जूमला डे २०११

जूमला ह्या सी.एम.एस. (Content Management System) वर, दोन दिवसाचा माहितीपर कार्यक्रम दर वर्षी आयोजीत केला जातो. या वर्षी हा कार्यक्रम दि. १२ व १३ मार्च २०११ रोजी पुण्यामधे आयोजीत केला आहे.
सी.एम.एस. डेव्हलपर्स, डिझायनर्स, युजर्स व याविषयी जाणून घेण्यास उत्सुक सर्वांसाठी हा अतिशय उपयुक्त कार्यक्रम आहे. यामधे या क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींचा समावेश असेल.

दि. १२ व १३ मार्च २०११. शनिवार व रविवार
स्थळ:
बजाज गॅलरी,
एम सी सी आय ए ट्रेड टॉवर,
५ वा मजला, इंटरनॅशनल कनव्हेन्शनल सेंटर,
सेनापती बापट मार्ग,
पुणे

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
हा कार्यक्रम विनामूल्य आहे मात्र येथे नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

तुमच्या घरचे वायरलेस नेटवर्क(Wi-Fi) कसे सुरक्षित ठेवाल? (भाग-१)

<सदर लेख श्री. प्रशांत रेडकर यांनी लिहिला असून तो http://prashantredkarsobat.blogspot.com/2010/12/wi-fi.html येथे प्रकाशित केला आहे. या ठिकाणी काही भाग पुन:प्रकाशीत केला आहे. वरील ठिकाणी आपण पूर्ण लेख वाचू शकता.>

वायरलेस नेटवर्क म्हणजे काय?
नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे..सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर ज्या  कनेक्शनसाठी वायरचा उपयोग  होत नाही…ते वायरलेस…वायरलेस कनेक्शनचा वापर आपण लॅपटॉप,संगणक सारख्या उपकरणात आपण करतो..कारण वायरने नेट जोडण्याची कटकट नसल्याने ते आपण घरात कुठेही बसून आरामात वापरू शकतो.

खालील कारणामुळे ते जास्त धोकादायक आहे.

१)जर तुम्ही पोस्ट्पेड प्लॅन वापरत असाल तर तुम्हाला तुमच्या वापरापेक्षा कित्येक पटीने जास्त बिल येवू शकते.


२)जर दुसरे कोणी तुमचे वायरलेस नेटवर्क चोरून वापरत असेल तर इंटरनेटची बॅन्डविथ शेअर होत असल्यामुळे तुम्हाला इंटरनेट स्पीड कमी मिळतो.


३)आणि सर्वात मोठा धोका असतो तो हॅकिंगचा..जर तुमचे वायर नेटवर्क हॅक करून कोणी  तुमची खाजगी माहीती चोरली,तिचा वाईट वापर केला तर तुम्ही काय कराल???

तुमच्या घरच्या वायरलेस नेटवर्कला हॅकिंग पासून कसे सुरक्षित करायचे ते आपण पुढच्या भागामध्ये पाहू.

धन्यवाद.

<सदर लेख श्री. प्रशांत रेडकर यांनी लिहिला असून तो http://prashantredkarsobat.blogspot.com/2010/12/wi-fi.html येथे प्रकाशित केला आहे. या ठिकाणी काही भाग पुन:प्रकाशीत केला आहे. वरील ठिकाणी आपण पूर्ण लेख वाचू शकता.>

उबुंटु प्रणाली संगणकावर कार्यान्वयीत करणे.

मागच्या लेखात आपण उबुंतू प्रणाली बद्दल थोडक्यात माहिती पहिली.
आता आपण ती कार्यान्वयीत कशी करायची ते पाहू . त्याच्या वेगवेगळ्या पायर्‍या आहेत.

मागच्या लेखात आपण उबुंटु प्रणाली बद्दल थोडक्यात माहिती पहिली.
आता आपण ती कार्यान्वयीत कशी करायची ते पाहू . त्याच्या वेगवेगळ्या पायर्‍या आहेत.

