इन्स्क्रिप्ट कळफलक(की-बोर्ड) टंकन शिकवणी

युनिकोड तर चालू झाले पण टायपिंगचे काय असा प्रश्न आपल्याला अनेकवेळा विचारला जातो. आपण इन्स्क्रिप्टचा पर्याय दिला तरी ‘हे कसे शिकायचे’ हा प्रतिप्रश्न असतो. अशावेळेस हे सोपे आहे, दोन दिवसांत शिकून होईल असे उत्तरे देण्याशिवाय पर्याय आपल्याकडे नसतो.

खरेतर C-DAC ने काही वर्षांपूर्वी Inscript Dos based Inscript tutor तयार केला होता. त्याचा फारसा प्रसार झाला नाही. नितिन निमकर यांनी त्याची झिप फाईल http://quest.org.in/Unicode/kbdtut.zip येथे ठेवली आहे.

त्यामुळे यापुढे इन्स्क्रिप्ट कसा शिकायचा हे रडगाणे न होता या शिकवणीमुळे चैतन्यनिर्मितीचे साधन होईल अशी अपेक्षा आहे. आपल्या संगणकावर ही शिकवणी चालू करण्यासाठी पुढील कृती करा-

१. आपल्या संगणकावर typing tutor नावाचा फोल्डर तयार करून त्यात वरील संकेतस्थळावर ठेवलेली झिप फाईल extract करून घ्या.
२. त्यातील KBDTUT नावाच्या फाईलवर दोनदा क्लिक केल्यावर शिकवणी चालू होते.
३. configuration मध्य जाऊन मराठीचा पर्याय निवडा..मराठीत माहिती मिळते

वरील कृती XP साठी सहज होते..मात्र VISTA व 7 साठी काही समस्या येतात.या संदर्भात आम्ही तज्ज्ञांशी बोलत आहोत..मार्ग सापडल्यावर लगेचच कळवू.

— राममोहन खानापूरकर (कार्यवाह, मराठी अभ्यास केंद्र)

खराब वा चरे पडलेल्या Cd / DVD मधून data कसा मिळवायचा?

ओरखडे असलेल्या / खराब CD/ DVD वरील माहिती कॉपी होणे  फार कठीण काम असते.त्यातून जर  data हवा असेल तर कसा मिळवायचा? यासंबधी फार उपयुक्त लेख http://www.netbhet.com/2010/04/recover-data-from-scratched-and-damaged.html येथे प्रसिद्ध आहे.

Bad CD DVD Reader हे सॉफ्टवेअर वापरून data कसा मिळवायचा, याबद्दल विस्तृत माहिती screen shots सहित  उपलब्ध आहे.

मूळ लेखावरून:

या प्रक्रियेला लागणारा एकूण कालावधी हा CD/ DVD वरील वाचता येण्याजोगी माहीती, CD/ DVD कितपत चांगल्या परिस्थीत आहे, तुम्हाला हव्या असलेल्या माहितीची एकूण Size म्हणजे एम बी आहे की जी बी  यांसारख्या तांत्रिक बाबींवर अवलंबुन असेल. आणि हो कधीकधी जास्त scratches असतील तर काँप्यूटरचा वेग पण कमी होऊ शकतो.

मराठीत टाईप / ब्लॉग / इमेल कसं करायचं?

हा मूळ लेख  http://www.harshadoak.com वर हर्षद ओक यांनी लिहिला असून  http://bit.ly/bBLidn येथे प्रकाशित झाला आहे; येथे तो पुन:प्रकाशित केला आहे.

नमस्कार. हा माझा मराठीतला पहिला ब्लॉग आहे. मी मराठी शेवटचं शाळेत लिहिलं आणि आता १५ वर्षांनंतर परत प्रयत्न करतो आहे. अवघड जातयं पण मजा पण येतेय. पहिला मराठी ब्लॉग कशावर लिहू असा विचार करत होतो. मग म्हटलं मराठीत टाईप / ब्लॉग / इमेल कसं करायचं तेच लिहुया.

मराठी टायपिंग

बघितलं तर मराठी टायपिंग करता येणंच महत्वाचं आहे. एकदा ते जमलं की मग इमेल / ब्लॉग / लेख काहीही लिहिणं सोपं आहे. मराठी टायपिंग करण्यामधला मुख्य अडथळा म्हणजे अपल्या सगळ्यांकडचे इंग्रजी भाषेतले कीबोर्ड. कीबोर्डला मराठीत टंकलेखनयंत्र म्हणतात असं दिसतंय, पण आपण मराठी फार ताणायला नको आणि त्याला कीबोर्डच म्हणूया.

