टेक मराठी दिवाळी अंकातील लेख आता टेक मराठी वेब साईटवर देखील प्रकाशीत होतील. यातील आजचा लेख “दीपिन लिनक्सची ओळख !” लेखक : मंदार वझे
(सर्व प्रथम मी हे नमूद करू इच्छीतो की deepin linux चा उच्चार डीपिन आहे की दीपिन हे माहीत नाही. ह्या लेखामधे दीपिन असा उच्चार गृहीत धरला आहे)
दीपिन लिनक्स हे उबुन्टु लिनक्सवर आधारीत असून -चीनमधील कंपनीने deepin desktop environment (DDE) तयार केले आहे . DDE मुळे मात्र दीपिन लिनक्स फारच वेगळे झाले आहे.
उबुन्टुवर आधारीत असल्यामुळे, उबुन्टुवर उपलब्ध असलेले सर्व software दीपिनमधे आपोआपच उपलब्ध आहे,परंतू दीपिनमधे फक्त DDE हे एवढेच वेगळेपण नाही. दीपिन teamने दीपिन मूव्ही, दीपिन म्युझिक, दीपिन गेम असे पण software दीपिनमधे उपलब्ध आहे.
आपण एकेका software कडे बघुया:
DDE मधे वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम मधल्या चांगल्या गोष्टी घेतल्या आहेत. उदा. Windows 8 प्रमाणे उजव्या बाजूला control panel आहे. mouse उजवी कडील खालच्या कोपऱ्यात नेला असता control center अचानक प्रकट होते – ही hot corners ची किमया. चारी कोपऱ्यामधे mouse नेला असता कोणता program सुरू व्हावा हे तुम्हाला ठरवता येते.
OS X प्रमाणे dock आहे. dock वरून नेहेमी लागणारे programs सुरू करू शकतो. ह्याशिवाय dock चा उपयोग window task bar आणि system tray सारखापण होतो.
नेहेमीच्या मेन्यू ऐवजी इथे लाँचर आहे. super key (विंडोजचा लोगो असलेली key)दाबून लाँचर चालू करता येतो. लाँचर उघडला की वेगवेगळ्या ग्रुप्स मधे वेगवेगळे programs आहेत (Internet, Games, Productivity, Utilities, System वगैरे) जर तुम्हाला कुठला program हवा आहे ते माहीत असेल,तर super key पाठोपाठ program चे नाव type करा. उदा. तुम्हाला calculatorकिंवा text editor (gedit) चालू करायचे असेल तर Utilities ग्रूप शोधायची गरज नाही – super key पाठोपाठ calc किंवा edi इतके टाईप केलेत की calculator किंवा text editor एवढेच program दाखवले जातात.
दीपिन टर्मिनल हा अजून एक मला आवडलेला program.(पण जर तुम्हाला टर्मिनल वापरायची गरज पडत नसेल तर कदाचीत तुम्हाला काही फरक पडणार नाही.)
दीपिन screenshot हा अजून एक अतिशय उपयुक्त program. लाँचर मधून किंवा Ctrl+Alt+A ह्या शॉर्टकटने चालू करता येतो – मग तुम्हाला हव्या त्या भागाचा screenshot घेता येतो . पण इतकेच नाही, त्यानंतर गरज असल्यास, त्या screenshot वर काही बाण, चौकोन वगैरे करून screenshot जास्त उपयुक्त करता येतो.
ह्या लेखात दीपिन लिनक्सची फक्त ओळख इतकेच असल्यामुळे जास्त विस्तारात जात येत नाही, परंतु जाता जाता एक नक्की सांगू इच्छीतो की ज्या लोकांनी मला दीपिन लिनक्स वापरताना super+tab वापरताना बघीतलं आहे त्या प्रत्येकाने “हे काय, windows मधे असे करता येते का?” असे हमखास विचारलेले आहे 🙂
super+tab वापरून मला चालू असलेल्या वेगवेगळ्या programs मधे जाता येते. windows मधे जर आपण alt+tab वापरले असेल, तर आपल्याला super+tab नक्की आवडेल.
दीपिन लिनक्स परीपूर्ण आहे का? तर “नक्कीच नाही” असेच म्हणावे लागेल. दीपिनची २०१४ edition जरा unstable होती, त्यात देवनागरी लिपीचा चांगला support नव्हता, पण २०१४.१ मधे खूप सुधारणा केल्या आहेत. देवनागरी लिपीचा support सुध्दा ibus द्वारे आहे (हा लेख मी दीपिन २०१४.१ वापरून लिहिला आहे )
अजून एका बाबतीत सुधारणेला वाव आहे – तो म्हणजे भाषेचा अडसर. दीपिन चीनमधे विकसीत केले गेले असल्या मुळे, बहुतांशी माहिती chinese मधेच आहे. पण दीपिन विकसीत करणाऱ्या लोकांना हा प्रश्न माहीत आहे – त्यांचे कर्मचारी इंग्रजीचं प्रशिक्षण घेत आहेत.
दीपिन लिनक्सबद्दल अधिक माहिती :http://www.linuxdeepin.com/index.en.html
स्क्रीनशॉटस : http://www.linuxdeepin.com/feature2014.en.html
इंग्लीश फोरम : http://www.linuxdeepin.com/forum/8
आपण मागील लेखात पाहिल्याप्रमाणे GIT ही एक प्रणाली आहे. तर ही प्रणाली वापरण्यासाठी आपल्याला नेमके काय काय गरजेचे आहे ?
१)GIT
२)GIT Client
३)Hosting Provider
यापैकी प्रत्येक गोष्टीची अधिक विस्ताराने माहिती घेऊ.
GIT : ही प्रणाली आपल्याला आपल्या computer वर install करावी लागते. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे GIT मोफत उपलब्ध आहे . http://git-scm.com/downloads या ठिकाणावरून ते download करता येते. जर तुम्ही Linux वापरत असाल तर तुमच्या Terminal मध्ये $ apt-get install git Command run करा .
GIT Client : GIT हे commands वापरून चालवता येते. परंतु आपल्या सुलभतेसाठी काही clients म्हणजे अशी softwares जी तुम्हाला GIT command साठी काही user interface उपलब्ध करुन देतात. याद्वारे तुम्ही अत्यंत साध्या सोप्या गोष्टी वापरून GIT शिकू शकता.
