स्वाती करपे

 5. धन्यवाद स्वाती आणि अमित, जास्तीत जास्त लोक यायला हवेत तरच अशा सभांचा उपयोग होईल. आपण जरूर या.

 6. नमस्कार,
  पहिल्या सभेला उपस्तीत नव्हतो पण या सभेला मी येईन.
  माफ करा पण एक सुचवावे असे वाटते Google Map: http://bit.ly/93USLP पेज नवीन tab मध्ये ओपन झले तर बरे होईल.

  आभारी आहे

 7. नमस्कार पल्लवी,
  मी काही दिवसापूर्वीच ह्या website ला भेट दिली मला त्यातून भरपूर अशी माहिती मिळाली.
  माझ्या it knowledge मध्ये भर पडली.मला आपल्या सभेला भेट द्यायची आहे.तरी मला त्याची माहिती द्यावी हि विनंती.
  आणि मनापासून धन्यवाद हि सेवा चालू केली म्हणून

  उदय माने (मुंबई)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)