मराठी टाइप करायचा एक मार्ग म्हणजे कीबोर्डवरच्या प्रत्येक इंग्रजी अक्षराच्या सुसंगत मराठी अक्षर पाठ करणे. DTP व्यवसायातील काही व्यक्ती अगदी सहज आणि कीबोर्ड कडे न बघता धडाधड मराठी टाईप करतात. पण हे तुमच्या-आमच्यासारख्या क्वचित मराठी टाइप करणाऱ्या सामान्यांना जमण्यातलं नाही.

Transliterate

दुसरा सोप्पा मार्ग आहे तो इंग्रजी मधे टाईप करायचं आणि असं सॉफ्टवेअर वापरायचं की जे त्या इंग्रजीला transliterate करून मराठी करेल. मी transliterate म्हणतोयं आणि translate नाही याची नोंद घ्या. Transliterate म्हणजे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अक्षरांच्या उच्चारानुसार भाषांतर. तुम्हाला जर मराठीत ‘खुर्ची’ लिहायच असेल तर तुम्ही इंग्रजीत ‘khurchi’ लिहायच आणि सॉफ्टवेअर आपोआप स्क्रीन वर ‘खुर्ची’ लिहील. Translate करत असतो तर आपण ‘chair’ लिहिलं असतं, पण transliterate मध्ये तसं नाही करत आणि ‘khurchi’ लिहितो.

इंग्राजी – मराठी transliterate साठी Google IME , Shree Lipi, Baraha आणि Lipikaar हे पर्याय आहेत. श्रीलिपी मध्ये सगळ्यात जास्ती features आहेत असं त्यांच्या संकेतस्थळावरनं वाटतायं तरी, पण श्रीलिपी फुकट मिळणारं सॉफ्टवेअर नाहीये. लिपिकारमध्ये पण १७ भाषांमध्ये लिहायची क्षमता आहे पण लिपिकारवरचं काम थंडावलाय असं त्यांच्या संकेतस्थळावरनं वाटत आहे. लिपिकारचा फुकट आणि विकत अशी दोन्ही versions आहेत. CDAC Leap नावाच सॉफ्टवेअरपण पूर्वी मिळत असे. त्याच्यावरचं काम पण बंद दिसतंय. मी काही वर्षांपूर्वी CDAC Leap वापरलं होतं, पण सध्या तरी लिपिकार आणि Google IME वापरतो आहे.

चित्र १: गुगल IME Auto Complete

मी हा ब्लॉग लिहायला Google IME वापरत आहे आणि ते उत्तम काम करत आहे. IME download आणि install करणं अगदी सोपं आहे. http://www.google.com/ime/transliteration/ वरन फाईल घ्या आणि ती run करा. IME नीट install झालं की तुम्हाला बहुतेक करून स्क्रीनवर उजव्या हाताला खाली IME चा नवीन टूलबार दिसेल, किंवा English – Marathi switch करायचं बटन तरी दिसेल. चित्र २ पहा.

चित्र २: IME Toolbar

IME मध्ये भाषा बदलून मराठी करा आणि तुम्ही कुठल्याही application मध्ये मराठी टाईप करू शकाल. IME मधली “auto complete” सुविधा खूप वेळ वाचवते. उदाहरण म्हणजे तुम्ही amit लिहिलत कि तो अमिताभ पर्येंत सल्ला देतो, चित्र १ पहा. असंच सगळ्या शब्दांच्या बाबतीत होतं.

जर तुम्ही संगणक क्षेत्रातल्या विषयावर किंवा कुठल्याही ‘technical’ विषयावर लिहीत असाल तर सारखेच इंग्रजी शब्द वापरायला लागतात. IME मध्ये तुम्ही भाषा सहज switch करू शकता ‘Alt+Space’ दाबून.

चित्र ३: 1गुगल इंग्रजी – मराठी ट्रांसलिटरेट

चित्र ४: गुगल इंग्रजी – मराठी शब्दकोश

Google IME अजूनतरी फक्त Windows वरच चालतं. त्यामुळे तुम्ही Linux किंवा Apple Macintosh वापरत असाल तर Google IME वापरता येणार नाही. अशावेळी तुम्ही http://www.google.com/transliterate/Marathi वापरू शकता.  Google Transliterate मध्ये २२ भाषा लिहायची क्षमता आहे.