पायरी  १.   प्रथम संगणकाच्या  ” BIOS” settings मध्ये जाऊन  boot priority option “CD” असा ठेवा आणि नंतर उबुंटु १०.१० ची CD , CD ड्राइव्हमधे ठेऊन पुन्हा: चालू (Restart) करा. (म्हणजे तुमचा संगणक तुम्ही टाकलेल्या उबुंटु १०.१० ची CD वापरून चालू होईल …)

पायरी  २.   संगणक चालू झाल्यावर तुम्हाला निवड करण्यासाठी मेनू दिसेल. त्यातल्या “Boot  From CD ” या पर्यायावर जाऊन enter करा.   त्यातल्या   ” Install Ubuntu 10.10 ” या आयकॉनवर क्लीक  करा.

पायरी  ३.    एक नवीन विंडो दिसेल. त्यातला  “English”  पर्याय निवडून  ” Forward ” या बटणावर क्लिक करा.

पायरी  ४.     पुढची विंडो तुमच्या संगाणकाची माहिती दर्शवेल. (उर्वरित रिकामी जागा ई..)  ” Forward ” या बटणावर क्लिक करा.

पायरी  ५.     पुढची विंडो तुम्हाला कोठे  ” Install ” करायचे ते विचारेल.  शेवटचा पर्याय  ” Specify partition manually ” निवडा आणि  ” Forward ” या बटणावर क्लिक करा.

पायरी   ६.    पुढची विंडो तुम्हाला कोणत्या  ” partition ”  वर  ”  install ”   करायचे आहे ते विचारेल.

हिरवा पट्टा (sda1) हे माझ्या  हार्ड डिस्कचे पहिले partition आहे. त्यावर  ” Windows ”   इंस्टॉल आहे. भगवा आणि निळा हे माझे दुसरे दोन  partition आहेत.  पांढरा पट्टा म्हणजे ते रिकामी जागा (free space) आहे. आपण त्याच्यावर उबुंटु install करणार आहोत. त्याच्या खालच्या तक्त्यात (10818 MB) free space वर जाऊन  ” Add ”  हे  बटण दाबा.

याठिकाणी आपल्याला लागणारी जागा मोजण्यासाठी पुढील सूत्र तुम्ही वापरू शकता.

रॅम २ जी.बी. पर्यंत असल्यास:

swap partitions = रॅमची साईज (RAM Size) * २

जर रॅम २ जी.बी. पेक्षा जास्त असेल तर:

swap partition = रॅमची साईज (RAM Size) * १

** जर तुमच्या हार्ड डिस्कवर पुरेशी जागा असेल तर कधीही रॅमची साईज (RAM Size) * २ हे सूत्र वापरणे उत्तम.

रूट पार्टीशनसाठी ५० जी.बी. एवढी जागा पुरेशी असते, जर हार्ड डिस्कची जागा कमी असेल तर २० जीबी एवढी ठेवली तरी चालते.पायरी ७.  ” Create New Partition ”   नवीन  विंडो  उघडेल.  New partition size  आणि  Mount  Point  ” /  ”  निवडून  ” Ok ” वर क्लिक करा.

पायरी ८.   पुढची  विंडो तुमचे तयार झालेले  ” partition ” दाखवेल.  (/dev/sda8).  आता  उर्वरित  free  space वर क्लिक करून  ” Add ”  हे बटण दाबा.

पायरी ९.   परत ” Create New Partition ”   नवीन  विंडो  उघडेल.  New partition size  आणि  Use as : ” swap area ” निवडून  ” Ok ” वर क्लिक करा.

पायरी  १०.  पुढची  विंडो तयार झालेले नवीन ” Partition ” दाखवेल.  ” Boot  loader ”  ” /dev /sda ” निवडून  ” इंस्टॉल नाऊ ” वर क्लिक करा.

पायरी  ११.  Where are you ?   Time  Zone  Kolkata  निवडून  ” Forward ”  वर क्लिक करा.

पायरी १२.   Keyboard  layout   ” USA ” निवडून  निवडून  ” Forward ”  वर क्लिक करा.

पायरी १३.   Who are you ?  पूर्ण माहिती भरून  ” Forward ”  वर क्लिक करा.

पायरी १४.   Welcome  Window, इनस्टॉलेशनची प्रगती दर्शवेल.

ती  पूर्ण झाल्यावर संगणक परत चालू होण्या पूर्वी  “CD”  काढून  ” BIOS ”  मधून  ” Boot priority ”  परत  ” Hard Disk  ”  ठेवा आणि संगणक परत चालू करा.

अभिनंदन आपण यशस्वीरीत्या उबुंटु इंस्टॉल केले!

या लेखात काही नविन मुद्दे श्री. नरेश खलासी यांच्या सुचनांनुसार जोडले आहेत.

टेक- वीकएंड-५ – क्लोजर, अरलॅंग, फंक्शनल प्रोग्रॅमिंग

तुम्ही कधी क्लोजर, अरलॅंग, फंक्शनल प्रोग्रॅमिंग, स्काला याबद्दल ऐकले आहे का? या सर्व भाषा काय आहेत, त्यात काय नविन आहे याचा विचार केला आहे का? या सगळ्यावर प्रकाश टाकण्यासाठी खास सत्र येत्या शनिवारी वयाना सर्विसेस आणि टेक वीक एंड पुणे संयुक्तपणे आयोजीत केले आहे. जर तुम्ही सॉफ्ट्वेअर क्षेत्रात काम करत असाल आणि याबद्दल काही ऐकले नसेल तर आत्ताच याबद्दल वाचायला सुरुवात करा आणि या सत्राला आवर्जून उपस्थित रहा.

ऑबजेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग या मर्यादेपलिकडे जाऊन आता फंक्शनल प्रॉग्रॅमिंग लॅग्वेजेसकडे जसं की, क्लोजर, अरलॅंग यांकडे अनेक जण वळत आहेत आणि पुढील जनरेशनचे प्रोडक्ट्स बनवत आहेत. याबद्दल अधिक माहितीसाठी येत्या शनिवारी जरूर उपस्थित रहा

तुम्ही कधी क्लोजर, अरलॅंग, फंक्शनल प्रोग्रॅमिंग, स्काला याबद्दल ऐकले आहे का? या सर्व भाषा काय आहेत, त्यात काय नविन आहे याचा विचार केला आहे का? या सगळ्यावर प्रकाश टाकण्यासाठी खास सत्र येत्या शनिवारी वयाना सर्विसेस आणि टेक वीक एंड पुणे संयुक्तपणे आयोजीत केले आहे. जर तुम्ही सॉफ्ट्वेअर क्षेत्रात काम करत असाल आणि याबद्दल काही ऐकले नसेल तर आत्ताच याबद्दल वाचायला सुरुवात करा आणि या सत्राला आवर्जून उपस्थित रहा.

ऑबजेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग या मर्यादेपलिकडे जाऊन आता फंक्शनल प्रॉग्रॅमिंग लॅग्वेजेसकडे जसं की, क्लोजर, अरलॅंग यांकडे अनेक जण वळत आहेत आणि पुढील जनरेशनचे प्रोडक्ट्स बनवत आहेत. याबद्दल अधिक माहितीसाठी येत्या शनिवारी जरूर उपस्थित रहा

विषय:

१. फंक्शनल प्रोग्रॅमिंग काय आहे आणि ते का वापरावे?

–  वक्ते: धनंजय नेने

२. अरलॅंगची  ओळख

– वक्ते: भास्कर कोडे

३. क्लोजर व “एक्सप्रेशन प्रोबलेमचे” सोल्युशन

– वक्ते: बैशंपायन घोष

हे सत्र सर्वांसाठी विनामूल्य आहे मात्र नोंदणी आवश्यक आहे. यासाठी येथे क्लिक करून आपण नोंदणी करू शकता.

स्थळ:

एम. सी. सी. आय ए. , सुमंत मूळगावकर ऑडिटोरियम, आय. सी. सी. टॉवर, ए विंग, ग्राऊंड फ्लोअर, एस बी रोड, पुणे

वेळ:

सकाळी १० ते  दुपारी १ .

अधिक माहीतीसाठी पहा: http://punetech.com/clojure-erlang-functional-programming-intro-to-fp-why-its-important-techweekend5-18-dec/

स्वयंसेवकांसाठी आवाहन

टेक मराठीला आणखी पुढे नेण्यासाठी, आणखी भरीव काम करण्यासाठी आता आणखी
लोक एकत्र येणे गरजेचे आहे. त्यामुळे येथे आम्ही रीतसर आवाहन करतो आहोत.
टेक मराठीच्या नियमीत सभेसाठी, कामकाजासाठी आणखी स्वयंसेवकांची
(volunteers) आवश्यकता आहे.

