एपिक browser ची ओळख

टेक मराठीच्या पहिल्या सभेत मी मराठी लेखना साठी उपयुक्त अश्या काही साधनांबद्दल माहिती दिली होती. ही सभा जून मध्ये झाली, आणी जुलै मध्ये एपिक browser चे आगमन झाले.बंगलोर स्थित Hidden Reflex ह्या भारतीय start-up ने mozilla चे engine वापरून हा भारतीय browser बनवला आहे.

टेक मराठीच्या पहिल्या सभेत मी मराठी लेखना साठी उपयुक्त अश्या काही साधनांबद्दल माहिती दिली होती. ही सभा जून मध्ये झाली, आणी जुलै मध्ये एपिक browser चे आगमन झाले.बंगलोर स्थित Hidden Reflex ह्या भारतीय start-up ने mozilla चे engine वापरून हा भारतीय browser बनवला आहे. मला आवडलेला भाग म्हणजे ह्या browser मधे कुठल्याही एक्स्ट्रा plugin किंवा configuration शिवाय भारतीय भाषां मधून लिहीणे अतिशय सोपे आहे. उदा. जर तुम्हाला मराठीतून ट्वीट करयचे असेल तर एपिक browser मधून ते सहज शक्य आहे.

पण एपिक वापरत असताना खरे तर ट्वीट करायला ट्विटरच्या वेबसाइट वर जायची गरज नाही कारण ट्विटर साइडबार मधे उपलब्ध आहे.

पण जर गूगलचे संकेतस्थळ एपिक browser मधून उघडले तर एखाद्या मराठी शब्दाचा सुद्धा शोध घेता येतो.

आजकाल बर्‍याच मराठी वृ॒त्तपत्रांच्या वेबसाइटवर मराठीतून प्रतिक्रिया नोंदवण्याची सोय असते (टेकमराठी च्या वेबसाइटवर सुद्धा ही सोय आहे) पण जर एखाद्या साईट वर अशी सोय नसेल तरी सुद्धा एपिक browser वापरून मराठी प्रतिक्रिया नोन्दवू शकता.हे झाले एपिकच्या भारतीय भाषा वापरणे सोपे करण्या बद्दल, पण एपिक मधली बाकिची वैशिष्ठ्ये सुद्धा तितकीच महत्वाची आहेत. मुख्य म्हणजे, हा browser – Mozilla वर आधारीत असल्यामुळे, Firefox चे बरेचसे plugins  जसेच्या तसे चलण्याची शक्यता खूप जास्त आहे. माझ्यामते ही एक मोठीच जमेची बाजू आहे. शिवाय ह्यात antivirus अंतर्भूत केलेले असल्यामुळे तुम्ही download केलेल्या file आधी scan करण्याची सोय आहे. (ह्या शिवाय anti-virus साईडबार मधून संपूर्ण मशीन सुद्धा scan करता येते)

त्या शिवाय साईड्बार अप्लिकेशन्स हे एपिक browser चे महत्वाचे वैशिष्ठ म्हणावे लागेल. एपिक browser मधे बरीच साईड्बार अप्लिकेशन्स आहेत. एपिक ऍप्स मधे जावून पूर्ण सुची बघता येते. त्यातली आपल्याला हवी असणारीच ठेवून बाकीची न दाखवण्याची सुद्धा सोय आहे.