टिप्स

1. स्पेलिंग/ शुद्धलेखनाबद्दल खात्री नसेल तर Google वर शोधून बघायचं. बरोबर असेल तर बहुतेक वेळा search results येतात. नसेल तर येंत नाहीत.
2. कुठला इंग्रजी शब्द अडत असेल तर Google इंग्रजी – मराठी शब्दकोशाचा वापर करा. उदहारण म्हणजे corresponding साठी सुसंगत हा मराठी शब्द आहे हेय मला सुचलं नव्हतं.
3. कीबोर्ड कडे न बघता टाईप करायला शिका / प्रयत्न करा, खूप वेळ वाचेल.
4. Help आणि User Guide नक्की वाचा. बरेच features आहेत जे लगेच नाही दिसत
5. IME Auto Complete मध्ये Google चा लोगो क्लीक केलात तर त्या शब्दावर Google search आपोआप होतं.
6. असले features आणि Keyboard shortcuts शिकणं आणि वापरणं फारच महत्वाचं आहे. कारण नाहीतर IME वापरायला अवघड जाईल आणि IME चा अधिकतम फायदा नाही येणार. सारखं स्क्रीनवर क्लीक करणं खूप वेळ खातं. http://www.google.com/ime/transliteration/help.html#features वर shortcuts आणि features आहेत, ते वापरायच्या आधी नक्की वाचा.
7. काही वेळा काही मराठी शब्द नाहीच जमत इंग्रजी मध्ये लिहायला. अशा वेळी तुम्ही ‘char picker’ उघडून अक्षर निवडू शकता. ‘char picker’ च बटन Google IME toolbar मध्ये असत.चित्र २ आणि ४ पहा.
8. तरी नाही जमला शब्द तर दुसरी कडून कॉपी पेस्ट करा. मला software सॉफ्टवेअर लिहायला अजून नाही जमलायं. ते मी कॉपी पेस्ट करतो आहे. Google var ‘फ्टवेअर’ search केलं आणि मला बरोबर सॉफ्टवेअर सापडलं.

चित्र ५: Character Picker

तसं तुम्ही IME वापरून कुठल्याही application मध्ये मराठी लिहू शकता. पण IME नसेल वापरायचं तर Gmail मध्ये सरळ मराठी ईमेल लिहिता येतो, “Compose Mail” मधे, वरच्या menu मधे मराठी निवडलं की झालं. पण ब्लॉग करायला मला Google IME हे सॉफ्टवेअर अधिक चांगलं वाटतं.

या लेखाबद्दल अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद.

हा मूळ लेख  http://www.harshadoak.com वर हर्षद ओक यांनी लिहिला असून  http://bit.ly/bBLidn येथे प्रकाशित झाला आहे; येथे तो पुन:प्रकाशित केला आहे.

गूगल फ़्रेंडली संकेतस्थळं (Google friendly sites) कशी करायची?

सदर  लेख, प्रभास गुप्ते द्वारा लिखित http://prabhasgupte.com/2009/12/20/how-to-create-google-friendly-sites/ या लेखाचे भाषांतर असून, http://prabhasgupte.comच्या माध्यमातून घेतले आहे.

१. आपल्या वाचकांना त्यांना हवी असणारी माहिती द्या.
आपल्या संकेतस्थळावर (websites) दर्जेदार माहिती द्या – विशेषत: मु्ख्यपृष्ठावर (homepage). जर आपल्या पानांवर उपयुक्त माहिती असेल तर वाचक आपल्याशी जोडले जातील. दर्जेदार व उपयुक्त माहिती देण्यासाठी विषयांची मांडणी नीट आणि नेमकी करा. कोणत्या शब्दावर लोकं शोध (search) घेतील याचा विचार करा.

२. इतर संकेतस्थळं (web-sites) तुमच्याशी जोडल्या गेल्या आहेत याची खात्री करा.

लिंकस(links), गूगल क्रॉलरला (Google crawler ) तुमचे संकेतस्थळ (web-site) शोधायला मदत करतात. ते तुम्हाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवते. संकेतस्थळाचे (Web site) “मूल्य” ठरवण्यासाठी गूगल (Google) कडे स्वत:चा अलगोरिदम (algorithm) आहे. “अ” कडून “ब” ला असलेली लिंक (link) म्हणजे “अ” कडून “ब” ला असलेले मत. जर “अ” हे मूल्य जास्त असेल तर त्यामुळे गूगल(Google)अनुसार, तुम्हालाही चांगले मूल्य लाभते.

३. गूगल अलगोरिदम (Google Algorithm) हा नॅचूरल लिंकस (natural links) व अननॅचूरल लिंकस (unnatural links) मधे फरक करू शकतो.


जेव्हा एखाद्या संकेतस्थळाला (web-site) ला तुमच्या संकेतस्थळावरची (web-site) माहिती उपयोगी वाटते तेव्हा ते संकेतस्थळ (web-site) तुमच्या वेब पेजला (web page) लिंक (link) देते, जेणेकरुन लिंक (link) देणा‍र्‍या संकेतस्थळाचे (web-site) वाचक तुम्ही दिलेली माहितीसुद्धा वाचू शकतील. याला नॅचूरल लिंकस (natural links) म्हणतात. पण जेव्हा जाणून बुजून अशा लिंक (link) बनवल्या जातात, तेव्हा ती अननॅचूरल लिंक (unnatural link) ठरते.  गूगल (Google) या दोन्हीमधे फरक करू शकते, नॅचूरल लिंकस (natural links) आणि अननॅचूरल लिंक (unnatural link)ओळखू शकते. स्वत:ची इंडेक्स (index)  बनवताना गूगल (Google) फक्त नॅचूरल लिंकसचाच( natural links ) विचार करते.