नमस्कार,
टेक मराठीला आणखी पुढे नेण्यासाठी, आणखी भरीव काम करण्यासाठी आता आणखी
लोक एकत्र येणे गरजेचे आहे. त्यामुळे  येथे आम्ही रीतसर आवाहन करतो आहोत.
टेक मराठीच्या नियमीत सभेसाठी, कामकाजासाठी आणखी स्वयंसेवकांची
(volunteers) आवश्यकता आहे. टेक मराठी अंतर्गत दि. ८ जानेवारी रोजी NGO
साठी एक कार्यशाळा आयोजीत करण्याचे ठरले आहे, यासाठीदेखील काही स्वयंसेवक
हवे आहेत.
या महिन्यात टेक मराठीच्या स्वयंसेवकांची सभा आयोजीत करून त्यामधे पुढे
काय काय व कसे करता येईल यावर चर्चा करता येईल. या सभेबद्दल पुढील माहिती
लवकरच कळवू.
तेव्हा जे लोक इच्छुक आहेत त्यांनी कृपया या आवाहनाला प्रतिसाद द्यावा.
आपल्या मित्र मंडळींपर्यंत, ग्रूपसपर्यंत ही हाक पोहोचवावी व जास्तीत
जास्त लोक या साखळीला जोडले जावेत यासाठी प्रयत्न करावेत.

याविषयी चर्चा https://groups.google.com/d/topic/techmarathi/Aorp_78KWdk/discussion येथे सुरू आहे.

विकीपीडीया मीट-अप, पुणे

पुण्यामधे तिसरी विकीपीडिया मीट-अप  १३ डिसेंबर २०१०  रोजी आयोजीत केले आहे.एरिक मूलर – डेप्युटी डायरेक्टर , विकिमिडीया फाऊंडेशन ,  दानेसे कूपर ,
चिफ टेक्निकल ऑफिसर, विकिमिडीया फाऊंडेशन,  अलोलिता शर्मा,
इंजिनिअरिंग प्रॉग्रॅमिंग मॅनेजर, विकिमिडीया फाऊंडेशन ही मंडळी या संमेलनाला उपस्थित रहाणार आहेत . तसेच  बिशाखा दत्ता , बोर्ड ऑफ ट्र्स्टीज ,विकिमिडीया फाऊंडेशन याही उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. (यांची उपस्थिती अजून नक्की नाही.)

विकीपिडीया काय आहे?

.विकिपीडिया (www.wikipedia.org) हा एक मुक्‍त ज्ञानकोश आहे. विकीतंत्रज्ञानावर आधारीत मिडीयाविकि हे सॉफ्टवेअर वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. विकिमिडीया फाउंडेशन ही विनानफ्याच्या तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.

हा मुक्‍त ज्ञानकोश जगातील सर्व भाषांमध्ये लिहिला जात आहे,मराठीचा पण यात समावेश आहे. या मुक्‍त ज्ञानकोश चे वैशिष्ट्य हया ज्ञानकोशाचे कुणीही सहज संपादन करु शकते.इंग्रजी विकिपीडिया १५ जानेवारी २००१ ला सुरू झाला तर मराठी विकिपीडियाची स्थापना १ मे २००३ ला झाली. मराठी जाणणारे अनेकजण यास सक्रीय हातभार लावत आहेत.

विकिपीडियाशिवाय, बहूभाषी डिक्शनरीकरिता विक्शनरी, मुळदस्तावेज पुस्तके पाण्‍डूलिपी आणि स्रोत इत्यादीकरिता विकिस्रोत, तर नवीन पुस्तकांच्या निर्मीतीकरिता विकिबुक्स,अवतरणांच्या संचयाकरिता विकिक्वोट्स, बातम्यांकरिता विकिन्यूज, चित्र छायाचित्र ध्वनी आणि चलचित्रमुद्रीका आणि इतर फाईल्सच्या संचयाकरिता विकिकॉमन्स इत्यादी सहप्रकल्पांसोबतच विकिमिडीया फाऊंडेशन विकिस्पेसिज नावाचा जैवकोशाचा पण कणा आहे.

