Localhost वर WordPress कार्यान्वित कसे कराल?

WordPress कार्यान्वित कसे कराल?

तुमच्या संगणकावर वर्डप्रेस कार्यान्वित करण्यासाठी संगणकावर WAMP सर्ह्वर असणे गरजेचे आहे. WAMP सर्ह्वर कसा कार्यान्वित करायचा ते तुह्मी् येथे पाहू शकता. या लेखात आपण wordpress कसे कार्यान्वित करायचे ते पाहू.

WordPress तुह्मी येथून डाउनलोड करू शकता.

१. तुह्मी डाउनलोड केलेली फाइल unzip करा.
२. वर्डप्रेस कार्यान्वित करण्यासाठी तुम्हाला तुमच्या वेब सर्ह्वरवर डेटाबेस तयार करावा लागतो. तो तुह्मी खाली दिल्याप्रमाणे तयार करू शकता.

->खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे तुमच्या संगणकावरील WAMP सर्ह्वरच्या आयकॉनवर क्लिक करा व त्यावरील phpMyAdmin हा पर्याय निवडा.

-> खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे तुह्माला हवे असलेले डेटाबेसचे नाव लिहा व Create या बटनावर क्लिक करा. अशाप्रकारे तुमचा डेटाबेस तयार होईल.

३. तुमच्या wordpress फोल्डरमधील wp-config-sample.php ह्या फाइलचे नाव wp-config.php असे बदला .

४. त्यानंतर wp -config.php ही फाइल text editor मध्ये उघडा व त्या फाइलमध्ये तुमच्या डेटाबेसचे details लिहा व ती फाइल जतन( save ) करा.

५. त्यानंतर तुमचा wordpress फोल्डर तुमच्या web server च्या root directory (C:\ WAMP \ www) मध्ये जतन करा.

६. तुमच्या web browser वर wp-admin/install.php run करा म्हणजे तुमच्या localhost वर wordpress कार्यान्वित होईल.

RSS feed आणि गुगल रीडर

RSS (Really Simple Syndication) हा वेबसाईट कडून अपडेट्स मिळवण्याचा एक format आहे. तुम्ही साईटच्या RSS feeds ला सबस्क्राइब केले की तुम्हाला प्रत्येक वेळी साईटवर जाऊन अपडेट्स बघण्याची गरज नाही. साईटवर जेंव्हा नवीन पोस्ट्स येतील तेंव्हा ते अपडेट्स तुम्हाला तुमच्या RSS feed reader मध्ये मिळतील.

जर तुम्ही इंटरनेट वापरत असाल आणि बरेच ब्लॉग्स, वेबसाईट्स वाचत असाल, तर त्या त्या साईटवर नवीन माहिती आली आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्ही काय करता ?

साईट्स बुकमार्क्स करून प्रत्येक वेळी सर्व साईट्स उघडून बघणे हा एक पर्याय आहे. पण त्याचे बरेच तोटे आहेत. एका संगणकाच्या browser वर सेव्ह केलेले बुकमार्क्स तुम्हाला दुसऱ्या संगणकावर पाहता येत नाहीत. बरेचसे ब्लॉग्स अनियमितपणे अपडेट्स होतात. त्यामुळे एखादी साईट उघडल्यावर जुनीच पोस्ट दिसण्याचा प्रकार बरेचदा दिसतो. इंटरनेटचा स्पीड कमी असल्यास वेळ आणि bandwidth दोन्ही वाया जाते.

दुसरा पर्याय म्हणजे इमेलद्वारा सबस्क्रीप्शन. हा एका चांगला पर्याय असला तरी याचेही काही तोटे आहेत. एक म्हणजे तुम्ही वाचत असलेल्या सगळ्याच साईट्सवर हा पर्याय असतो असे नाही. आणि बरेचदा अश्या ठिकाणी मेलआयडी दिल्यावर स्पॅममेल्सच जास्त येण्याची शक्यता असते.

तिसरा पर्याय म्हणजे आर.एस.एस. फीड द्वारा अपडेट्स मिळवणे.

RSS (Really Simple Syndication) हा वेबसाईट कडून अपडेट्स मिळवण्याचा एक format आहे. तुम्ही साईटच्या RSS feeds ला सबस्क्राइब केले की तुम्हाला प्रत्येक वेळी साईटवर जाऊन अपडेट्स बघण्याची गरज नाही. साईटवर जेंव्हा नवीन पोस्ट्स येतील तेंव्हा ते अपडेट्स तुम्हाला तुमच्या RSS feed reader मध्ये मिळतील. RSS reader मधून तुम्ही सबस्क्राइब केलेल्या सर्व साईट्स चे अपडेट्स एकाच User interface मध्ये दिसतात. त्यामुळे एकाद्या ब्लॉगवरील फॉंट अथवा background कलर आवडत नसेल तरी काही फरक पडत नाही.

गुगल रीडर हि गुगलची RSS feed reader ची सर्व्हिस आहे. गुगल च्या account ने तुम्ही यावर लॉग-इन करू शकता. लॉग-इन केल्यावर डाव्या बाजूला असलेल्या “Add Subscription” मध्ये तुम्हाला हव्या असलेल्या साईटची URL टाकले की झाले. त्या साईटवर होणारे सगळे अपडेट्स तुम्हाला गुगर रीडर वर कळवण्यात येतील. गुगल रीडरवर नवीन फीड्स शोधण्याचीसुद्धा सोय आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयाचे नवीन ब्लॉग्स, साईट्स शोधू शकता.

गुगल रीडर मध्ये नवीन साईट कधी Add करायची हे सांगणारा हा व्हीडीओ तुम्ही पाहू शकता.

उबुंटु प्रणाली संगणकावर कार्यान्वयीत करणे.

मागच्या लेखात आपण उबुंतू प्रणाली बद्दल थोडक्यात माहिती पहिली.
आता आपण ती कार्यान्वयीत कशी करायची ते पाहू . त्याच्या वेगवेगळ्या पायर्‍या आहेत.

मागच्या लेखात आपण उबुंटु प्रणाली बद्दल थोडक्यात माहिती पहिली.
आता आपण ती कार्यान्वयीत कशी करायची ते पाहू . त्याच्या वेगवेगळ्या पायर्‍या आहेत.

पायरी  १.   प्रथम संगणकाच्या  ” BIOS” settings मध्ये जाऊन  boot priority option “CD” असा ठेवा आणि नंतर उबुंटु १०.१० ची CD , CD ड्राइव्हमधे ठेऊन पुन्हा: चालू (Restart) करा. (म्हणजे तुमचा संगणक तुम्ही टाकलेल्या उबुंटु १०.१० ची CD वापरून चालू होईल …)

पायरी  २.   संगणक चालू झाल्यावर तुम्हाला निवड करण्यासाठी मेनू दिसेल. त्यातल्या “Boot  From CD ” या पर्यायावर जाऊन enter करा.   त्यातल्या   ” Install Ubuntu 10.10 ” या आयकॉनवर क्लीक  करा.

पायरी  ३.    एक नवीन विंडो दिसेल. त्यातला  “English”  पर्याय निवडून  ” Forward ” या बटणावर क्लिक करा.

पायरी  ४.     पुढची विंडो तुमच्या संगाणकाची माहिती दर्शवेल. (उर्वरित रिकामी जागा ई..)  ” Forward ” या बटणावर क्लिक करा.

पायरी  ५.     पुढची विंडो तुम्हाला कोठे  ” Install ” करायचे ते विचारेल.  शेवटचा पर्याय  ” Specify partition manually ” निवडा आणि  ” Forward ” या बटणावर क्लिक करा.

पायरी   ६.    पुढची विंडो तुम्हाला कोणत्या  ” partition ”  वर  ”  install ”   करायचे आहे ते विचारेल.

हिरवा पट्टा (sda1) हे माझ्या  हार्ड डिस्कचे पहिले partition आहे. त्यावर  ” Windows ”   इंस्टॉल आहे. भगवा आणि निळा हे माझे दुसरे दोन  partition आहेत.  पांढरा पट्टा म्हणजे ते रिकामी जागा (free space) आहे. आपण त्याच्यावर उबुंटु install करणार आहोत. त्याच्या खालच्या तक्त्यात (10818 MB) free space वर जाऊन  ” Add ”  हे  बटण दाबा.

याठिकाणी आपल्याला लागणारी जागा मोजण्यासाठी पुढील सूत्र तुम्ही वापरू शकता.

रॅम २ जी.बी. पर्यंत असल्यास:

swap partitions = रॅमची साईज (RAM Size) * २

जर रॅम २ जी.बी. पेक्षा जास्त असेल तर:

swap partition = रॅमची साईज (RAM Size) * १

** जर तुमच्या हार्ड डिस्कवर पुरेशी जागा असेल तर कधीही रॅमची साईज (RAM Size) * २ हे सूत्र वापरणे उत्तम.

रूट पार्टीशनसाठी ५० जी.बी. एवढी जागा पुरेशी असते, जर हार्ड डिस्कची जागा कमी असेल तर २० जीबी एवढी ठेवली तरी चालते.पायरी ७.  ” Create New Partition ”   नवीन  विंडो  उघडेल.  New partition size  आणि  Mount  Point  ” /  ”  निवडून  ” Ok ” वर क्लिक करा.

पायरी ८.   पुढची  विंडो तुमचे तयार झालेले  ” partition ” दाखवेल.  (/dev/sda8).  आता  उर्वरित  free  space वर क्लिक करून  ” Add ”  हे बटण दाबा.

पायरी ९.   परत ” Create New Partition ”   नवीन  विंडो  उघडेल.  New partition size  आणि  Use as : ” swap area ” निवडून  ” Ok ” वर क्लिक करा.

पायरी  १०.  पुढची  विंडो तयार झालेले नवीन ” Partition ” दाखवेल.  ” Boot  loader ”  ” /dev /sda ” निवडून  ” इंस्टॉल नाऊ ” वर क्लिक करा.

पायरी  ११.  Where are you ?   Time  Zone  Kolkata  निवडून  ” Forward ”  वर क्लिक करा.

पायरी १२.   Keyboard  layout   ” USA ” निवडून  निवडून  ” Forward ”  वर क्लिक करा.

पायरी १३.   Who are you ?  पूर्ण माहिती भरून  ” Forward ”  वर क्लिक करा.

पायरी १४.   Welcome  Window, इनस्टॉलेशनची प्रगती दर्शवेल.

ती  पूर्ण झाल्यावर संगणक परत चालू होण्या पूर्वी  “CD”  काढून  ” BIOS ”  मधून  ” Boot priority ”  परत  ” Hard Disk  ”  ठेवा आणि संगणक परत चालू करा.

अभिनंदन आपण यशस्वीरीत्या उबुंटु इंस्टॉल केले!

या लेखात काही नविन मुद्दे श्री. नरेश खलासी यांच्या सुचनांनुसार जोडले आहेत.

डिस्क डिफ़्रॅगमेंटेशन!

डिस्क डिफ़्रॅगमेंटेशन (Disk Defragmentation) हा मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टममध्ये उपलब्ध असणारा एक उत्तम पर्याय आहे.  याचा उपयोग काय, कशासाठी, कसे करायचे ते या लेखामधे पाहू.

ही प्रक्रिया आपल्याला डिस्कवरील सर्व फाईलस एकसंध पद्ध्तीने ठेवण्यास मदत करते. अनेकदा आपण फाईल डिस्कवर कुठेतरी सेव्ह करतो. कालांतराने त्या डिलिट करतो, काही नविन तयार करतो. ही प्रक्रिया सतत चालू असते. त्यामुळे प्रत्येक वेळेला फाईल एकसंध मेमरी लोकेशनमधे राहतीलच असे नाही. त्यामुळे त्या जर सलग जागेत सेव्ह असतील, तर सलग मोकळी जागा आपल्याला मिळेल.

वरील चित्रात आपणास, उपलब्ध जागेअनुसार फाईल कशा सेव्ह होतात याचा अंदाज येईल. अशा इतस्तत: पसरलेल्या फाईलस नीट लावण्यासाठी या डिस्क डिफ़्रॅगमेंटेशन (Disk Defragamentation) चा वापर केला जातो.