४. तुमचे संकेतस्थळ सहज  उपलब्ध होईल असे ठेवा.

तुमचे संकेतस्थळाची (web-site) रचना तार्कीकतेअनुसार केलेली असावी. प्रत्येक पान हे एखाद्यातरी स्टॅटिक लिंकशी (static link)  जोडलेलं असावं. कोणताही टेक्सट ब्राउझर (text browser) जसं की lynx वर तुम्ही तुमचे संकेतस्थळ तपासून पाहू शकता. बहुतेक वेळा, क्रॉलरस (crawlers) तुमचे संकेतस्थळ त्याच पद्धतीने पाहतील. काही फिचरस (features) जसं JavaScript, cookies, session IDs, frames, DHTML, Flash etc जर टेक्सट ब्राउझर (text browser) मधे दिसत नसतील तर ती गूगलला (Google)आणि इतर क्रॉलरलापण (crawler)  दिसणार नाहीत.

५. अशा गोष्टी ज्या तुम्ही टाळायला हव्यात.
केवळ क्रॉलरसाठी(crawler), तुमची पानं किवर्डसच्या (“keywords”)  यादीने भरवू नका. जर तुमच्या संकेतस्थळामधे अशी पानं, लिंकस(links) किंवा टेक्स्ट कंटेंटस (text contents) असतील जे वाचकाने पाहू नयेत अशी तुमची इच्छा असेल तर, गूगल (Google)अशा लिंकसना धोकादायक समजून तुमचे संकेतस्थळ वगळू शकते.
कुठल्यातरी search engine optimization service चा लाभ घ्या. पण निवडताना मात्र काळजी घ्या! अशा सेवा असा दावा करतात  की गूगल रिझल्टस (Google results) मधे संकेतस्थळ पहिल्यांदा येईल ,आणि असं करण्यासाठी एकतर ते कंटेंट्स (contents) मधे सुधारणा करतात आणि चूकतात किंवा गूगलला फसवण्याची/ दिशाभूल करण्याची कुठलीतरी धोकादायक पद्धत अवलंबतात. पण जर तुमचे डोमेन (domain) या सगळ्याशी संलग्न असेल तर गूगल (Google) त्यांच्या इंडेक्स (index) मधे तुमचे संकेतस्थळ संपूर्णपणे वगळू शकते.
महत्वाची नावे, कंटेंट्स (contents) वा लिंकस (links) दाखविण्यासाठी इमेजेसचा (images) वापर करू नका. गूगल क्रॉलर (Google crawler) हा ग्राफिक्स (graphics) मधील टेक्स्ट (text) ओळखू शकत नाही. जर पानांवरील मुख्य नावे वा कंटेंटस (contents)  साध्या HTML मधे format करता येत नसतील तर, ALT attribute चा वापर करा.

सदर  लेख, प्रभास गुप्ते द्वारा लिखित http://prabhasgupte.com/2009/12/20/how-to-create-google-friendly-sites/ या लेखाचे भाषांतर असून, http://prabhasgupte.comच्या माध्यमातून घेतले आहे.

ओळख विन्डोज रेजिस्ट्रीची…

महत्वाची सुचना:

जरी तुम्हाला थोडेफार पूर्वज्ञान आणि माहिती असेल की तुम्ही नेमके काय करत आहात आणि त्यामुळे काय होईल, तरी रेजिस्ट्री सोबत काम करणे (खेळणे!) हे खुप धोकादायक असू शकते. रेजिस्ट्रीमध्ये चुकीचे बदल केल्याने तुमच्या विन्डोज संगणकामध्ये अनेक प्रकारचे तांत्रिक बिघाड येऊ शकतात, जे पुनःप्रस्थपित केल्याशिवाय व्यवस्थित होऊ शकत नाहीत. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की, जर तुम्हाला यासंबंधी योग्य व सखोल माहिती नसेल तर ह्या लेखामध्ये सांगितलेल्या गोष्टी तुमच्या विन्डोज संगणकावर करून पाहू नका. आणि जरी तुम्हाला याबद्दल थोडीफार माहिती असली तरीही तुम्ही नेमके काय करता आहात आणि ते केल्याने पुर्वीच्या तुलनेने काय बदल होऊ शकतात, याची योग्य माहिती हाताशी ठेऊन काळजीपूर्वक रेजिस्ट्री फाईल्स हाताळा.

या लेखामध्ये मी विन्डोज एक्स पी मधील रेजिस्ट्रीसह कसे काम करावे, ते सांगणार आहे. शिवाय यामध्ये योग्य जागी (आवश्यक असल्यास) चित्रासंह मार्गदर्शन केलेले आहे. ह्या लेखाद्वारे तुम्ही रेजिस्ट्री फाईल्स आयात व निर्यात कशा करू शकाल, रेजिस्ट्रीमधील मुळ व्हॅल्यूज कशा बदलू शकाल, नविन व्हॅल्यूज आणि कीज कशा जोडू शकाल, आणि शेवटी रेजिस्ट्री फाईल्स कशा लिहिल्या जातात, यांबद्दल तुम्हाला माहिती मिळेल.

रेजिस्ट्री एडिटर उघडणे:

या पायरीमध्ये रेजिस्ट्री एडिटर कसे उघडावे, ते आपण पाहू.
खालीलपैकी कोणत्याही एका पर्यायाने रेजिस्ट्री एडिटर उघडता येईल:
१) स्टार्ट मेन्यूमधील “Run” वर क्लिक करून काही क्षणांत “Run” विन्डो उघडेल. त्यात regedit असे टाईप करून “ओके” वर क्लिक करा.
२) Winkey (विन्डोज कळ) + R दाबूनही “Run” विन्डो उघडेल, त्यात regedit टाईप करून “ओके” क्लिक करा.
३) Ctrl + Shift + Esc किंवा Ctrl + Alt + del यांपकी एका कॉम्बिनेशनने “Task Manager” विन्डो उघडेल. त्यात फाईल ड्रॉपडाऊन मेन्यूमधून “New task” वर क्लिक करून उघडलेल्या नविन विन्डोमध्ये regedit टाईप करून “ओके” क्लिक करा.

रेजिस्ट्री एडिटरबद्दल माहिती:

वरील पायरीत ओके दाबल्यानंतर खालील चित्रात दिसत असल्यासारखी विन्डो उघडेल, यालाच रेजिस्ट्री एडिटर म्हणतात.
या एडिटर मध्ये तुम्हाला डाव्या बाजूच्या पॅनेलमध्ये HKEY_CLASSES_ROOT, HKEY_CURRENT_USER, HKEY_LOCAL_MACHINE, HKEY_USERS, and HKEY_CURRENT_CONFIG हे फोल्डर्स दिसत असतील, या मुख्य पाच फोल्डर्संना “hives” आणि त्यामधील सबफोल्डर्संना “keys” असे म्हणतात. खालील चित्रामध्ये मी HKEY_CURRENT_USER\Software\Microsoft या ठिकाणी आहे.

तर अशाप्रकारे तुम्ही रेजिस्ट्री एडिटर मध्ये कोठेही नॅव्हिगेट करू शकता.

रेजिस्ट्री कीज निर्यात करणे.

कोणत्याही किंवा सर्वच रेजिस्ट्री कीजमध्ये बदल करण्याअगोदर त्या निर्यात (एक्पोर्ट) करता येतात.

यामुळे तुम्ही केलेले बदल मुळ स्थितीत (पहिले होते तसे) आणायला एकदम सोपे जाते.

जी की (key) तुम्हाला निर्यात करायची असेल, त्यासाठी त्या “की”वर राईट क्लिक करून Export हा पर्याय निवडा.

वरीलप्रमाणे Export हा पर्याय निवडल्यावर तुम्हाला जे लगेच लक्षात येईल, असे नाव देऊन इच्छित ठिकाणी सेव्ह करा. खालील चित्रामध्ये मी उदाहरणादाखल HKCU_Software_Microsoft हे एक्पोर्ट केलेल्या “की”ला नाव दिले आहे.

रेजिस्ट्री फाईल्स आयात करणे.

समजा तुम्ही एक्पोर्ट केलेल्या की मध्ये काही बदल केले आणि तुम्हाला ते पुसून पुर्वीसारखे करायचे आहे (म्हणजेच मुळस्थितीत आणायचे आहे), त्यासाठी तुम्ही निर्यात (एक्स्पोर्ट) केलेली रेजिस्ट्री की फाईल (या आधीच्या पायरीमध्ये पहा) आयात (इंपोर्ट) कशी करायची, हे देखील तुम्हाला माहीत असायला हवे.

जर तुम्ही त्या एक्पोर्ट केलेल्या की मध्ये काहीही बदल केलेले नसतील, तर त्या की फाईलवर डबल क्लिक केल्याने ती रेजिस्ट्रीमध्ये आपोआप मर्ज होते.

नाहीतर त्या रेजिस्ट्री की फाईलवर राईट-क्लिक करून Merge हा पर्याय निवडा.

अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या व्हॅल्यूज बदलणे.

आतापर्यंत तुम्हाला रेजिस्ट्रीमधील निरनिराळ्या कीज मध्ये कसे नॅव्हिगेशन करावे आणि त्यांच्यामध्ये काही बदल करण्याअगोदर त्या कशा बॅकअप घेतल्या जातात, हे तुम्ही शिकलात.

निश्चितच आता हे बदल नेमके कसे केले जातात, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल.

रेजिस्ट्री व्हॅल्यूज (व्हॅल्युज) मुख्यत्वे तीन प्रकारच्या असतात, ज्यांच्यासह तुम्ही यानंतर काम करणार आहात:
STRINGS, DWORDS, आणि BINARY व्हॅल्यूज…
इतरही अनेक व्हॅल्यूज आहेत, पण त्या सर्वांपैकी या तीन किंमतींसह तुम्ही अगदी ९९% काम करणार आहात.

* अगोदरच असलेली STRING व्हॅल्यू बदलण्यासाठी, तीच्यावर डबल क्लिक करा आणि Value data मध्ये तुम्हाला हवी असलेली व्हॅल्यू टाका.

* अगोदरच असलेली DWORD व्हॅल्यू बदलण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय असतात, हेक्जाडेसिमल (१६ अंकी) आणि डेसिमल (दशमान) पद्धत…
येथे मात्र लक्षात ठेवा, तुम्ही कोणत्या पद्धतीचा वापर करून व्हॅल्यूज भरता आहात,
उदा. हेक्जाडेसिमल मधील २०० ही व्हॅल्यू डेसिमल पद्धतीमध्ये २५६ आहे, आणि डेसिमल मधील २०० साठी हेक्जाडेसिमल मधील c8 ही व्हॅल्यू आहे.

* बायनरी (द्विमान) व्हॅल्यूज बदलणं तसं जरा अवघड काम आहे, कारण त्या व्हॅल्यूज हेक्जाडेसिमल मध्ये लिहिलेल्या असतात. आवश्यक व्हॅल्यूज या दोन अंकी असतात आणि त्यांचा फॉर्मेट 00 01 02 0F FF असा काहीसा असतो आणि प्रत्येकीसोबत वेगवेगळ्या व्हॅल्यूज असतात. खालील चित्रातून तुम्हाला ह्याबद्दल थोडीशी कल्पना येईलच.


01 ते 00 किंवा 00 ते 01 अशा किंमतींशिवाय इतर बायनरी व्हॅल्यूज बदलण्याची प्रक्रिया किंचितच वापरली जात असेल.

नविन व्हॅल्यूज जोडणे

जुन्या (अगोदरच अस्तित्वात) असलेल्या व्हॅल्यूज बदलण्यासारखीच ही प्रक्रिया आहे, फक्त येथे तुम्हाला त्या जोडलेल्या किंमतीला नाव द्यावे लागते.

रेजिस्ट्री एडिटर मधील तुमच्या उजव्या बाजूला दिसणार्‍या मोकळ्या जागेत राइट-क्लिक करून New > String Value किंवा तुम्हाला हवी असलेली व्हॅल्यू निवडा.

आणि त्यानंतर तुम्हाला हवे असलेले नाव टाका.

त्यानंतर तुम्ही त्यात तुम्हाला हवी असलेली व्हॅल्यू टाकू शकता, जे की आपण मागील एका पायरीमध्ये पाहिले आहे (अगोदर असलेल्या व्हॅल्यूज बदलणे.), या पायरीतील प्रक्रियेप्रमाणे तुम्हाला हवी असलेली नविन व्हॅल्यू टाका.

नविन कीज जोडणे

नविन व्हॅल्यूज जोडण्याबरोबरच, जर तुम्ही रेजिस्ट्रीद्वारे ग्रुप पॉलिसी व्हॅल्युज जोडण्यासाठी प्रयत्न करीत असाल, तर ही माहिती तुम्हाला नक्कीच मदत करू शकेल.
तुम्हाला हव्या असलेल्या बहुतेक कीज बाय-डिफॉल्ट तेथे नसतात.

तर समजा तुम्हाला HKEY_CURRENT_USER\Software\Policies\Microsoft यामध्ये एक “की” जोडायची आहे, ती कशी जोडाल?

अगदी सोप्पं आहे, डाव्या बाजुला दिसणा‍र्‍या पॅनेलमधील फोल्डर ट्री मधील HKEY_CURRENT_USER\Software\Policies\Microsoft यावर राइट-क्लिक करून New > Key हा पर्याय निवडा.

आता तुम्हाला हवे असलेले नाव त्या “की”ला द्या.

व्हॅल्यूज आणि कीज उडवणे

सर्वात पहिले एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कीज किंवा व्हॅल्यूज उडवता, तेव्हा त्या कायमच्या उडवल्या जातात, कारण तेथे कोणत्याही प्रकारची रीसायकल बीन नसते, उडवलेल्या फाइल्स रीस्टोअर करण्यासाठी!! 😉

की किंवा व्हॅल्यू उडवण्यासाठी त्यांच्यावर राइट-क्लिक करून Delete हा पर्याय निवडावा.
अजुन एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एखादी “की” डिलीट करता, त्यावेळी त्या “की”च्या सब-कीज सुद्धा उडवल्या जातात!