विकिमिडीया फाउंडेशन तीच्या संकेतस्थळांच्या सुसूत्रीत व्यवहाराच्या दृष्टीने मेटाविकि निती नियमावलींचे चर्चा व नियमन करते, दुरगामी व्यूहरचनेची योजना प्रस्ताव व त्यावरील चर्चा स्ट्रॅटेजी प्रस्ताव येथे करते, मिडीयाविकि संकेतस्थळावरून सॉफ्टवेअर डेव्हलपर लोकांचे व वापरणार्‍यांचे कार्य चालते तर,  विकिमिडीया फाउंडेशनचे स्वत:चेपण संकेतस्थळ आहे जेथे प्रवेश मर्यादीत स्वरूपातच उपलब्ध केला जातो. मिडीयाविकि सॉफ्टवेअरच्या इतर भाषात भाषांतरणाचे काम ट्रांस्लेट विकित होते आणि सॉफ्टवेअर संबधीत सूचना आणि तक्रारींची दखल बगझीला येथे घेतली जाते.

मिडियाविकि हे मुळात विकिपीडिया करीता लिहिलेली मुक्त संगणक प्रणाली विकि पॅकेज आहे आणि आता ते विकिमीडिया फाउंडेशनच्या इतर असंख्य ना-नफा प्रकल्पात वापरली जाते. मिडियाविकिच्या या संकेतस्थळा सहीत इतर बरेच विकि प्रकल्प मिडियाविकि मुकत संगणक प्रणाली वापरतात .

स्थळ: Symbiosis Institute Of Comp. Studies & Research(SICSR), अतुर सेंटर, गोखले क्रॉस रोड, मॉडेल कॉलनी, पुणे.

वेळ: सायं. ६:३० वाजता

गुगल नकाशा: http://bit.ly/93USLP

हे संमेलन सर्वांसाठी विनामूल्य आहे.

जी-मेलवर इ-मेल अकाउंट कसे उघडावे?

जी-मेलवर इ-मेल अकाउंट कसे उघडावे?

जी-मेल वर आपले खाते कसे उघडावे, यासंबधी पुढे चलचित्र (व्हिडियो) दिले आहे.

याच पद्धतीने तुम्ही इतर ठिकाणी जसं की याहू, हॉटमेल तेथे अकाऊंट काढू शकता.

टेक मराठी सभा अहवाल : सप्टेंबर २०१०

सप्टेंबर महिन्यात झालेल्या टेक मराठीच्या सभेत विषय होता “मराठी ब्लॉग/वेब-साईटस कशा बनवायच्या”. साधं-सोपं डॉट कॉम ही त्यांची पहिली द्रुपलमधील वेब-साईट. जी प्रचंड लोकप्रिय झाली. ४०००० हून अधिक विझिटर्स (visitors), ४ लाखाहून अधिक पेज व्ह्यूज (pageviews) या साईटला मिळाल्या.

त्यांनी सादर केलेले पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दिले आहे.
याशिवाय त्यांनी बोलताना सांगितलेले काही महत्वाचे मुद्दे व श्रोत्यांनी विचारलेले काही प्रश्न खाली देत आहे.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या टेक मराठीच्या सभेत विषय होता “मराठी ब्लॉग/वेब-साईटस कशा बनवायच्या”. आपले वक्ते श्री. प्रसाद शिरगांवकर यांनी प्रथम स्वत:ची ओळख करून दिली. ते शिक्षणाने ICWA (Cost Accountant) आहेत. मात्र गेली अनेक वर्ष आय. टी. क्षेत्रातच काम करत आहेत. काही वर्षे लंडनमधे काम करत होते, त्यानंतर ते भारतात परतले व त्यांनी २ वर्षांपूर्वी त्यांची स्वत:ची “मराठी वेब-साईटस” ही संस्था सुरू केली. याद्वारे ते मराठी वेब साईटस बनवतात. गेल्या २ वर्षांत त्यांनी ४५ हून अधिक विविध क्षेत्रात  वेब-साईटस बनविल्या. त्याच प्रमाणे http://www.designs2drupal.com/ ह्या संस्थेद्वारे ते द्रुपलमधील थिम बनविण्याचे काम करतात.
साधं-सोपं डॉट कॉम ही त्यांची पहिली द्रुपलमधील वेब-साईट. जी प्रचंड लोकप्रिय झाली. ४०००० हून अधिक विझिटर्स (visitors), ४ लाखाहून अधिक पेज व्ह्यूज (pageviews) या साईटला मिळाल्या.