यासाठी उपलब्ध असलेला Smart GIT हा पर्याय आपण पुढच्या लेखामध्ये पाहू.
HostingProvider :.
यासाठी देखील काही पर्याय उपलब्ध आहेत.
१) GIT Hub
२)Bit Bucket
तर वरील प्रत्येक गोष्ट GIT implement करण्यासाठी आवश्यक आहे. परंतु त्याही आधी काही संज्ञा (Terminologies ) आपल्याला माहीती असणे गरजेचे आहे .
१)Repository– आपला code व फाईल्स ज्या आपल्याला GIT वापरून जतन करायच्या आहेत त्या ज्या डिरेक्टरीमध्ये आहेत ती आपली “Repository”, म्हणजेच “Storage Location”.
२)GIT commands – GIT वापरण्यासाठी काही commands आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे.
git init: एखादी डिरेक्टरी आपल्याला “Repository” म्हणून घोषित करायची असेल तर त्यासाठी ही command वापरली जाते.
git status: आपल्या Repository चे status जाणून घेण्यासाठी ही command वापरली जाते. कोणत्या फाईल्सची भर पडलेली आहे(GIT द्वारे न जोडलेल्या), कोणत्या फाइल्स बदलल्या आहेत, कोणत्या काढून टाकल्या आहेत याची सर्व माहिती ह्या command द्वारे मिळते. प्रत्येक वेळी ही command run करणे फायद्याचे ठरते कारण सगळे बदल आपल्याला लगेच लक्षात येतात.
git pull: एकापेक्षा जास्त लोक जर repository वापरत असतील तर त्यांनी केलेले बदल आपण समाविष्ट करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी ही command वापरली जाते. आपण केलेल्या बदलांना धक्का न लावता ही command ते बदल समाविष्ट करून घेते.
git commit: आता आपण बदल केलेल्या फाइल्स git मध्ये अद्ययावत करणे हे काम commit ही command करते. त्याचप्रमाणे, काय बदल केले ह्याची माहिती सुद्धा आपण या command द्वारे लिहून ठेऊ शकतो. त्यासाठी git commit -m “आपण केलेला बदल ” अशी वापरावी.
git push: आपण केलेले बदल इंटरनेटवरील repository वर म्हणजेच “Remote repository”वर टाकायचे असल्यास ही command वापरली जाते. या command द्वारे आपण केलेले सर्व बदल एका version मध्ये सुरक्षित रहातात.
या commands जर वापरून पाहायच्या असतील तर GIT ने त्यांच्याच साईटवर एक छान सोय दिली आहे.
GIT : म्हणजे नेमके काय?
खरे तर GIT म्हणजे Version Control And Source Code Management System
Version म्हणजे आवृत्ती. मग कशाची आवृत्ती? आपण GIT म्हणजे फक्त Software प्रोजेक्ट्स संदर्भातच वापरली जाणारी प्रणाली असे ऐकले असेल. पण या क्षेत्रात जरी ती मोठ्या प्रमाणात वापरली जात असेल तरी कोणत्याही प्रकारची फ़ाईल आपण GIT मध्ये संलग्न करून वापरू शकतो. म्हणजेच GIT ही Document Control System म्हणूनही वापरली जाते. Software प्रोजेक्ट्स बाबतीत बोलायचे झाल्यास, आपण लिहिलेला कोड (code) एकत्रितपणे पण प्रत्येक वेळी नव्या आवृत्तीप्रमाणे संचय करणारी एक व्यवस्था म्हणजे GIT.
आता उदाहरण द्यायचे झाल्यास, समजा, २ लोक एकाच प्रोजेक्टवर काम करत आहेत. मग आता जर एकाने काही काम केले आणि दुसऱ्याने काही आणखी काम केले तर आपल्याला ह्या दोन गोष्टी एकत्र करायला काय करावे लागेल? एका ठिकाणाहून Copy आणि दुसरीकडे Paste:) बरोबर ना? मग ह्या प्रकारात इकडे-तिकडे काहीतरी गोंधळ होतात आणि चालणारे software चालेनासे होते. त्याचप्रमाणे जर बदल केलेली प्रत्येक आवृत्ती आपणांस सांभाळायची असेल तर काय? एकाच ठिकाणी दोघांना बदल करायचा असेल, तर काय? आता केलेले बदल नाहीसे करून पूर्ववत करायचे असेल तर? एका तयार आवृत्तीपासून परत २-३ वेगळ्या आवृत्ती करायच्या असल्यास काय? असे अनेक प्रश्न आहेत ज्यांचे उत्तर आहे GIT!
म्हणजे वर दिलेले सर्व घटनाक्रम लक्षात घेऊन त्या सर्व बाबींसकट तुमच्या source code ची काळजी घेणारी ही एक प्रणाली आहे.
जशी GIT ही एक प्रणाली आहे त्याचप्रमाणे आणखी काही प्रणालीदेखील अस्तित्वात आहेत जसे की, SVN, Mercurial इ. मात्र या लेखमालेत आपण GIT विषयीच शिकणार आहोत.
GIT च्या इतिहासाविषयी थोडेसे:
GIT प्रणाली तयार होण्यामागे एक गोष्ट दडलेली आहे. आपल्याला माहित आहे की Linux कर्नल हे Open Source आणि अतिशय व्यापक प्रोजेक्ट आहे. ह्या प्रोजेक्टवर अनेक जण काम करत असल्याने लहान लहान तुकड्यामध्ये ते विकसीत झाले.Linux च्या सुरवातीच्या बऱ्याच काळात (१९९१ ते २००२) वेळोवेळी केलेले बदल archived फाईल्सच्या माध्यमात संग्रहीत केले जात. २००२ मध्ये मात्र यासाठी linux community, BitKeeper नावाची एक Propritory DVCS System वापरु लागले. २००५ मध्ये मात्र Linux आणि ही कंपनी यांत वाद झाल्याने ही मोफत सेवा बंद करण्यात आली. आणि हीच गोष्ट Linux Community, प्रामुख्याने लायनस टोरव्हॉल्ड्स (Linus Torvalds) Linux चा जनक, ह्यांना GIT निर्माण करण्यास प्रेरक ठरली व GIT चा जन्म झाला.