रेजिस्ट्री फाइल्स लिहिणे

आता आपण थेट .reg फाइल्स लिहिण्याच्या आणि उडविण्याच्या प्रक्रियेकडे वळतो आहोत.
या प्रक्रियेसाठी शक्यतो नोटपॅड किंवा वर्डपॅड वापरा, फाइल लिहिल्यानंतर किंवा त्यात बदल केल्यानंतर ती फक्त .reg या एक्स्टेन्शनने सेव्ह करा.

XP किंवा 2000 या स्वादांसाठी रेजिस्ट्री फाइलची सर्वांत पहिली ओळ खालीलप्रमाणे असते.

Windows Registry Editor Version 5.00

सुचना: विन्डोज 98, ME, NT 4.0 यांसाठी वरील ओळीच्या ऐवजी खालील ओळ लिहावी.

REGEDIT4

आता Windows Registry Editor Version 5.00 या ओळीच्या आणि खालील ओळीच्या मध्ये एक मोकळी ओळ (एन्टर दाबून) सोडावी.
खालील ओळीमध्ये तुम्हाला बदल करावयाची असलेली “की” डिक्लेअर करावी लागेल, त्यासाठी ती ब्रॅकेट्स मध्ये लिहावी.
जर तुम्ही टाकलेल्या ठिकाणी ती “की” अगोदरपासून अस्तित्वात नसेल, तर तेथे ती नविन “की” जोडली जाते.

[HKEY_CURRENT_USER\Key\Subkey]

खालील ओळ जर “String 1” अस्तित्वात नसेल तर “String 1” बरोबर “String 2” अशी स्ट्रिंग तयार करेल, किंवा “String 1″ कडील व्हॅल्यू ” Value 1″ साठी बदलली जाईल.

"String 1"="Value 1"

खालील ओळीतील “Default 1” ही एक स्ट्रिंग आहे आणि त्यासाठी तुम्ही “ऍट” चिन्ह वापरू शकता.

@="Default 1"

जर तुम्ही DWORD व्हॅल्यूज बदलू किंवा नविनतम जोडू इच्छित असाल, तर तुम्हाला त्या हेक्जाडेसिमल मध्ये कशा लिहिल्या जातात, हे माहित असायला पाहिजे.
खालील ओळ “Dword 1” ही DWORD व्हॅल्यू डेसिमल मधील २० एवढी करेल. (येथे डेसिमल २० म्हणजेच आपण dword:00000014 असे लिहिले आहे.); ह्म्म, पण जर “Dword 1” जर अगोदरपासूनच अस्तित्वात असेल, तर ती स्वतःची व्हॅल्यू डेसिमल मधील २० एवढी बदलून घेईल!
या ठिकाणी फक्त एवढंच लक्षात ठेवा, dword:00000009 म्हणजे डेसिमल मधील ९, dword:0000000a म्हणजे डेसिमल मधील १०,….., dword:0000000f म्हणजे डेसिमल मधील १५, dword:00000010 म्हणजे डेसिमल मधील १६,…. आणि क्रमशः…. अशाप्रकारे…!

"Dword 1"=dword:00000014

आता आपण बायनरी व्हॅल्यूज बद्दल पाहू. खालील ओळ, “Binary 1” ही बायनरी व्हॅल्यू, 01 AA 05 55 एवढी करेल.

"Binary 1"=hex:01,AA,05,55

तर आतापर्यंत आपण HKEY_CURRENT_USER\Key\Subkey या ठिकाणी, रेजिस्ट्री फाइलमध्ये स्ट्रिंग, डिफॉल्ट, ड्वॉर्ड आणि बायनरी व्हॅल्यू कशा जोडाव्यात, ते पाहिले, त्याचा एक ओव्हरव्ह्यू खालीलप्रमाणे:


Windows Registry Editor Version 5.00

[HKEY_CURRENT_USER\Key\Subkey]
“String 1″=”Value 1″
@=”Default 1”
“Dword 1″=dword:00000014
“Binary 1″=hex:01,AA,05,55

आता अशा रेजिस्ट्री फाइल्सच्या मदतीने व्हॅल्यूज किंवा कीज कशा उडवल्या जातात ते आपण पाहू.

जर तुम्हाला एखादी “की” उडवायची असेल, तर त्यापुढे (कीच्या सुरूवातीलाच) फक्त एक हायपेन/डॅश/मायनस (-) फाइलमध्ये लावावे.

[-HKEY_CURRENT_USER\Key\Subkey]

जर तुम्हाला एखादी व्हॅल्यू उडवायची असेल (मग ती कोणत्याही प्रकारची असेल), तर त्यासाठी रेजिस्ट्री फाइलमध्ये त्या व्हॅल्यूला मायनस (-) ही व्हॅल्यू असाइन करावी.


