आपण स्पर्धेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार. निबंध स्पर्धेचा निकाल लवकरच घोषीत करण्यात येईल.

 

 

टेक मराठी महाविद्यालयीन व पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजीत करीत आहे. त्याचे विषय पुढीलप्रमाणे:

महाविद्यालयीन (११वी व १२ वी) गटासाठी:

१. इंटरनेटचा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयोग
२. कॉम्प्युटर – काल आणि आज
शब्दमर्यादा: १००० शब्द

पदवीच्या गटासाठी:

१. सोशल नेटवर्किंग- प्रभाव व परिणाम
२. ई-वेस्ट : कारणे व उपाय
शब्दमर्यादा: १००० शब्द

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियम:

१. ही स्पर्धा महाविद्यालयीन व पदवीच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे.

२. आपला निबंध तुम्ही ई-मेलद्वारे essay@techmarathi.com या पत्यावर पाठवू शकता.

३.निबंध पोस्टाने पाठवण्यासाठीचा पत्ता:

टेक मराठी
ई-२/१७, विनायक बिल्डींग,
चिंतामणी नगर -१, बिबवेवाडी,
पुणे -३७

४. निबंधासाठीची भाषा मराठी असली तरी टेक्निकल शब्द इंग्रजीमधे लिहिले तरी चालतील (जसे की: कॉम्प्युटर, प्रोग्रॅम, इंटरनेट इ.)

५. निबंध पाठविण्याची अंतिम तारीख १० नोहेंबर २०११ आहे.