Localhost वर WordPress कार्यान्वित कसे कराल?

WordPress कार्यान्वित कसे कराल?

तुमच्या संगणकावर वर्डप्रेस कार्यान्वित करण्यासाठी संगणकावर WAMP सर्ह्वर असणे गरजेचे आहे. WAMP सर्ह्वर कसा कार्यान्वित करायचा ते तुह्मी् येथे पाहू शकता. या लेखात आपण wordpress कसे कार्यान्वित करायचे ते पाहू.

WordPress तुह्मी येथून डाउनलोड करू शकता.

१. तुह्मी डाउनलोड केलेली फाइल unzip करा.
२. वर्डप्रेस कार्यान्वित करण्यासाठी तुम्हाला तुमच्या वेब सर्ह्वरवर डेटाबेस तयार करावा लागतो. तो तुह्मी खाली दिल्याप्रमाणे तयार करू शकता.

->खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे तुमच्या संगणकावरील WAMP सर्ह्वरच्या आयकॉनवर क्लिक करा व त्यावरील phpMyAdmin हा पर्याय निवडा.

-> खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे तुह्माला हवे असलेले डेटाबेसचे नाव लिहा व Create या बटनावर क्लिक करा. अशाप्रकारे तुमचा डेटाबेस तयार होईल.

३. तुमच्या wordpress फोल्डरमधील wp-config-sample.php ह्या फाइलचे नाव wp-config.php असे बदला .

४. त्यानंतर wp -config.php ही फाइल text editor मध्ये उघडा व त्या फाइलमध्ये तुमच्या डेटाबेसचे details लिहा व ती फाइल जतन( save ) करा.

५. त्यानंतर तुमचा wordpress फोल्डर तुमच्या web server च्या root directory (C:\ WAMP \ www) मध्ये जतन करा.

६. तुमच्या web browser वर wp-admin/install.php run करा म्हणजे तुमच्या localhost वर wordpress कार्यान्वित होईल.

लेखक सायली गद्रे

Software professional,working on .NET Technology

5 thoughts on “Localhost वर WordPress कार्यान्वित कसे कराल?”

 1. अतिशय सुंदर लेख, जमल तर Linux वर हि काही लिहिता आले तर सांगावे .

  WAMP सर्ह्वर कसा कार्यान्वित करायचा ते तुह्मी् “येथे” पाहू शकता.
  “येथे” ला बहुदा नझर चुकीने स्काईप ची लिंक दिली गेली आहे.
  कृपया योग्य तो बदल करावा.

 2. धन्यवाद, linux वरही लिहिण्याचा प्रयत्न करेन.

  link बदलली आहे. सुचनेबद्दल आभार…

 3. सायली छान लिहिले आहेस..पण डेटाबेस बनवायच्या पायर्‍या अधिक स्पष्ट लिही..कारण नवख्या युजर ना नेमकी काय करायचे ते कळत माही त्यामुळे स्क्रीनशॉटचा जास्त वापर कर. 🙂 database तयार केल्यावर Privileges मध्ये जावून add user करणे ..पासवर्ड सेट करणे इत्यादी. तसे जर केले तर पायरी क्रमांक ३,४ ची गरज लागणार नाही.कोणी सामान्य वाचक ज्याला संगणकाची थोडी बहुत माहिती आहे तो सहज ते करू शकेल.मग फक्त एक दुवा ब्राउजर मध्ये टाईप केला की सेट-अप आपोआप सुरू, तो ही नजरे समोर.

  मी XAMPP वापरून हे सर्व कसे करायचे ते खालील दोन दुव्या वर लिहिले आहे.
  तुमचा WordPress Blog घरच्या संगणकावर कसा सुरु कराल? (भाग-१)
  http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/05/wordpress-blog.html
  तुमचा WordPress Blog घरच्या संगणकावर कसा सुरु कराल? (भाग-२)
  http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/05/wordpress-blog_26.html

  धन्यवाद,
  प्रशांत दा. रेडकर

 4. नमस्ते
  धन्यवाद !
  मी joomla & sobipro स्वतः शिकत आहे जर त्यावर काही लिहिले तर आवडेल

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत