टेक मराठी महामेळावा दि. ७ व ८ जानेवारी २०१२ रोजी पुणे येथे संपन्न होणार आहे. या महामेळाव्यात टेक्लॉलॉजी संदर्भात मराठीतून व्याख्याने आयोजीत केली जातील. या संधीचा फायदा घेऊन आपण जर वक्ते म्हणून कोणताही टेक्निकल विषय सादर करू इच्छित असाल तर टेक मराठी आपणांस सस्नेह आपल्या व्याख्यानाचा प्रस्ताव सादर करण्यासाठी आमंत्रित करीत आहे.
टेक मराठी प्रथमच “टेक्नॉलॉजीबद्दलच्या गप्पा मराठीतून” या संकल्पनेसह महामेळावा आयोजीत करीत आहे. तेव्हा ह्याचा व्यासपीठ म्हणून फायदा करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचू शकता.

यामध्ये दोन वर्ग आहेत,नवोदित आणि जाणकार. यांपैकी काही व्याख्याने ठरली आहेत. ती आपण व्याख्याने या सदरात पाहू शकता.
आपल्या प्रस्तावासाठी काही सूचना:
१. आपण टेक्नॉलॉजीबद्दल कोणताही विषय घेऊन व्याख्यान देऊ शकता.
२. आपला अपेक्षित श्रोतृवर्ग हा “नवोदित ते जाणकार” (नवशिके आणि  टेक्नॉलॉजीबद्दल काही जाण  असलेले ) असा आहे, त्या अनुशंगाने विषय ठरवावा.
३. आपला प्रस्ताव आमच्या अंतर्गत निवड समितीद्वारे तपासून मगच स्वीकारला जाईल.

कृपया आपला प्रस्ताव पुढील रकान्यातील माहितीसह आम्हाला पाठवावा.

नाव (required)

ई-मेल (required)

मोबा. नं (required)

विषय

व्याख्यानाबद्दल संक्षिप्त माहिती

व्याख्यानातून श्रोत्यांना काय मिळेल?

स्वत:विषयी

 

**प्रस्ताव पाठवायची अंतिम तारीख २५ डिसेंबर २०११ ही आहे.