"String 1"=-

@=-

“Dword 1″=-

“Binary 1″=-

आता उदाहरणासाठी जर तुम्हाला एका रेजिस्ट्री फाइलमधील, HKEY_CURRENT_USER\Key\Subkey1 या “की”मधील “Dword 1” या ड्वॉर्ड ची व्हॅल्यू डेसिमल मधील १ अशी करायची आहे आणि “String 1” ही व्हॅल्यू उडवायची आहे; तसेच, HKEY_CURRENT_USER\Key\Subkey2 ही “की” उडवायची आहे, खालील कोडींगवरून तुम्हाला ह्या गोष्टी आणखी चांगल्या प्रकारे समजू शकतील:


Windows Registry Editor Version 5.00

[HKEY_CURRENT_USER\Key\Subkey1]
“Dword 1″=dword:00000001
“String 1″=-

[-HKEY_CURRENT_USER\Key\Subkey2]

आता शेवटची गोष्ट, रेजिस्ट्री फाइलमध्ये कमेंट कशी द्यावी, जेणेकरून तुम्ही नंतर भविष्यात कधी ती फाइल पुन्हा एडिट कराल, तेव्हा तुम्हाला काय लिहिले आहे, ते कळायला पाहिजे ना!

कमेन्ट देण्यासाठी त्या ओळीच्या सुरूवातीला सेमीकोलन (;) द्यावा, ज्यामुळे ती ओळ रेजिस्ट्री फाइलमध्ये इग्नोअर केली जाते, म्हणजेच एकप्रकारे कमेंटसारखीच काम करते.


Windows Registry Editor Version 5.00

[HKEY_CURRENT_USER\Key\Subkey1]
;This changes the dword to equal 1 (ही एक कमेंट आहे.)
“Dword 1″=dword:00000001
;This deletes the string value (ही सुद्धा एक कमेंट आहे.)
“String 1″=-

;This deletes the key Subkey2 (आणि ही सुद्धा!)
[-HKEY_CURRENT_USER\Key\Subkey2]

धन्यवाद!

फिबोनाकी सिरीज- Fibonacci Series

सदर  post, वेदांग मणेरीकर द्वारा प्रकाशित  Fibonacci Numbers या लेखाचे भाषांतर असून,   http://mytechrants.wordpress.com च्या माध्यमातून घेतले आहे. याचे मराठी भाषांतर अभिजीत वैद्य  यांनी केले आहे.

माझ्या मते हा ब्लॉग वाचणार्‍या सगळ्यांना, फिबोनाकी सिरीज (Fibonacci series) माहीत असेल. ही सिरीज अशी आहे –

0, 1, 1, 2, 3, 5, 8, 13, 21, 34…, infinity पर्यंत

या सिरीजमध्ये प्रत्येक संख्या ही आधीच्या २ संख्यांची बेरीज असते.

F(n) = F(n-1) + F(n-2)

आणि ,

F(0) = 0

F(1) = 1

एक सोपी युक्ती
मैल या परिमाणात व्यक्त केलेले अंतर किलोमीटरमध्ये कसे रुपांतरीत करायचे ? तुम्ही फिबोनाकी सिरीज वापरू शकता. ५ मैल म्हणजे ८ किलोमीटर.(अधिक अचूकपणे ८.०४५ किमी.) ८ मैल म्हणजे १३ किमी(१२.८७ किमी.), १३ मैल म्हणजे (तुमचा अंदाज बरोबर आहे !) २१ किलोमीटर. (२०.९१७ किमी.). पण हे तर फक्त फिबोनाकी नंबर्सनाच चालते. जरा थांबा ! समजा तुम्हाला २० मैल चे किलोमीटर मध्ये रुपांतर करायचे आहे. तर मग २० ला फिबोनाकी नंबर्सच्या बेरजेमध्ये व्यक्त करा.

२० = १३ + ५ + २
आता प्रत्येक संख्या मैल-किलोमीटर सूत्रानुसार रुपांतरीत करा.
= २१ + ८ + ३
= ३२

अचूकपणे, २० मैल म्हणजे ३२.१८ किमी. होते.

याच्यामागचे Logic काय आहे याचा अंदाज येतोय का ? त्याचे कारण असे आहे –

मैल मधून किलोमीटर मध्ये रुपांतर करण्यासाठी १.६०९ ने गुणावे लागते. फिबोनाकी सिरीज ची एक अत्यंत interesting property आहे – फिबोनाकी सिरीज मधील लागोपाठच्या २ संख्यांचा ratio (१. ६१८) हा Golden ratio च्या आसपास जातो.  आता कळले रहस्य ?

सदर  post, वेदांग मणेरीकर द्वारा प्रकाशित  Fibonacci Numbers या लेखाचे भाषांतर असून,   http://mytechrants.wordpress.com च्या माध्यमातून घेतले आहे. याचे मराठी भाषांतर अभिजीत वैद्य  यांनी केले आहे.