त्यांनी सादर केलेले पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन खाली दिले आहे.


याशिवाय त्यांनी बोलताना सांगितलेले काही महत्वाचे मुद्दे खाली देत आहे.
 • ब्लॉग सुरू का करावा हे सांगताना ते म्हणाले की, मुळात तो सुरू करण्याचा हेतू काय आहे, आपल्याकडे लिहिण्यासाठी तेवढा माहितीचा साठा आहे का, तुम्ही नियमीत लिहू शकाल का याचा विचार करून, मगच तो चालू करावा. अनियमीतपणे लिहीणे, वाटले तर लिहिणे यामुळे तुमच्या वाचकांवर अन्याय होतो, तसे करू नये. कारण लोक काही नियमीत वाचायला मिळेल या हेतूने तुमच्या ब्लॉगवर येतात.
 • तसेच ब्लॉगचा पत्ता ठरविताना तो विचार करून ठरवावा. जेणेकरून तो पत्ता तुमच्या         visiting card वर छापता येईल, परत बदलावा लागणार नाही.
 • मराठी बोलणारा फार मोठा वर्ग आहे, मात्र त्या मानाने वेब वर फार काही माहिती मराठीतून नाही, असे का? मराठीत फार तर १०० एक साईटस असतील. हे बदलणे आपल्याच हातात आहे. मराठी विकीपिडीयावर योगदान देणे गरजेचे आहे.
 • मात्र आपली साईट/ ब्लॉग हा युनिकेडमधेच करा. त्यामुळे ती सर्वत्र नीट दिसेल. फॉंटचा काहीही प्रश्न येत नाही. डाटा ट्रान्सफर करण्यास सुविधा होते. मोबाईलमधे बिनदिक्कत दिसते. सर्च मधे दिसतात.

श्रोत्यांनी  विचारलेले काही प्रश्न:

 • आपली साईट/ब्लॉग प्रमोट कसा करायचा? गूगलमधे येण्यासाठी (इन्डेक्स होण्यासाठी) काय करायचे?

– खरं तर वेळ हाच पर्याय आहे. इंग्रजी साईटसप्रमाणे मराठी साईटसपण यायला अजून १-२ वर्षं जावी लागतील.

 • गूगलमधे मराठी जाहिरातींची सुविधा?

– नाही.

 • कोणते CMS वापरायचे ते कसे ठरवायचे?

– त्यांच्या तुलना काही साईटसवर दिल्या आहेत. त्यातील features व आपली गरज यावरून   ठरवावे. जर द्रुपल वापरायचे असेल तर ते नीट शिकून घ्यावे लागते. त्या मानाने WordPress सोपे आहे. फार काही वेगळे नको असेल तर WordPress हा उत्तम पर्याय आहे. मात्र खूप सुविधा हव्या असल्यास द्रुपल वापरावे.

 • मराठी भाषेत ई-मेलचे पत्ते येतील का?

– हो, येऊ घातले आहेत. यावर्षी येणं अपेक्षित आहे.

 • एकापेक्षा जास्त भाषांमधे साईट्स करायच्या असल्यास काय वापरावे?

– त्यासाठी द्रुपल किंवा जुमला हे पर्याय उपलब्ध आहेत.

उबंटुची ओळख

खुप जणं ऑपरेटींग सिस्टम म्हणजे विंडोज असेच समजतात. बरेचवेळा लोकांना दुसरे पर्याय आहेत हे माहितदेखील नसते. विंडोज वापरायला आपल्याला ती प्रत विकत घ्यावी लागते. पण किंमत जास्त असल्याने बरेचवेळा लोकं पायरेटेड प्रत वापरणेच पसंत करतात. या गोष्टीचे बरेच तोटे आहेत. यावर उपाय असा की, अशी एखादी ऑपरेटींग सिस्टम वापरायची की जी विनामुल्य उपलब्ध असेल. एक प्रसिद्ध पर्याय म्हणजे लिनक्स! पण गैरसमज असा आहे की, लिनक्स खूप अवघड आहे आणि ते वापरायचं म्हणजे आपल्याला कॉम्पुटरबद्दल खूप माहिती असायला हवी. ही गोष्ट थोड्या प्रमाणात खरीपण आहे. यालाच पर्याय म्हणून कॅनोनिकलने सुरू केलेली ऑपरेटींग सिस्टम म्हणजे उबंटु!

