CTMS: औषध परीक्षणाचे जग

आपण जेव्हा एखाद्या दुकानात औषध आणायला जातो तेव्हा आपण डॉक्टरने दिलेले प्रिस्क्रीप्शन/चिठ्ठी दाखवतो आणि दुकानदार जे देईल ते औषध  expiry date  उलटून गेली नाही ना एवढे पाहून घरी घेऊन येतो. यामधे ते औषध कोणी तयार केले आहे; ते चांगले आहे की नाही;त्याचे काही  side effects  आहेत का; कोणती २ औषधे बरोबर घेतली तर चालतील हे विचार आपण करत नाही. आपण डॉक्टर वा औषध दुकानदारावर पूर्ण विश्वास दाखवतो. याचे महत्वाचे कारण म्हणजे हे प्रत्येक औषध वेगवेगळ्या चाचण्या उत्तीर्ण करून नंतर बाजारात उपलब्ध होते. या सर्व चाचण्या  CRO (Clinical Research Organization मधे केल्या जातात. यात भारतातील  IT sector  चा मोठा हातभार लागतो.

Clinical Trial Management System(CTMS)   सारखी  softwares वापरून खूप मोठ्या प्रमाणात अशी माहिती संग्रही ठेवता येते. सर्वप्रथम  CRO मधे औषध चाचणीसाठी पाठविण्यात येते. याला  Test Drug  म्हणतात.  याची तुलना चाचणी पुर्वीपासून बाजारात विकल्या जाणाऱ्या औषधाबरोबर केली जाते. उदा. ’क्ष’ हे नवीन औषध ताप उतरावा म्हणून शोधले गेले आहे. याची चाचणी पूर्वमान्य  crocin या  reference drug  बरोबर केली जाते. प्रथम चाचणीची नियमावली  (protocol)  तयार केली जाते. ह्यात प्रयोग किती माणसांवर करण्यात येईल, किती दिवस चाचणी केली जाईल ह्यासाठीचे नियम ठरवले जातात. समजा यामधे २० माणसांवर करायचा, त्यांना एकूण ५ वेळा औषध द्यायचे, त्यात २वेळा नवीन आणि ३ वेळा जुने औषध द्यायचे. औषध देण्याआधी  आणि देऊन झाल्यावर त्यांच्या वजन, रक्तदाब,रक्ततपासणी अशा चाचण्या होतात आणि ही सर्व प्रक्रिया ३ वेळा काही दिवसांच्या अंतराने करावी … अशा गोष्टी नियमावलीमधे ठरविल्या जातात. ही सर्व माहिती CTMS   चा वापर करून  database  मधे साठविली जाते. ही नियमावली अधिकारी व्यक्तीच्या परिक्षणानंतरच मान्यताप्राप्त मानली जाते. अशी मान्यताप्राप्त नियमावली तयार झाल्यावर  case study  साठी काही व्यक्तिंची पूर्वचाचणी  (screening) द्वारे निवड करण्यात येते.

चाचणी दरम्यान हे  volunteers CRO  मधे रहायला येतात. त्यांच्या आहाराच्या , औषधांच्या ,चाचण्या करून त्याच्या नोंदी करण्याच्या वेळा सांभाळण्यासाठी  supervisors  नेमलेले असतात. ठरल्याप्रमाणे चाचण्या झाल्यावर त्यातून आलेले निष्कर्ष विश्लेषणाकरिता पाठविले जातात. य़ाला  bioanalytical phase  म्हणतात.

 

चाचणीदरम्यान कुणालाही काही त्रास/आजार झाल्यास अथवा औषधाचा वाईट परिणाम झाल्यास डॉक्टरांची त्वरित मदत मिळते. ही माहितीदेखील विश्लेषणाबरोबर पाठविली जाते. वेगवेगळ्या स्तरांवर औषधाच्या गुणधर्मांची खातरजमा झाल्यावरच त्याला  FDA (Food and Drug Administration) association ची मान्यता मिळते. यानंतरच अशी मान्यताप्राप्त औषधे  बाजारात विकण्याचा परवाना मिळतो.

 

भारतात नवनवीन औषधांची निर्मिती अविरत होत असते. आयुर्वेद आणि समचिकित्सा शास्त्रातील सखोल ज्ञानाचे मूळ भारतात पूर्वापार आहेच.हे वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान आपण नवीन पद्धतीने लोकांसमोर आणू शकलो तर भारत  Health Care  आणि Information Technology  या दोनही क्षेत्रातील माहिती अतिशय उत्तम रितीने जगासमोर मांडू शकतो.

 

सध्या आपण औषधांना मान्यता मान्यता मिळण्याची जी प्रक्रिया पाहिली ती  Digital Data Storage  आणि  software  च्या सहाय्याने पूर्ण करू शकलो तर आपण  healthcare  आणि  Information Technology च्या क्षेत्रात अग्रेसर राहू शकतो. कागद , फाईल्स असं काहीही न सांभाळता एका  Mouse Click  वर केस स्टडी मधे सहभागी झालेल्या व्यक्तींची माहिती फक्त बघताच येणार नाही तर अनेक वर्षे उपलब्ध राहिल व  Digital Media मधून जगासमोर सादर करता येईल.

या सर्व प्रक्रियेत, भारताकडे जे सखोल ज्ञान आहे, ते लवकरात लवकर, उत्तम प्रकारे लोकांसमोर आणता येईल.त्यातून भारत अग्रगण्य होण्यायोग्य कसा आहे हे पटवता येईलच आणि त्या बरोबरच योग्य ती प्रतिष्ठा आणि जगन्मान्यता देखील मिळेल यात संभ्रम नाही.

सुप्रिया गोडबोले.

सिनीअर सॉफ्टवेअर टेस्ट डिझायनर

बायो ऍनालिटिकल टेक्नॉलॉजीज, पुणे.

One thought on “CTMS: औषध परीक्षणाचे जग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *