नमस्कार!

मराठी भाषेवरील प्रेमातून आणि टेक्नॉंलॉंजी मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याच्या ध्यासातून, ‘टेक मराठी’ ही चळवळ उभी राहिली. सभा, व्याख्याने आणि लेखांच्या सहाय्याने टेक्नॉंलॉंजीची विविध अंगे, नवोदित ते जाणकार अशा सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्याचे काम टेक मराठी करत आहे. मराठीवर प्रेम करताना इंग्रजीचा तिरस्कार अजिबात करायचा नाही. पण टेक्नॉंलॉंजी फक्त इंग्रजीतूनच समजवावी किंवा समजावी; हे बंधन आम्ही झुगारून देत आहोत. भाषा ही केवळ माध्यम असल्याने ज्ञानासाठी भाषेचा अडसर येत कामा नये , ही मुख्य भूमिका आहे. आम्हांला टेक्नॉंलॉंजीमधल्या प्रत्येक शब्दाला मराठी प्रतिशब्द तयार करायचा नाही. पण आपण आपल्या मातृभाषेत उत्तम संवाद साधू शकतो; हे सत्य आहे. अशा या चळवळीला एक व्यापक आणि भक्कम स्वरूप देण्याच्या उद्देशाने एक महामेळावा आयोजित करीत आहोत. आपण सॉंफ्टवेअर किंवा आय.टी. मध्ये काम करीत असाल; किंवा त्या क्षेत्राशी संबंधित असाल, किंवा त्याविषयी जाणून घ्यायचं असेल आणि आपल्या मातृभाषेविषयी आदर व प्रेम व्यक्त करायचं असेल तर हा महामेळावा आपणांसाठी आहे. इथे अनेक नामवंत, ज्ञानी गुरुजन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. ‘नवोदित ते जाणकार ‘ असा श्रोतृवर्ग इथे असेल. प्रत्येक स्तराप्रमाणे विविध व्याख्याने आयोजित केलेली आहे. सर्व मराठी जनांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा.

कधी?

दि. १० व ११ डिसेंबर २०११

७ व ८ जानेवारी २०१२

कुठे?

Symbiosis Institute Of Comp. Studies & Research(SICSR), अतुर सेंटर, गोखले क्रॉस रोड, मॉडेल कॉलनी, पुणे.

Google Map: http://bit.ly/93USLP

नोंदणी?

नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश नोंदणी सदरात याबद्दल माहिती दिली आहे.