ह्यातले मला आवडलेली काही अप्लिकेशन्स

  1. इन्डिक – जर तात्पुरते काही भारतीय भाषेमधे लिहायचे असेल तर ह्याचा उपयोग आहे. सारखे लागणारे मराठी शब्द किंवा वाक्य इथे साठवून ठेवता येतात.
  2. anti-virus – ह्या बद्दल आधीच सांगितले आहे
  3. to-do – कामाची यादी करता येते. ह्यात एखादे काम विशिष्ठ वेळी पूर्ण करायचे असेल तर अलार्म लावता येतो. मला एक खटकलेली गोष्ट म्हणजे इथे फक्त english entry करता येते. (indic dropdown येत नाही) अर्थात इन्डिक ह्या अप्लिकेशन मधे टाईप करून इथे आणता येते.
  4. वर उल्लेख केल्या प्रमाणे ट्विटर पण साईडबार मधे उपलब्ध आहे.
  5. ह्या शिवाय जिमेल, याहू, गूगल मॅप सुद्धा आहेत. पण मला ट्विटर अप्लिकेशन इतके हे तीन आवडले नाहीत.
  6. जर तुम्हाला एपिक browser चा चेहरा मोहरा आवडला नसेल (लूक ऍन्ड फील) तर skins ह्या साईड्बार अप्लिकेशन मधे जावून तुम्ही तो बदलू शकता. हे अप्लिकेशन mozilla persona वर आधारीत आहे.
  7. एपिक मधे write  नावाचा HTML editor आहे. अर्थात तो HTML editor आहे ते माहीत नसलं तरी काहीच बिघडत नाही. शिवाय auto-save सुविधेमुळे तुम्ही वेगवेगळ्या files मधे save केलं पाहिजे असंही नाही. तुम्ही ह्याचा वापर scratch pad म्हणून देखील करू शकता. अर्थातच ह्यात सुद्धा भारतीय भाषांमधे लिहिण्याची सोय आहेच. हा editor, Xinha Here! वर आधारीत आहे.
  8. snippet  नावाचे अप्लिकेशन (firefox च्या scrapbook plugin वर आधारीत) browsing करीत असताना सापडलेल्या महत्वाच्या गोष्टी drag-and-drop इतक्या सोप्या पद्धतीने साठवून ठेवण्यास मदत करते. तुम्ही ह्याचा कात्रणवही म्हणून वापर करू शकता. नंतर ह्या notes मधून योग्य ती माहीती शोधू शकता (खर्‍या कात्रणवहीतून हवी ती माहीती शोधणे इतके सोपे असते तर ?)

अर्थात एपिक नवीन browser असल्या मुळे त्यात काही bugs सुद्धा आहेत, परंतू मला तरी अजून एकही शो-स्टॉपर प्रॉब्लेम सापडलेला नाही. शिवाय एपिक मधील भारतीय भाषां साठी गूगल transliteration services वापरल्या मुळे इंटरनेट connection नसल्यास भारतीय भाषांमधे टाईप करता येत नाही. अर्थात हा web browser असल्यामुळे इंटरनेट connection असावे ही अपेक्षा रास्त आहे.

जर तुम्हाला प्रत्यक्ष एपिक browser वापरून बघायचा असेल, तर ह्या संकेतस्थळावरून download करा.

टीप : मी आधी हा लेख एपिक write मधे लिहायला सुरूवात केली होती, पण मला बराह सोपे वाटत असल्यामुळे (शिवाय बराहसाठी इंटरनेट connection ची गरज नसल्यामुळे नंतर बराहमधे पूर्ण केला)

Java पेक्षा Python का चांगली?

सदर post, नविन काब्रा द्वारा प्रकाशित http://punetech.com/why-python-is-better-than-java/ या लेखाचे भाषांतर असून, http://punetech.com च्या माध्यमातून घेतले आहे. याचे मराठी भाषांतर मंदार वझे यांनी केले आहे.

धनंजय नेने ह्यांनी नुकतीच Python वापरायला सुरुवात केली, आणि त्यांना असे जाणवले की, Python वापरताना त्यांना जास्त मजा येते. त्यांनी त्यांच्या blog वर त्याबद्दल सविस्तर लिहीले आहे :

गेल्या काही महिन्यात मला असे प्रकर्षाने जाणवले की python मधे programming खूप सोपे आणि मजेशीर आहे. म्हणजे साधी आणि gear ची सायकल चालवण्यात जसा फरक आहे ना, तसाच. म्हणजे gear ची सायकल चालवताना असं वाटतं की, कमी प्रयत्नात जास्त दूर जाता येतं. परंतु विज्ञान सांगतं की खरं तर दोन्ही करता तेवढयाच प्रयत्नांची गरज लागते. जास्त सुविधा असल्यामुळे काम सोपे वाटत असेल. पण मला असं का वाटतं? कदाचीत Python च्या खालील features मुळे असेल (अर्थात, पुढील यादी कुठल्याही प्राधान्यक्रमानुसार नाही.)

* सुटसुटीत : code साधारण पणे जास्त आटोपशीर असतो. कमी फापटपसारा (verbosity)
* Dynamic Typing : Data type declaration आणि inheritance hierarchies, विशेषत:सर्व interfaces and implementations साठी योग्य आहेत की नाही, ह्याची काळजी करण्याची गरज नाही. वेगवेगळे objects एकाच inheritance hierarchy मधे असण्याची सुध्दा गरज नाही. Object मधे method असल्यास आपण त्याचा वापर करू शकता. अर्थात ही दुधारी तलवार आहे, परंतु त्यामुळे dynamic type environment मधे programming सोपे होते, हेही तितकेच खरे.
* सोपे runtime reflection: Java मधे सर्व प्रकार च्या reflection capabilities आहेत. पण Python पेक्षा Java मधे त्या वापरणे खूपच त्रासदायक आहे. Python मधे सगळे constructs (classes, sequences etc.) reflection साठी उपलब्ध आहेत. जर तुम्हाला metaprogramming constructs ची गरज असेल, तर Python ला खरोखरच पर्याय नाही.
* जास्त अंतर्गत सुविधा : list comprehensions किंवा functions ना objects प्रमाणे वापरणे.
* नीट नेटका code असण्याची सक्ती (indentation requirement) : मला ह्याची सवय होण्यासाठी २-३ दिवस लागले, पण त्या मुळे Python चा code वाचायला खूप सोपा होतो, कारण जर code व्यवस्थीत indent केलेला नसेल तर चालतच नाही. (code is rejected)


मी स्वत: Perl programmer आहे, आणि माझे Perl बद्दल असेच मत आहे. अर्थात मला Python ची indentation ची सक्ती आवडली नाही. पण जे programmer, भाषेच्या सुविधांचा गैरवापर करणार नाहीत, Perl त्यांच्याच साठी योग्य आहे. बेशिस्त programmers साठी Python ची indentation ची सक्ती ही चांगलीच गोष्ट आहे.
असो, आपण संपूर्ण लेखच वाचा. तुम्ही, त्यांनी त्यांच्या पुढच्या project साठी python निवडली, तेंव्हा लिहीलेला लेख सुद्धा वाचा. त्यापेक्षा तुम्ही त्यांच्या blog ला subscribe करा ना.
जर तुम्ही techie असाल तर तुम्ही त्यांचे सखोल आणि अभ्यासपूर्ण लेख जरूर वाचले पाहिजेत. जर तुम्हाला programming languages मधे रुची असेल तर मी त्यांचे “Contrasting java and dynamic languages”, आणि “Performance Comparison – C++ / Java / Python / Ruby/ Jython / JRuby / Groovy” हे लेख सुचवीन. ..आणि जर तुम्ही स्वत: blogger असाल तर त्यांच्या software/programming blogging बद्दलच्या सुचना वाचा.

धनंजय पुण्यातील, १७ वर्षाचा अनुभव असलेले software Engineer आहेत. त्यांना software engineering, programming, design आणि architecture ह्याबद्दल विशेष आवड आहे. अधिक माहिती करता त्यांचे PuneTech wiki profile वाचा.

सदर post, नविन काब्रा द्वारा प्रकाशित http://punetech.com/why-python-is-better-than-java/ या लेखाचे भाषांतर असून, http://punetech.com च्या माध्यमातून घेतले आहे. याचे मराठी भाषांतर मंदार वझे यांनी केले आहे.