याचा फायदा असा की, हार्ड डिस्कला फाईल वाचण्यासाठी एक हेड असते, हे हेड सर्व ठिकणी न फिरता सलग काही जागा फिरेल, अर्थातच त्यामुळे आपल्याला फाईल लवकर मिळेल न स्पीडसुद्धा सुधारेल.  म्हणजेच कार्यक्षमता वाढेल, आहे की नाही गंमत 🙂

हे कसे करायचे ते आपण आता पाहू.

तर ही प्रक्रिया, आपल्या कॉम्पुटरच्या देखभाली अंतर्गत मोडते.  ही सोय Start -> Programs -> Accessories -> System Tools -> Disk Defragmentor येथे उपलब्ध आहे.

येथे गेल्यावर वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे, आपली स्क्रिन दिसेल. आपल्या कॉम्पुटरवरील सर्व ड्राईव्ह दिसतील, मोकळी जागा दिसेल. त्या प्रत्येक  ड्राईव्हवर क्लिक केल्यावर आपण “Analyze” हे बटण दाबून, त्या ड्राईव्हला डिफ़्रॅगमेंटेशनची गरज आहे का हे पाहू शकतो. जर गरज आहे असा निकाल आला तर “Defragment” हे बटण दाबून तुम्ही डिफ़्रॅगमेंटेशन सुरू करू शकता.

वरील चित्रात डिफ़्रॅगमेंटेशनच्या आधीची व नंतरची स्थिती दर्शवली आहे. सर्व फाईल एका बाजूला आल्या व सलग जागा रिकामी झाली.

तेव्हा ही प्रक्रिया महिन्यातून एकदा करायला हरकत नाही!

विशेष नोंद : यासाठी १५% जागा मोकळी लागते.

<em> वरील चित्रे http://en.wikipedia.org/wiki/Defragmentation येथून घेतली आहेत. </em>

HTML भाग १: ओळख

बरं कामापुरती HTML कित्येकांना येते, जे लोक नेटवर सतत सर्फिंग करत असतील, विविध ब्लॉग्जवर कमेंट्स देत असतील, त्यांना HTML च्या काही थोड्याफार फॉर्मॅटिंग टॅग्ज माहित असतील. पण कित्येक जण असेही आहेत, ज्यांना HTML चे किंचीतही ज्ञान नसेल… अश्यांसाठी, ह्म्म, नक्कीच HTML ला नवख्या असणार्‍यांसाठी ही लेखमालिका आम्ही सुरू करीत आहोत, त्याचा हा पहिला भाग, म्हणजेच HTML ची ओळख…!

या लेखात HTML काय आहे, HTML चा उपयोग काय, वेब पृष्ठे काय असतात, वेब डॉक्युमेण्ट्स काय असतात, HTML कशी शिकता येईल, त्यासाठी कोण-कोणती साधने/टूल्स लागतील, हे आपण पाहणार आहोत… नंतर या लेखमालिकेच्या पुढील भागांमध्ये HTML मधील विविध टॅग्जचा योग्य उदाहरणांसहित वापर, व इतर बरीच माहिती आपण समजावून घेणार आहोत… लेखाबाबत काही शंका असतील, तर त्या प्रतिक्रियांच्या रुपात अवश्य कळवा…

HTML काय आहे?

HTML ही एक संगणकीय भाषा आहे, ज्याद्वारे वेब पृष्ठे बनवले किंवा सजवले जातात.

• HTML हे Hyper Text Markup Language चे संक्षिप्त रूप आहे.

• HTML ही एखादी प्रोग्रॅमिंग लॅन्ग्वेज नसून मार्क-अप लॅन्ग्वेज आहे, हे प्रथम ध्यानात घ्या.

• मार्क-अप लॅन्ग्वेज ही अनेक मार्क-अप टॅग्जचा संच असते.

• HTML अशाच काही मार्क-अप टॅग्जचा वापर वेब पृष्ठे बनवण्यासाठी किंवा सजवण्यासाठी करते.

HTML टॅग्ज

HTML मार्क-अप टॅग्जना सामान्यतः HTML टॅग्ज म्हणून संबोधले जाते.

