संपादकीय..

प्रिय वाचकहो,

सर्वत्र प्रकाशाचा उत्सव साजरा होत असताना टेक मराठीचा हा दिवाळी अंक आपणांस आनंदाने अर्पण करतो आहोत. 

तंत्रज्ञानाच्या कक्षा क्षणोक्षणी रुंदावत असता मराठी वाचक केवळ आंग्लभाषेच्या अल्प ज्ञानामुळे मागे राहू नये अशा प्रामाणिक इच्छेने अनेक विद्वान मराठीतून लेखन करीत असतात. अशाच कांहींचे नवीन लेखन येथे मांडले आहे.

टेक मराठीच्या कार्याविषयी आपुलकी असल्याने यातील एकाही लेखकाने मानधन घेतलेले नाही हे त्यांचे मोठेपण आहे. 

या अंकात माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीबद्दल तसेच ‘योजक’, ‘सेवा सहयोग’ आदि संस्थांच्या महत्वपूर्ण कार्याबद्दलही माहिती आहे. विविध विषयांनी नटलेला हा अंक वाचकांना नक्कीच आवडेल अशी आशा आहे.

या अंकासाठी मदत केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार. 

वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया sampadak@techmarathi.com वर अवश्य पाठवाव्यात, ही विनंती.

आपला,

प्रशांत पुंड

संपादक, टेक नराठी दिवाळी अंक २०१६.