डिस्क डिफ़्रॅगमेंटेशन!

डिस्क डिफ़्रॅगमेंटेशन (Disk Defragmentation) हा मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टममध्ये उपलब्ध असणारा एक उत्तम पर्याय आहे.  याचा उपयोग काय, कशासाठी, कसे करायचे ते या लेखामधे पाहू.

ही प्रक्रिया आपल्याला डिस्कवरील सर्व फाईलस एकसंध पद्ध्तीने ठेवण्यास मदत करते. अनेकदा आपण फाईल डिस्कवर कुठेतरी सेव्ह करतो. कालांतराने त्या डिलिट करतो, काही नविन तयार करतो. ही प्रक्रिया सतत चालू असते. त्यामुळे प्रत्येक वेळेला फाईल एकसंध मेमरी लोकेशनमधे राहतीलच असे नाही. त्यामुळे त्या जर सलग जागेत सेव्ह असतील, तर सलग मोकळी जागा आपल्याला मिळेल.

वरील चित्रात आपणास, उपलब्ध जागेअनुसार फाईल कशा सेव्ह होतात याचा अंदाज येईल. अशा इतस्तत: पसरलेल्या फाईलस नीट लावण्यासाठी या डिस्क डिफ़्रॅगमेंटेशन (Disk Defragamentation) चा वापर केला जातो.

याचा फायदा असा की, हार्ड डिस्कला फाईल वाचण्यासाठी एक हेड असते, हे हेड सर्व ठिकणी न फिरता सलग काही जागा फिरेल, अर्थातच त्यामुळे आपल्याला फाईल लवकर मिळेल न स्पीडसुद्धा सुधारेल.  म्हणजेच कार्यक्षमता वाढेल, आहे की नाही गंमत :)

हे कसे करायचे ते आपण आता पाहू.

तर ही प्रक्रिया, आपल्या कॉम्पुटरच्या देखभाली अंतर्गत मोडते.  ही सोय Start -> Programs -> Accessories -> System Tools -> Disk Defragmentor येथे उपलब्ध आहे.

येथे गेल्यावर वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे, आपली स्क्रिन दिसेल. आपल्या कॉम्पुटरवरील सर्व ड्राईव्ह दिसतील, मोकळी जागा दिसेल. त्या प्रत्येक  ड्राईव्हवर क्लिक केल्यावर आपण “Analyze” हे बटण दाबून, त्या ड्राईव्हला डिफ़्रॅगमेंटेशनची गरज आहे का हे पाहू शकतो. जर गरज आहे असा निकाल आला तर “Defragment” हे बटण दाबून तुम्ही डिफ़्रॅगमेंटेशन सुरू करू शकता.

वरील चित्रात डिफ़्रॅगमेंटेशनच्या आधीची व नंतरची स्थिती दर्शवली आहे. सर्व फाईल एका बाजूला आल्या व सलग जागा रिकामी झाली.

तेव्हा ही प्रक्रिया महिन्यातून एकदा करायला हरकत नाही!

विशेष नोंद : यासाठी १५% जागा मोकळी लागते.

<em> वरील चित्रे http://en.wikipedia.org/wiki/Defragmentation येथून घेतली आहेत. </em>

3 thoughts on “डिस्क डिफ़्रॅगमेंटेशन!

  1. i like this site, it is really helpful to all,thanks for that………..!and plz give more interstin knowledge!!!!!!!!!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)