मी Ruby का शिकावी ?


सदर post, Nick Adams  द्वारा प्रकाशित  http://punetech.com/why-you-need-to-learn-ruby-and-rails/ या लेखाचे भाषांतर असून, http://punetech.com च्या माध्यमातून घेतले आहे. याचे मराठी भाषांतर अभिजीत वैद्य  यांनी केले आहे.

Ruby ही python, perl, php आणि इतर बऱ्याच unix आधारित भाषांसारखी interpreted language आहे. १९९२ मध्ये युकीहीरो मात्सुमोतो या जपानी संगणक तज्ञाने Ruby विकसित केली. पण २००५ मध्ये Ruby on Rails हे web development framework आल्यावर Ruby एकदम प्रसिद्धीच्या झोतात आली. या लेखात मी प्रथम Ruby बद्दल, नंतर Rails बद्दल आणि शेवटी यात वेगळे काय आहे याविषयी माहिती देईन.

Ruby च्या बाबतीत सर्वप्रथम लक्षात येणारी गोष्ट म्हणजे तीचा सरळ सोपा syntax:

5.times {print “Hello Pune !”}

semi colon, variable declaration इत्यादी ची गरज नसल्यामुळे Ruby चा code हा जास्त readable होतो आणि coding करण्यास गरजेपेक्षा जास्त वेळ लागत नाही.

Ruby ही १००% object oriented आहे. Ruby मध्ये variables सकट सगळ्या गोष्टी या object असतात. सुरुवातीला हे जरा टोकाचे वाटू शकेल, पण जेंव्हा तुम्ही Ruby on Rails framework वापरता आणि जेव्हा तुम्हाला “String” या basic class मध्ये on the fly बदल करायचे असतील तेंव्हा त्याची खरी ताकद कळते. Ruby ही फारच flexible आहे. Ruby मध्ये blocks, iterators तसेच higher level language मधली string reverse, string capitalize सारखी व इतरही अनेक features आहेत.

Rails हे web development framework आहे. Rails कडे नुसतेच “web design साठी नवीन Classes आणि Methods चा संग्रह” हा दृष्टीने बघून चालणार नाही. माझ्या मते Rails शिकण्यापूर्वी दोन गोष्टी शिकणे आवश्यक आहे. एक म्हणजे MVC pattern. MVC pattern हे Application logic वेगवेगळ्या भागांत विभागून development वेगवान, scalable, logical बनवते. दुसरे म्हणजे Rails चे convention. हे जरी थोडे गोंधळात टाकणारे असले तरी ते समजून घेवून framework कसे design केले आहे हे समजून घेणे हे तुमचे Application परिपूर्ण बनवण्यासाठी जास्त उपयोगी ठरेल.

Rails चे वेगळेपण कशात आहे ? नुकताच मी java, php आणि Rails मध्ये web development केलेल्या एकाची मुलाखत घेतली. मला त्याच्यामध्ये Rails मध्ये काम करण्याची आंतरिक उर्मी दिसली. जर तुम्ही कधी .net, php, jave मध्ये web development केले असेल तर तुम्ही Rails चे नक्की कौतुक कराल. Rails हे वेगवान, modular आहे. त्यांनी तुम्हाला clean, readable coding करता येते. आणि हे फुकट आहे. Ajax आणि Web-2.0 ची वैशिष्ट्ये वापरणे सोपे आहे. Application चे Unit testing करणे सोपे आहे. नवीन कल्पना महिन्यांत विकसित करण्यापेक्षा आठवड्यात विकसित करा. setup करणे हे कोणत्याही environment साठी सोपे आहे. पण open source असल्यामुळे Linux आणि Mac सारख्या ‘nix based environment साठी जास्त सोयीस्कर आहे.

भारी वाटते आहे ना ? माझ्या मते web बद्दल माहिती असणारे आणि ज्यांनी database base driven web applications तयार केली आहेत, त्यांना Rails जास्त चांगले समजेल. Rails हे पूर्वीपासून प्रचलित गोष्टींवर आधारित आहे. ही नवीन जादुई web development language नाही. Rails प्रचलित गोष्टी वेगवान, सोप्या करते. Web समजून घ्या. Web applications समजून घ्या, MVC समजून घ्या, मग Rails शिका. मग तुम्हाला कधीही मागे वळून पाहण्याची वेळ येणार नाही.

Nick Adams हे Entrip चे सह-संथापक आहेत. Entrip सहल नियोजनासाठी map-based interface पुरवते, तुमचा अनुभव multimedia स्वरुपात साठवून तो मित्रांसोबत share करण्यास मदत करते. SapnaSolutions हि Entrip साठी Ruby on Rails App विकसीत करणारी कंपनी आहे जी ग्राहकांसाठी web apps बनवते. Nick Adams यांच्याशी nick [at] entrip [dot] com  या mail id  वर संपर्क साधू शकता.

सदर post, Nick Adams  द्वारा प्रकाशित  http://punetech.com/why-you-need-to-learn-ruby-and-rails/ या लेखाचे भाषांतर असून, http://punetech.com च्या माध्यमातून घेतले आहे. याचे मराठी भाषांतर अभिजीत वैद्य  यांनी केले आहे.