“उबंटु” ह्या लेखमालिकेअंतर्गत हा पहिला लेख. यात उबंटुची ओळख करून दिली आहे. आम्ही याविषयी अजुन माहिती पुढील लेखांद्वारे देणार आहोत.

खुप जणं ऑपरेटींग सिस्टम म्हणजे विंडोज असेच समजतात. बरेचवेळा लोकांना दुसरे पर्याय आहेत हे माहितदेखील नसते. विंडोज वापरायला आपल्याला ती प्रत विकत घ्यावी लागते. पण किंमत जास्त असल्याने बरेचवेळा लोकं पायरेटेड प्रत वापरणेच पसंत करतात. या गोष्टीचे बरेच तोटे आहेत. यावर उपाय असा की,  अशी एखादी ऑपरेटींग सिस्टम वापरायची की जी विनामुल्य उपलब्ध असेल. एक प्रसिद्ध पर्याय म्हणजे लिनक्स! पण गैरसमज असा आहे की,  लिनक्स खूप अवघड आहे आणि ते वापरायचं म्हणजे आपल्याला कॉम्पुटरबद्दल खूप माहिती असायला हवी. ही गोष्ट थोड्या प्रमाणात खरीपण आहे. यालाच पर्याय म्हणून कॅनोनिकलने सुरू केलेली ऑपरेटींग सिस्टम म्हणजे उबंटु!

उबंटु इनस्टॉल केल्यानंतर आपली डेक्सटॉप स्क्रीन अशी दिसेल.

काय काय गोष्टी उपलब्ध आहेत?

उबंटु वापरायला खूप सोपी आहे. त्यात तुम्हाला नेहमी लागणारं ऑफिस, लॅन, वायरलेस कनेक्शन, इंटरनेट, चॅटिंगचे पर्याय अगदी सहजपणे वापरता येतात. यासाठी लागणारी सर्व सॉफ्टवेअर उबंटुमधे अंतर्भूतच असतात, म्हणजे आपण उबंटु इनस्टॉल केले की ह्या सर्व गोष्टी उपलब्ध असतातच. वेगळ्या इनस्टॉल करून घेण्याची गरज नाही.

पुढे दिलेल्या चित्रात आपण पाहू शकता की, मोझिला इंटरनेट ब्राऊजर अगोदरपासूनच उपलब्ध आहे.

खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे, आपल्या टुलबारवर सर्व मेन्यु, मोझिला इंटरनेट ब्राऊजर, हेल्प याबरोबरच वायरलेस कनेक्टिविटी, ई-मेल/ चॅट ई.चे पर्यायदेखील उपलब्ध आहेत. (खालील चित्र मोठे करून पहायचे असल्यास त्यावर क्लिक करा.)

ऑफिस- अगदी आवश्यक असणारे हे सॉफ्ट्वेअरही उबंटुमधे अगोदरपासूनच उपलब्ध असते. चित्रात दाखविल्याप्रमाणे ऑफिस या मेन्युखाली आवश्यक ते सर्व पर्याय उपलब्ध आहेत. ऑफिस वेगळे इनस्टॉल करण्याची गरज नाही.

ऑडियो-व्हिडीयो: गाणी ऐकण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी, फोटो पाहण्यासाठी लागणारी सॉफ्टवेअरस चित्रात दाखविल्याप्रमाणे साऊंड ऍंड व्हिडियो या मेन्युअंतर्गत उपलब्ध असतात.

नविन सॉफ्टवेअर इन्स्टॉल कसे करायचे?

