टेक मराठी विषयी

अनेक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, गृहिणी, मराठी व्यावसाईक अशा अनेक मराठी भाषिकांना टेक्नॉलॉजीबद्दल उत्सुकता, शिकण्याची आवड असते परंतू केवळ भाषेच्या अडचणीमुळे टेक्नॉलॉजीबद्दल अशा उपयुक्त माहितीपासून तसेच शिकण्यापासून वंचित रहावे लागते. किंवा ही सर्व माहिती केवळ इंग्रजी भाषेतूनच उपलब्ध असल्याने आपल्याला अतिशय उपयोगी असलेल्या सुविधा आपण वापरूच शकत नाही. ही निर्माण झालेली दरी कमी करून आपल्या मातृभाषेत अर्थात मराठीमध्ये ही माहिती  उपलब्ध झाल्यास, त्याचा फायदा आपल्या मराठी भाषिक वर्गास व्हावा यासाठी टेक मराठी प्रामुख्याने कार्यरत आहे.

टेक्नॉलॉजी आपल्याला अनेक पर्याय उपलब्ध करून देते. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात मोबाईल फोन्सपासून ते कॉम्पुटरपर्यंत अनेक गोष्टींद्वारे मुक्तहस्ते  टेक्नॉलॉजीचा वापर करतो. टेक्नॉलॉजी आपले जीवन सुसह्य करतो. तेव्हा नवनवीन येणा-या टेक्नॉलॉजीबद्दल आपण माहिती मिळवणे ही फार उपयुक्त आणि फायद्याचे आहे. हा दृष्टीकोन ठेऊन टेक मराठी,  टेक्नॉलॉजीविषयी अनेक विषयांवर लेख, सभा, कार्यशाळा आयोजित करते आणि टेक्नॉलॉजीविषयी माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाविण्याचे काम करते.

गेल्या वर्षापासून टेक मराठी ई-दिवाळी अंक देखील प्रकाशित करते.