ही सुविधा तयार करताना प्रामुख्याने खलील बाबींचा विचार करणात आला:
Speed (वेग)
Simple design (साधं-सोप्पं design )
Strong support for non-linear development (thousands of parallel branches)
Fully distributed
Able to handle large projects like the Linux kernel efficiently (speed and data size)
२००५ पासून linux ही वापरण्यासाठी अतिशय सुलभ आणि वरील सर्ब बाबी अंतर्भूत असलेली सक्षम प्रणाली म्हणूनच सर्वमान्य आहे.
GIT हे मोफत उपलब्ध असून GNU( General Public License) च्या अंतर्गत वितरीत केले जाते.
GIT कसे वापरायचे, त्यासाठी कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत हे आपण पुढील भागात पाहू.
हा पुर्वप्रकाशीत लेख, प्रसाद मेहेंदळे ह्यांनी लिहिला असुन तो येथे उपलब्ध आहे, टेक मराठीच्या वाचकांसाठी तो येथे पुनःप्रकाशीत करत आहोत.
उबंटू लिनक्स हा, लिनक्स या कार्यकारी प्रणालीचा (operating system) एक पर्याय आहे. या लेखात
लिनक्स आणि मुक्त प्रणालींविषयी जास्त माहिती देत आहे.
लिनक्स ही काही केवळ एक संगणक प्रणाली नाही. ती एका जागतिक चळवळीचा
महत्वाचा भाग आहे. सारे जग एकाच अर्थधर्माचे पालन करत असताना, संगणक हा
त्यातला महत्वाचा घटक बनला आहे हे सगळ्यांनाच मान्य आहे. या
अतिमहत्वाच्या घटकावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी
असणाऱ्या सॉफ्टवेअर कंपन्यांनीही धसका घ्यावा असे तत्वज्ञान लिनक्स मागे
आहे.
लिनक्स लोगो
ज्यावेळी संगणक क्षेत्रात घडवल्या जाणाऱ्या प्रत्येक निर्मितीची केवळ
दामदुप्पटच नव्हे तर कैक पट वसुली करण्याची पद्धत होती, त्यावेळी मुळच्या
फिनलंडच्या आणि नंतर अमेरिकास्थित लिनस टोरवाल्ड्स या संगणक तज्ञाने
मोठ्या संगणकावर वापरल्या जाणाऱ्या युनिक्स या कार्यप्रणाली सारखी
ताकदवान आणि तिच्याशी नाते सांगणारी नवी प्रणाली व्यक्तिगत संगणकांसाठी
लिहिली…. खरे तर त्याचा गाभा तयार केला. आणि इंटरनेट वरून तो इतरांसाठी
खुला केला. जगभर पसरलेल्या संगणक तज्ञांना तो आवडला. नंतर त्यांनी त्या
गाभ्यावर अवलंबून अशी कार्यकारी प्रणाली जन्माला घातली. वाढवली. आता या
बाळाने चांगलेच बाळसे धरले आहे.
त्याही आधी रिचर्ड एम्. स्टॉलमन या संगणकतज्ञाने असा विचार मांडला की
प्रत्येक संगणक प्रणाली मुक्त असायलाच हवी. हा विचार त्याने मग त्याच्या फ्री सॉफ्टवेअर फौंडेशन या संस्थेमार्फत जगभर पसरवला. या विचारांमधील मूळ
तत्व असे की प्रत्येक प्रणाली व त्यातील प्रोग्राम्स सर्वांना
वाचण्यासाठी, कॉपी करण्यासाठी , वापरण्यासाठी आणि बदल करून सुधारणा
करण्यासाठी खुले असायलाच हवेत. हा खुलेपणा-स्वातंत्र्य ‘ फ्री ‘ या
शब्दात अभिप्रेत आहे.
तलवारी पेक्षा तराजू बरा या न्यायाने नवनिर्मिती, उत्पादन व विक्री याचा
वापर इतरांवर ताबा मिळवण्यासाठी करण्याचे तंत्र, यंत्रसंस्कृतीने रुजविले
आणि बाजाराचे रूपांतर रणांगणात केले. अशा काळात उत्पादनाच्या
वापरकर्त्याला ते उत्पादन बनवण्याची प्रक्रिया सांगून टाकून, त्याची
इच्छा आणि कुवत असेल तर त्या उत्पादनात बदल, सुधारणा करण्याचे
स्वातंत्ऱ्य देणारे हे तत्वज्ञान स्टॉलमन यांनी मांडले. ज्या बाजारात
एखादी वस्तू विकताना किंवा विकण्यासाठी दुसरी वस्तू फ्री म्हणजे फुकट
देणारी फसवी युक्ती वापरली गेली, तिथेच फ्री या शब्दाचा दुसरा अर्थ –
स्वातंत्र्य , निदान संगणकाच्या क्षेत्रात तरी प्रत्यक्षात आला आहे.
लिनक्स ही फ्री ऑपरेटिंग सिस्टीम आहे. पण याचा नेमका अर्थ काय हे नीट
समजून घेऊया. त्यासाठी संगणकीय क्षेत्रातल्या काही पारिभाषिक संज्ञांचा
परीचय करून घ्यावा लागेल.
संगणक म्हणजे आपल्या समोर दिसणारा पडदा, कीबोर्ड, माऊस आणि त्याचा मेंदू.
या मेंदूला मायक्रो प्रोसेसर म्हणतात. संगणकाच्या विविध भागांशी आणि
वापरणाऱ्याशी संपर्क निर्माण व्हावा यासाठी आणि विविध कामे करणाऱ्या
प्रणाली वापरता याव्यात म्हणून एक मूलभूत संगणक प्रणाली संगणकाच्या
स्मृतिकक्षात भरावी लागते. ती कार्यकारी प्रणाली होय. प्राण्याचे पिल्लू,
अगदी लहान असतानाही पहाणे , ऐकणे, हालचाल करणे, आवाज काढणे अशा अनेक
प्राथमिक क्रिया करू शकते. या करण्यासाठी या पिल्लाकडे जी प्रणाली असते.
तशीच संगणकाची कार्यकारी प्रणाली असते. एकदा या क्रिया करता यायला
लागल्या की मग इतर गोष्टी ते पिल्लू शिकू शकते. नंतर शिकण्याच्या
गोष्टींची तुलना आपल्याला संगणकात वापरल्या जाणाऱ्या इतर उपयुक्त
प्रणालींशी करता येते. या प्रणालींना इंग्रजीत अँप्लिकेशन सॉफ्टवेअर
म्हटले जाते. यात कचेरीत वापरल्या जाणाऱ्या ऑफिस सूट, हिशेब प्रणाली,
चित्रे काढण्याची प्रणाली या सारख्या प्रणालींचा अंतर्भाव करता येईल.
संगणकाची एकूण परिणामकारकता त्यावरील कार्यकारी प्रणालीवर अवलंबून असते.
जगभर प्रसिद्ध असलेली आणि अनेक ठिकाणी वापरली जाणारी विंडोज ही प्रणाली,
अनेकांना ठाऊक असते. हल्लीच निरनिराळ्या कारणांमुळे लिनक्सचे नाव
आपल्यापैकी अनेकांच्या कानावर आहे. साधारणपणे विंडोज वर ज्या ज्या गोष्टी
करता येतात, त्या सर्व लिनक्स वर करता येतातच. पण अनेक बाबतीत लिनक्स
जास्त सरस आहे. पूर्वी लिनक्स ही फक्त अभियंते आणि शास्त्रज्ञ यांनी
वापरण्याची प्रणाली होती. माऊसचा कमी वापर आणि उपयोजित प्रणालींची कमी
संख्या, आणि लोकप्रिय विंडोजच्या पेक्षा वेगळ्या आज्ञा या कारणांमुळे
लिनक्स लोकाभिमुख झाली नाही. आता मात्र, गेल्या काही वर्षात जागतिक
संगणकतज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे या सर्व अडचणींवर मात करून
लिनक्सने आपले प्रभावक्षेत्र प्रचंड वाढवले आहे.
“लिनक्समधे असे काय आहे की ज्यामुळे आम्ही विंडोजचा वापर बंद करून लिनक्स
वापरावे ?” हा अनेकांचा प्रश्न असू शकतो. त्यातल्या अनेकांना आपल्या
संगणकाबरोबरच “आणतानाच बसवून मिळालेली ” जागतिक दबदब्याची विंडोज प्रणाली
वापरायला लायसेन्स लागते आणि त्यासाठी सुमारे ४-५ हजार रुपये जादा मोजावे
लागतात याची कल्पनाच नसते. पण “तसे सगळेच तर करतात ” या सबबीवर या कडे
दुर्लक्ष केले जाते. “तसे असेल तर मग आता पर्यंत आमच्यावर काहीच कारवाई
का झाली नाही ?” या त्यांच्या प्रश्नाचे अजिबात उत्तर न देता लिनक्स का
वापरावे या प्रश्नाचे उत्तरआता आपण पहाणार आहोत.
लिनक्स वापरावे कारण त्याची संगणकावर प्रतिस्थापना करणाऱ्या सी.डी. मधेच
ही प्रणाली इतरांना कॉपी करून देण्याचे
स्वातंत्र्य देणारे लायसेन्स अंतर्भूत असते.
लिनक्स वापरावे कारण, लिनक्स स्थापना करण्याची सी.डी. आपल्याला कोऱ्या
सी.डी. पेक्षा थोड्या जास्त किमतीत (सुमारे २५ ते १०० रु.) उपलब्ध होऊ
शकते. किंवा तुमच्या मित्राकडून मोफत मिळू शकते.
लिनक्स वापरावे कारण ते वापरणे अवघड नाही फक्त थोडेसे वेगळे आहे.
लिनक्स वापरावे कारण ढोबळ मानाने पहाता त्याला व्हायरसचा त्रास होऊ शकत नाही.
लिनक्स वापरावे कारण ते महिनोन्महिने दिवस रात्र अविरत चालू शकते. ते
स्थिर आहे. त्याच्या वरील प्रणाली सहजासहजी कोलमडून पडत नाहीत.
लिनक्स वापरणे अधिक सुरक्षित आहे कारण ते पारदर्शी आहे. या प्रणालीचे
सर्व अंतरंग सर्वांना पहाण्यासाठी खुले आहेत. त्यामुळे कोणतीही
आक्षेपार्ह गोष्ट करणारी प्रणाली त्यात लपवणे अवघड आहे. आपण माहितीच्या
जालात विहार करताना आपला संगणक इतर संगणकांना जोडलेला असतो. अशा वेळी
ज्या प्रणाली पारदर्शक नसतात त्या वापरकर्त्यासाठी धोकादायक ठरू शकतात.
विशेषतः संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळा व व्यक्ती, राष्ट्रीय संरक्षणाबाबतची
गुपिते संभाळणारे संगणक, किंवा लहान मोठ्या कंपन्यांचे आर्थिक व्यवहार
अपारदर्शी प्रणाली वापरल्याने असुरक्षित असतात.
लिनक्स वापरावे कारण या प्रणालीत होणाऱ्या सुधारणा तत्परतेने आणि सहजपणे
आपल्यापर्यंत पोहोचतात.
लिनक्स वापरावे कारण जागतिक दर्जाच्या प्रणाली कशा लिहिल्या आहेत ते
संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना समजू शकते. या विद्यार्थ्यांना विविध
प्रणाली लिहिण्यासाठीची अवजारे ती प्रणाली प्रस्थापित करतानाच संगणकावर
घेता येतात. ही अवजारे मुक्त आणि मुफ्त असल्याने त्यासाठी
विद्यार्थ्यांना कोणताही वेगळा खर्च करावा लागत नाही (किंवा चोऱ्या
कराव्या लागत नाहीत).
संगणकाचा हा आत्मा असा जवळजवळ फुकट वाटणे कोणाला कसे परवडते हा प्रश्न
अनेकांना पडू शकेल. जगभरातले लाखो संगणकतज्ञ आपापल्या (फारसे न आवडणारे
काम असणाऱ्या) नोकऱ्या संभाळून घरी आल्यावर संगणकावर ही नवी निर्मिती
करतात. त्यांचा पोटाचा प्रश्न सुटलेला असतो, पण निर्मितीचे वेड त्यांना
स्वस्थ बसू देत नाही. अशा वेळी मुक्त आणि मुफ्त लिनक्सवर त्यांनी
लिहिलेली प्रणाली अनेकांच्या उपयोगी पडू शकते. उपयुक्ततेत कणभरही कमी
नसणारी ही प्रणाली, विकण्याची त्यांना इच्छा नसते किंवा तसली धडपड
करण्याची त्यांची कुवत नसते वा त्यांना तेवढा वेळ नसतो. मग पडेल भावात
कोणातरी बड्या दादाला (बिग ब्रदर) ती विकण्यापेक्षा लिनक्स मार्फत
जगभरच्या लोकांनी ती वापरली यातच त्यांचा आनंद असतो.
लिनक्सचे यश दडले आहे ते ज्या परवान्याखाली ते वितरित केले जाते त्या
परवान्याच्या (लायसेन्स) रचनेत. हा परवाना (GNU-GPL) या नावाने प्रसिद्ध
आहे. या परवान्यातील कळीचा शब्द आहे स्वातंत्र्य. ही कार्यकारी प्रणाली
वापरण्याचे, कॉपी करण्याचे, इतरांना वाटण्याचे, ती वाचून त्यात योग्य ते
बदल करून सुधारणा करण्याचे आणि ती विकण्याचेही स्वातंत्र्य. विविध
संगणकतज्ञांनी इंटरनेटवर ठेवलेल्या त्यांच्या (GNU-GPL परवाना असणाऱ्या)
मुक्त निर्मिती, विविध कंपन्या उतरवून घेतात. त्या एकत्र करतात आणि नंतर
विकतात. मोठ्या कंपन्या त्यांच्या कडून या प्रणाली विकतही घेतात. कारण
मोठ्या कंपन्यात काम करणाऱ्या लोकांचा वेळ वाचवण्यासाठी मोठ्या कंपन्या
लिनक्स कंपन्यांकडून अडचणी सोडवण्याची सेवा मिळवतात. असे घडते कारण
(GNU-GPL) परवाना कशाचीही सक्ती करत नाही .अगदी प्रणाली फुकट
वाटण्याचीही.
भारतीय संगणक तज्ञांचा यात काय सहभाग आहे ? काही सन्माननीय अपवाद वगळता
अगदी थोडासाच. भारतीय बुद्धिमत्ता सेवा क्षेत्रात थोडीशी पुढे आहे पण
नव्या उपयुक्त प्रणाली लिहिण्यात मात्र नाही हे मान्य करावेच लागेल.
म्हणूनच कमी किंवा शून्य खर्चाची पण अतिशय ताकदवान लिनक्स वापरून नव्या
उपयुक्त प्रणाली लिहिणे आणि नंतरच्या सेवा दिल्या बद्दल युरो किंवा डॉलर
मिळवणे हा मार्ग नक्कीच श्रेयस्कर ठरेल.
प्रणाली वापरण्यातल्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमी लिनक्स कंपन्यांकडेच धाव
घ्यावी लागते असेही नाही. जगभर चालू असणारे लिनक्स वापरणाऱ्यांचे गट
(Linux User Groups) कोणाही लिनक्स वापरणाऱ्याला ही सेवा मोफत देतात.
पुण्यात असा गट पुणे लिनक्स यूजर् ग्रुप (PLUG) या नावाने कार्यरत आहे.
दोन हजार पेक्षा जास्त सदस्य असणारा हा गट लिनक्सचा प्रचार, प्रसार,
प्रशिक्षण ना नफा या तत्वावर करीत असतो.
तुम्ही जेव्हा लिनक्स वापरता किंवा दुसऱ्याच्या संगणकावर बसवता, तेव्हा
तो दुसरा, तुमचे गिऱ्हाइक बनत नाही .मित्र बनतो. लिनक्स वापरल्याने बड्या
दादाच्या खोडावरचे तुम्ही बांडगूळ बनत नाही ते सहजीवन असते. लिनक्स
वापरून तुम्ही एकाच कंपनीला जगात सर्वशक्तिमान आणि एकाच व्यक्तीला सर्वात
धनवान बनण्यापासून थोपवू शकता.
उद्या येऊ घातलेल्या सर्वव्यापी संगणकविश्वात वसुधैवकुटुंबकम् हा मंत्र
सांगणाऱ्या भारताला लिनक्स ही प्रणालीच सुयोग्य आणि श्रेयस्कर नाही काय?
(हा लेख उबंटू लिनक्स १०.०४ या लिनक्स प्रणालीचा आणि लिबर-ऑफिस या
उपयुक्त प्रणालीचा वापर करून टंकलिखित केला आहे.)
हा पुर्वप्रकाशीत लेख, प्रसाद मेहेंदळे ह्यांनी लिहिला असुन तो येथे उपलब्ध आहे, टेक मराठीच्या वाचकांसाठी तो येथे पुनःप्रकाशीत करत आहोत.
सदर लेख श्री. मंदार कुलकर्णी यांनी लिहीला आहे. हा लेख सकाळ आवृत्तीत प्रकाशीत झाला होता. ते येथे पुन:प्रकाशीत करण्यात येत आहे.
विकिपीडिया
इंटरनेटने अवघे जग अगदी कमी कालावधीमध्ये व्यापून टाकले आणि तो आपल्या जीवनचा एक अविभाज्य भाग झाला आहे. आज जगातली कोणतीही ताजी बातमी, ताजी घटना या सर्वात पहिल्यांदा इंटरनेट उपलब्ध होतात. ज्यांना विशिष्ट वेबसाइट ची माहिती हवी असते ते साहजिकच गुगल किंवा तत्सम सर्च इंजिन वर जातात. तर ज्या मंडळींना ज्ञान आणि माहिती हवी आहे ते विकिपीडियाचा वापर करतात. इंग्रजी विकिपीडियाच्या सर्च मध्ये कुठलाही शब्द टाकला की त्या संदर्भात संपूर्ण माहिती इंग्रजी विकिपीडिया वर उपलब्ध होते. याचे कारण आज इंग्रजी विकिपीडिया मध्ये जवळजवळ ३८ लाख लेख आहेत.
“मराठी विकिपीडिया” यात मागे नाही. २००३ च्या महाराष्ट्र दिनी “मराठी विकिपीडिया” ची सुरुवात झाली. मराठी जाणणारे अनेकजण यास सक्रीय हातभार लावत आहेत. “वसंत पंचमी” हा पहिला ज्ञात लेख मराठी विकिपीडियावर तयार झाला. विकिपीडियाच्या मराठी अवतारात सध्या ३४८६८ लेख उपलब्ध करण्यात आले असून एकूण संपादनाची संख्या ९ लाखाच्या जवळपास आहे. मराठी विकिपीडिया मध्ये एकूण पानांची संख्या ९४००० असून एकूण सभासद १९६०० पेक्षा जास्त आहेत॰ येथे सध्या १३२ नियमित सदस्य असून अखंड कार्यरत आहेत. दिवसाचे २४ तास जगभरातून यामध्ये भर घालणे चालू आहे. हे सर्व सदस्य नियमितपणे या वेबसाइटसाठी काम करीत आहेत.
मराठी विकिपीडियाचा प्रचालक म्हणून अभ्यास करील असताना असे लक्षात आले की देवनागरी लिपीमध्ये लिहिताना सामान्य जणांना येणार्या अडचणी या मराठी विकिपीडिया ला सध्या मारक ठरीत आहेत. इंग्रजी ही जगाची भाषा असल्याने आजकाल प्रत्येकाला इंग्रजी मध्ये टाइप करता येते पण त्याच सहजतेने मराठी मध्ये टाइप करणे अथवा लिहिणे बहूसंख्य लोकांना जमत नाही. अशा वेळेस साहजिकच जे सोपे आहे त्याकडे धावण्याचा कल असल्याने मराठी पेक्षा इंग्रजीकडे धावण्याचा मोह सर्वांना होतो. आज बहुसंख्य मंडळींना मराठी विकिपीडिया माहिती आहे आणि ते मराठी विकिपीडिया फक्त माहिती पहाण्यासाठी भेट देतात पण या ज्ञान कोशात भर घालणे ही तितकेच महत्वाचे आहे. आज मराठी मध्ये असंख्य वेब साइट्स, ब्लॉग्स लिहिले जातात पण त्यातल्या बर्याच लेखकांना त्यात भर कशी घालायची याचे फारसे ज्ञान नसते. एमेल सुद्धा जवळ जवळ सर्वच जण देवनागरी च्या ऐवजी रोमन मधेच लिहिणे जास्त पसंत करतात. आज सगळे संगणक रोमन लिपीचा की बोर्ड वर देत असल्याने देवनागरी संगणकावर लिहिणे हे असंख्य जणांना अवघड गोष्ट आहे. अनेक जण या बाबतीत नाराजी व्यक्त करतात. अगदी गुगल च्या सर्च इंजिनवरही मराठी शब्द शोधणे ही सोपी गोष्ट नाही. मराठी टायपिंग म्हणजे कटकट अशी अनेकांची धारणा असते. त्यामुळे साहजिकच अनेक मराठी मंडळी मराठी विकिपीडिया पासून किंवा मराठी विकिपीडियाच्या संपादन पासून वंचित राहतात.
या सर्व अडचणी विचारात घेता मराठी विकिपीडिया मधील काही संपादकांनी विविध पर्याय लेखकांना देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी विकिपीडिया वर एक देवनागरी फॉन्ट दिलेला आहे. हा उनिकोड फॉन्ट असून वापरायला अतिशत सोपा आहे. मराठी विकिपीडियाच्या कुठल्याही पानावर उजव्या कोपर्यात “देवनागरी” अशी अक्षरे असून त्याच्या शेजारी एक छोटी चौकट आहे. त्या चौकटीत ‘टिक’ केले की मराठी विकिपीडियावर आपण देवनागरी मध्ये लिहायला सुरुवात करू शकतो.
काही जणांना हा देवनागरी फॉन्ट वापरणे काहीसे अवघड जात असेल तर त्यांनी निराश व्हायचे काहीच कारण नाही. त्यासाठी इंटरनेट च्या जाळ्यात अनेक सोयी आहेत. त्या अशा:
गूगल ने मराठी ट्रान्सलेटरेशन टुल तयार केले आहे. http://www.google.com/transliterate या मध्ये रोमन मध्ये लिहिलेला शब्द स्पेस बार दाबल्यावर देवनागरी लिपीमध्ये रूपांतरित होतो. या मध्ये काही ओळी लिहून त्या कॉपी करून मराठी विकिपीडिया वर तक्ता येऊ शकतात.
क्वीलपॅड या वेब साईट मध्ये भारतातील विविध भाषांमध्ये लिखाण करायची सुविधा दिली आहे. http://www.quillpad.in/marathi/. त्यामध्ये मराठी भाषा निवडून देवनागरी मध्ये लिखाण करता येते.
ज्यांना देवनागरी लिपीमधील लिखाण एका ठिकाणी लिहून दुसरीकडे कॉपी करणे अवघड जात असेल त्यांच्यासाठी अजून एक झकास सोय ‘एपिक’ नावाचा एका भारतीय ब्रौझर मध्ये आहे. http://www.epicbrowser.com/ . यात 12 भारतीय भाषांसह एकूण 20 जागतिक भाषांमध्ये कोणत्याही इंटरनेटवरील खिडकीमध्ये लिहायची सोय आहे. हा ब्रौझर एकदाच आपल्या संगणकावर उतरवून घेतल्यावर आपल्याला हवे असलेले कोणतेही पान त्या ब्रौझर मध्ये उघडायचे आणि ज्या खिडकी मध्ये आपल्याला लिहायचे आहे तेथे गेल्यावर त्या खिडकीच्या उजवीकडील वरील कोपर्यात भाषांचा पर्याय येतो. तेथे मराठी भाषा निवडून त्या मुख्य खिडकीत सरळ लिहीत सुटायचे. प्रत्येक रोमन लिपीतील शब्दाचे देवनागरी मध्ये आपसूक भाषांतर केले जाते. जिथे एका रोमन शब्दाचे अनेक देवनागरी शब्द होऊ शकतात तेथे तसे पर्याय पाहायला मिळतात.
आता अनेक लेखक असे म्हणू शकतील की वरील सर्व पर्यायांना इंटरनेट असणे किंवा संगणकावर इंटरनेट चालू राहणे आवश्यक आहे. जर काही मंडळींना आधी माहिती पूर्ण लिहून मगच मराठी विकिपीडियावर भरायची असेल तर त्यांच्यासाठी मायक्रोसोफ्ट ने एक सुंदर सोय केली आहे. http://specials.msn.co.in/ilit/Marathi.aspx या वेबसाइट वरून काही माहिती आपल्या संगणकात उतरवून घ्यायची आणि संगणकात कंट्रोल पॅनल मधील ‘भाषा’ मध्ये काही छोटेसे बादल केले तर संगणकाच्या लँग्वेज बार मध्ये मराठी भाषा येऊन बसेल. ती भाषा निवडली की अगदी सहज पाने वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट मध्ये कोठेही कसेही लिखाण करता येईल. हे लिखाण करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही. तसेच जिथे एका रोमन शब्दाचे अनेक देवनागरी शब्द होऊ शकतात तेथे तसे पर्याय पाहायला आहेतच.
तात्पर्य, देवनागरी लिहिणे हे आता अगदी सोपे झाले आहे. मराठी विकिपीडिया मध्ये भर घालण्यासाठी आणि मराठी विकिपीडिया उतरोत्तर वाढवण्यासाठी ज्या अडचणी येतात त्यावर विकिपीडिया ची तांत्रिक मंडळी अहोरात्र काम करीत असतात.
दिनांक १८ ते २० नोव्हे. २०११ या काळात मुंबई येथे “WikiConference India 2011” भरवली जात आहे. या सम्मेलनात ‘मराठी विकिपीडिया’ हा अतिशय प्राधान्याने घेतला गेला आहे. यात मराठी भाषेतून काही भाषणे आणि चर्चासत्र आयोजित केली असून महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरून मराठी भाषिक आणि अन्य भाषिक येथे येणार आहेत. त्याचप्रमाणे मुख्य संमेलनात मराठी विकिपीडिया बरोबरच अन्य भारतीय भाषां संदर्भात माहितीची देवाणघेवाण आणि चर्चा आयोजली आहे.
मराठी विकिपीडिया पाहण्यासाठी http://mr.wikipedia.org वर भेट द्या आणि मराठी विकिपीडिया मध्ये आपण सारे आपल्याकडे असलेल्या ज्ञानाची भर घालूया.
आजच्या जगात ज्ञान हेच धन आहे. आज ज्याच्या जवळ जास्त माहिती तो जास्त सुरक्षित आहे. त्याच मुळे आज ज्ञानाची किंमतही वाढली आहे. जसे की, कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घ्या किंवा कोणतेही पुस्तक घ्या, ते फ़ारच महाग झाले आहे. बरेचदा महागाईमुळे आपल्याला आपल्या ज्ञानाच्या भुकेला मुरड घालावी लागते.
जर हे सर्व ज्ञान मोफ़त उपलब्ध झाल्यास किती छान होईल. असाच विचार ’जिमी वेल्स’ यांनी केला व त्यावर कृती सुध्दा केली. त्यातूनच Wikipedia चा जन्म झाला. ज्ञानाचे अपरिमीत भंडार लोकांसाठी खुले झाले, ते पण मोफ़त. आपल्या पेकी बरेच लोकांना याबद्दल माहीती असेल पण Wikipedia बरोबरच Wikimedia या समुहाचे अजुन अनेक प्रकल्प आहेत. ते सुध्दा अनेक भाषेतुन उपलब्ध आहेत. हे सर्व मराठीत सुध्दा उपलब्ध आहे. त्याच बद्दल आपण जाणून घेवू.
विकिपीडिया
विकिपिडीया हा प्रकल्पाचा उद्दिष्ट जगातील सर्व भाषेत ज्ञानकोष तयार करणे हा होय. विकिपिडियाचा जन्म १ जानेवारि २००१ ला झाला. आता यात २७३ विविध भाषेत १ करोडच्या वर लेख आहे. यात सर्वात समोर इंगजी भाषा आहे. मराठीत आता ३२,२५६ विविध विषायावरिल लेख आहे व ते वाढत आहेत.
याच प्रमाणे विकिपिडियाचे अनेक प्रकल्प आहेत ते आपण एकेक करुन पाहू.
१. Wikipedia – मुक्त ज्ञानकोश
ह्या प्रकल्पात विविध विषयावर लेख लिहिले आहे. हे लेख मायाजाळावरिल स्वयंसेवक लिहितात. आपल्याला जर संगणक विषयी, नायजेरिया बद्दल किंवा भारताचा इतिहास जाणायचा असेल तर येथे सर्व उपलब्ध आहे. हि माहिती मराठीतही उपलब्ध आहे.
दुवा – http://en.wikipedia.org
मराठी विकिपिडियाला भेट देण्यासाठी – http://mr.wikipedia.org
२. Wiktionary – शब्दकोश
ह्या प्रकल्पात विविध भाषी मोफ़त शब्दकोश प्रत्येक भाषेत तयार करायचा आहे. याचा अर्थ एका भाषेचा उपयोग करुन सर्व भाषेतील सर्व शब्दाची व्याख्या करने. या प्रकल्पाची सुरुवात दिसेंबर २००२ ला झाली. आतापर्यंत यात १५० विविध भाषेत ३० लाख शब्द साठा आहे.दुवा – http://en.wiktionary.org मराठीतील प्रकल्प दुवा – http://mr.wiktionary.org.
मराठीतील लेख लिहिण्यासाठी आपण मराठी विकिपिडियावर जावे व मराठीतील लेखांची संख्या वाढवावी.
३. Wikiquote – अवतरणे
यात विविध प्रसिध्द लोकांचे, पुस्तकातील वा चित्रपटातील अवतरणे घेतली आहे. यात म्हणी , वाक्यप्रचार, घोषणा इ चा समावेश आहे. याची सुरुवात जुले २००३ मध्ये झाली. दुवा – http://en.wikiquote.org/wiki/Main_Page
मराठीतील प्रकल्प दुवा – http://mr.wikiquote.org
४. Wikibooks – ग्रंथसंपदा
या प्रकल्पात मोफ़त इ-पुस्तके, विविध भाषा अभ्यासक्रम इ. चा साठा तयार करणे. याच मुख्य उद्देशः विद्यार्थाना व शिक्षाकांना स्वसाहायता व्हावी याकरीता. येथे विविध पुस्तके मिळू शकतात.