सॉफ्टवेअर सेंटर आणि साईन-ऍप-टेक मॅनेजर मधे विविध सॉफ्टवेअरचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तुम्हाला हवे ते सॉफ्टवेअर कोणाच्याही मदतीशिवाय तुम्ही स्वत: अगदी सहजपणे इनस्टॉल करू शकता .

साईन-ऍप-टेक मॅनेजरला जाण्यासाठी, चित्रात दिल्याप्रमाणे सिस्टिम-> ऍडमिन -> साईन-ऍप-टेक मॅनेजर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला खालील स्क्रीन दिसेल. त्यात दिल्याप्रमाणे, आपल्याला हवी ती कॅटेगरी आपण निवडली ही त्याच्या संबधीत सॉफ्टवेअर आपल्याला शेजारी दिसतात. आपल्याला हवी ती  सॉफ्ट्वेअर चेक बॉक्सद्वारे निवडायची आणि “अप्लाय” म्हणायचे. इंटरनेटवरून ती लोड होतात, यासाठी बाकी काही करायची आवश्यकता नसते.

त्याशिवाय चित्रात दाखविल्याप्रमाणे ऍप्लिकेशन  या मेन्युअंतर्गत सॉफ्टवेअर सेंटर हादेखील एक पर्याय उपलब्ध आहे.

जिथे सध्या उपलब्ध सर्व सॉफ्टवेअरची यादी शिवाय विविध कॅटेगरीनुसार उपलब्ध सॉफ्टवेअरची यादी, फिचर्स व नविन उपलब्ध यानुसार वर्गीकरण करून उपलब्ध असतात. आपल्याला हवे ते सॉफ्टवेअर निवडून “गेट सॉफ्टवेअर” हे बटण दाबायचे.

“उबंटु” ह्या लेखमालिकेअंतर्गत हा पहिला लेख. यात उबंटुची ओळख करून दिली आहे. आम्ही याविषयी अजुन माहिती पुढील लेखांद्वारे देणार आहोत.

नुकतेच उबंटुने नविन व्हर्जन बाजारात आणले आहे. ते तुम्ही येथे जाऊन डाऊनलोड करू शकता.

हा लेख कसा वाटला ते अवश्य कळवा.

टेक मराठी सभा – ऑक्टोबर २०१०

या महिन्यातील टेक मराठी सभेची माहिती पुढीलप्रमाणे-

विषय: द्रुपल वापरून मराठी वेब-साईट्स कशा करायच्या?
वक्ते: प्रसाद शिरगांवकर

विषय: मराठी विकीपिडीयाचा वापर/ फायदे
वक्ते: विजय सरदेशपांडे

या महिन्यातील टेक मराठी सभेची माहिती पुढीलप्रमाणे-

 • विषय: द्रुपल वापरून मराठी वेब-साईट्स कशा करायच्या?

वक्ते: प्रसाद शिरगांवकर

श्री. प्रसाद शिरगावकर हे मराठी वेब-साईट डॉट कॉमचे संस्थापक असून, मराठीमध्ये नवनवीन दर्जेदार अत्याधुनिक संकेतस्थळे निर्माण करण्यासाठी कार्यरत आहेत. गेल्या महिन्यातील सभेत त्यांनी ” मराठी ब्लॉग / वेब-साईट कशा तयार करायच्या”,  याविषयी मार्गदर्शन केले. याचाच पुढील भाग म्हणुन हे सत्र आयोजीत केले आहे.

 • विषय: मराठी विकीपिडीयाचा वापर/ फायदे

वक्ते: विजय सरदेशपांडे

श्री. विजय सरदेशपांडे हे मराठी विकिपिडियाच्या विकिपीडिया स्वागत आणि साहाय्य चमूचे सदस्य आहेत.  मराठी विकिपिडियामधे त्यांचे भरीव योगदान आहे.

कधी : दि. २३ -१०-२०१०

वेळ: दुपारी ५:३० ते ७:००

स्थळ: Symbiosis Institute Of Comp. Studies & Research(SICSR), अतुर सेंटर, गोखले क्रॉस रोड, मॉडेल कॉलनी, पुणे.

गुगल नकाशा: http://bit.ly/93USLP

आपण सर्वांनी या सभेला अवश्य उपस्थित रहावं.

ही सभा विनामूल्य आहे, कृपया येथे नावनोंदणी करावी.