• HTML टॅग्ज हे सांकेतिक शब्द असतात व ते कोनिय कंसांनी आच्छादलेले असतात. उदा. <html>

• HTML टॅग्ज सामान्यतः जोड्यांमध्येच येतात. उदा. <b> आणि </b>

• या टॅग्जच्या जोडीतील पहिली टॅग ही स्टार्ट/ओपनिंग टॅग असते, तर दुसरी टॅग ही एण्ड/क्लोजिंग टॅग असते.

• जर या लेखामधील एखाद्या उदाहरणामध्ये तुम्हाला अजुनही अपरिचित असलेल्या टॅग्ज दिसल्या तर मुळीच घाबरून जाऊ नका. लेखाच्या उत्तरार्धापर्यंत तुम्हाला त्या टॅग्जविषयी योग्य माहिती निश्चितच मिळेल!

HTML डॉक्युमेण्ट्स आणि वेब पृष्ठे

• HTML डॉक्युमेण्ट्स हे वेब पृष्ठांचे वर्णन करतात.

• HTML डॉक्युमेण्ट्स मध्ये HTML टॅग्ज आणि साधा मजकूर असतो/असू शकतो.

• HTML डॉक्युमेण्ट्सना वेब पृष्ठे देखील म्हटले जाते.

तुमच्याकडे असणारे एखादे वेब ब्राउजर (उदा. इंटरनेट एक्स्प्लोरर, मोझिला फायरफॉक्स, ओपेरा इत्यादी) वापरण्यामागचा मूळ उद्देश एवढाच की HTML डॉक्युमेण्ट्स वाचणे आणि तुम्हाला समजण्यासाठी त्यांना वेब पृष्ठे म्हणून दर्शवणे. वेब ब्राउजर HTML टॅग्ज जशाच्या-तशा न दर्शवता त्यांचा वापर करून व्यवस्थित सजवलेले वेब पॄष्ठ दर्शवते.

खालील एक सोपे HTML उदाहरण बघा:

<html>
<body>
<h1>पहिली हेडिंग (शिर्षक)</h1>
<p>परिच्छेद</p>
</body>
</html>

वरील उदाहरणाची कारणमीमांसा:

• <html> आणि </html> मधील सर्व मजकूर वेब पृष्ठाचे वर्णन करतो.

• <body> आणि </body> मधील मजकूर हा पृष्ठाचा दर्शनिय भाग आहे, म्हणजे तो वेब पृष्ठावर तुम्हाला दिसू शकतो.

• <h1> आणि </h1> मधील मजकूर हा शिर्षकासारखा जरा मोठा दिसेल.

• <p> आणि </p> मधील मजकूर परिच्छेद दर्शवेल.

या लेखाचा उपयोग घेण्यासाठी तुम्हाला काय लागेल:

• कोणतेही HTML एडिटर, उदा. नोटपॅड

• कोणतेही वेब ब्राउजर उदा. इंटरनेट एक्प्लोरर/मोझिला फायरफॉक्स/गुगल क्रोमिअम इत्यादी

आणि कशाची मुळीच गरज पडणार नाही:

• कार्यशील इंटरनेट जोडणी

• वेब सर्व्हर

• वेब साइट

(क्रमश…)

खराब वा चरे पडलेल्या Cd / DVD मधून data कसा मिळवायचा?

ओरखडे असलेल्या / खराब CD/ DVD वरील माहिती कॉपी होणे  फार कठीण काम असते.त्यातून जर  data हवा असेल तर कसा मिळवायचा? यासंबधी फार उपयुक्त लेख http://www.netbhet.com/2010/04/recover-data-from-scratched-and-damaged.html येथे प्रसिद्ध आहे.

Bad CD DVD Reader हे सॉफ्टवेअर वापरून data कसा मिळवायचा, याबद्दल विस्तृत माहिती screen shots सहित  उपलब्ध आहे.

मूळ लेखावरून:

या प्रक्रियेला लागणारा एकूण कालावधी हा CD/ DVD वरील वाचता येण्याजोगी माहीती, CD/ DVD कितपत चांगल्या परिस्थीत आहे, तुम्हाला हव्या असलेल्या माहितीची एकूण Size म्हणजे एम बी आहे की जी बी  यांसारख्या तांत्रिक बाबींवर अवलंबुन असेल. आणि हो कधीकधी जास्त scratches असतील तर काँप्यूटरचा वेग पण कमी होऊ शकतो.