तुमच्या घरचे वायरलेस नेटवर्क(Wi-Fi) कसे सुरक्षित ठेवाल? (भाग-१)

<सदर लेख श्री. प्रशांत रेडकर यांनी लिहिला असून तो http://prashantredkarsobat.blogspot.com/2010/12/wi-fi.html येथे प्रकाशित केला आहे. या ठिकाणी काही भाग पुन:प्रकाशीत केला आहे. वरील ठिकाणी आपण पूर्ण लेख वाचू शकता.>

वायरलेस नेटवर्क म्हणजे काय?
नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे..सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर ज्या  कनेक्शनसाठी वायरचा उपयोग  होत नाही…ते वायरलेस…वायरलेस कनेक्शनचा वापर आपण लॅपटॉप,संगणक सारख्या उपकरणात आपण करतो..कारण वायरने नेट जोडण्याची कटकट नसल्याने ते आपण घरात कुठेही बसून आरामात वापरू शकतो.

खालील कारणामुळे ते जास्त धोकादायक आहे.

१)जर तुम्ही पोस्ट्पेड प्लॅन वापरत असाल तर तुम्हाला तुमच्या वापरापेक्षा कित्येक पटीने जास्त बिल येवू शकते.


२)जर दुसरे कोणी तुमचे वायरलेस नेटवर्क चोरून वापरत असेल तर इंटरनेटची बॅन्डविथ शेअर होत असल्यामुळे तुम्हाला इंटरनेट स्पीड कमी मिळतो.


३)आणि सर्वात मोठा धोका असतो तो हॅकिंगचा..जर तुमचे वायर नेटवर्क हॅक करून कोणी  तुमची खाजगी माहीती चोरली,तिचा वाईट वापर केला तर तुम्ही काय कराल???

तुमच्या घरच्या वायरलेस नेटवर्कला हॅकिंग पासून कसे सुरक्षित करायचे ते आपण पुढच्या भागामध्ये पाहू.

धन्यवाद.

<सदर लेख श्री. प्रशांत रेडकर यांनी लिहिला असून तो http://prashantredkarsobat.blogspot.com/2010/12/wi-fi.html येथे प्रकाशित केला आहे. या ठिकाणी काही भाग पुन:प्रकाशीत केला आहे. वरील ठिकाणी आपण पूर्ण लेख वाचू शकता.>

3 thoughts on “तुमच्या घरचे वायरलेस नेटवर्क(Wi-Fi) कसे सुरक्षित ठेवाल? (भाग-१)

 1. सर आपला पुढचा लेख कधी प्रकाशित होईल ?

 2. धन्यवाद पल्लवी :-)

  तुमच्या घरचे वायरलेस नेटवर्क कसे सुरक्षित ठेवाल?(भाग२)
  http://prashantredkarsobat.blogspot.com/2010/12/wi-fi_19.html
  तुमच्या घरचे वायरलेस नेटवर्क कसे सुरक्षित ठेवाल?(भाग3)
  http://prashantredkarsobat.blogspot.com/2010/12/blog-post.html

 3. धनयवाद,वी-फी विषयी मराठीतून चांगली माहिती दिली आहात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)