याचा दुवा – http://en.wikibooks.org/
५. Wikisource – स्त्रोतपत्रे
हा विविध भाषेतील प्रकल्प नोव्हेंबर २००३ ला मोफ़त व उपलब्ध असलेले कागदे जमा करण्यासाठी सुरु झाला. यामुळे आता महत्वाचे अनेक कामे जसे की कोणत्याही देशाचे संविधान इ गोष्टी साठवून ठेवता येतात व त्याचे भाषांतर सुद्धा करता येते. यात आता पर्यंत ८.८ लाख विविध कागदे जमा झाली आहे. येथेच मला भारतीय संविधान भेटले.
याचा दुवा – http://en.wikisource.org/
६. Wikiversity – विद्यापीठ
हा प्रकल्प माहिती, शिकण्यारे समूह सोबतच संशोधन करण्यासाठी वाहिलेले आहे. याची सुरुवात १५ ऑगष्ट २००६ ला झाली. हा फ़ार महत्व पुर्ण प्रकल्प आहे. हा फ़क्त विश्वविद्यालया संबधीतच नाही तर कोणत्याहि पातळीवरिल विद्यार्थास मदत होइल असे आहे. यात २०१० पर्यत ३०,००० प्रवेश आहेत.
याचा दुवा – http://en.wikiversity.org/wiki/Wikiversity:Main_Page
७. Wikimedia Commons- सामायिक भंडार
या प्रकल्पात मोफ़त छायाचित्रे, नकाशे , व्हिडिओज, अॅनिमेशन इ चा समावेश आहे. याची सुरुवात सप्टेंबर २००४ ला झाली.
याचा दुवा – http://commons.wikimedia.org/
८. Wikispecies – प्रजातीकोश
या प्रकल्पात विविध सजीव प्राण्यांबद्दल माहिती भेटेते. याची सुरुवार १४ सप्टेंबर २००४ ला झाली. हा प्रकल्प खास करुन वेज्ञानिक गोष्टी साठी आहे. यात २०१० पर्यंत २४ लाख लेख आहेत.
याचा दुवा – http://species.wikimedia.org/
याच बरोबर खालील काही प्रकल्प आहे.
९. Wikinews – बातम्या
यात विविध बातम्या लिहिता येतात. याचे मुख्य काम म्हणजे बातमीची खात्री करणे व विश्वासह्रायता तपासणे हे होय.
दुवा – http://en.wikinews.org/wiki/Main_Page
१०. Media Wiki
हे एक सॉफ़्ट्वेअर आहे. जे की सर्व Wikimedia समुह व इतर संकेतस्थळे वापरतात.
दुवा- http://meta.wikimedia.org
याच प्रमाणे अनेक प्रकल्प wiki- वा -pedia या नावाने सुरु आहेत. पण वरिल १० प्रकल्प सोडुन कोणताही प्रकल्प Wikimedia या समूहाचा नाही. त्याच प्रमाणे Wikimedia वरिल सर्व माहिती वाचनासाठी व वापरण्यासाठी मोफ़त आहे.
याच वर्षी विकिपिडियाला १० वर्षे पुर्ण झाली. आता विकिपिडिया भारतातकडे खास लक्ष देणार आहे. त्यासाठी त्यांनी भारतीय भाषेचा प्रकल्प सुरु केला आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला ते कळवा. त्याच प्रमाणे अधिक माहिती असल्यास सर्वांसोबत वाटा.
WAMP म्हणजे Windows, Apache, MySQL आणि PHP. WAMP सर्व्हर हे असे एक software आहे जे तुमच्या संगणकावर Apache, MySQL आणि PHP या तीनही गोष्टी कार्यान्वित करत.
या लेखात आपण WAMP सर्व्हर आपल्या संगणकावर कसा कार्यान्वित करायचा ते पाहणार आहोत.
WAMP म्हणजे Windows, Apache, MySQL आणि PHP. WAMP सर्व्हर हे असे एक software आहे जे तुमच्या संगणकावर Apache, MySQL आणि PHP या तीनही गोष्टी कार्यान्वित करत.
या लेखात आपण WAMP सर्व्हर आपल्या संगणकावर कसा कार्यान्वित करायचा ते पाहणार आहोत.
WAMP सर्व्हर कसा कार्यान्वित करायचा?
WAMP सर्व्हर तुह्मी इथून डाउनलोड करू शकता.
१. तुह्मी डाउनलोड केलेल्या फाइलवर दोनदा क्लिक करा. आता तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे स्क्रीन दिसेल. स्क्रीनवरील Next या बटणावर क्लिक करा.
२. आता तुह्माला खाली दाखविल्याप्रमाणे License Agreement ची स्क्रीन दिसेल. स्कीनवर दाखवल्याप्रमाणे I accept the agreement हा पर्याय निवडा व Next या बटणावर क्लिक करा.
३. आता तुह्माला WAMP सर्व्हरसाठी आपल्या संगणकावरील जागा निवडायची आहे. इनस्टोलर C:\WAMP हि जागा निवडतो ती जागा आपल्याला बदलायची असल्यास Browse या बटणावर क्लिक करा व तुह्माला हवी असलेली जागा निवडा व Next या बटणावर क्लिक करा.
४.त्यानंतर खाली दिल्याप्रमाणे installation च्या उर्वरीत पायरया पूर्ण करा.
५.आता software installation साठी तयार आहे. Install या बटणावर क्लिक करा म्हणजे आता तुमच्या संगणकावर PHP, MySQL आणि Apache sever कार्यान्वित होईल.
६.आता तुम्हाला browser निवडायचा आहे. तुमच्या संगणकावर असलेल्या beowser पैकी कुठलाहि browser तुह्मी निवडू शकता. खाली दाखवलेल्या स्क्रीनमध्ये internet explorer हा पर्याय निवडला आहे. browser निवडून झाल्यावर open या बटणावर क्लिक करा.
७.आता तुह्माला installar SMTP Setting विषयी विचारेल. तुह्माला त्याबद्दल काही माहित नसल्यास आहे तेच Setting राहु द्या व Next या बटणावर क्लिक करा.
८.आता तुमचे installtion पूर्ण झाले आहे. Finish या बटणावर क्लिक करा.
९.आता तुमच्या संगणकावरील टास्कबारवर WAMP चा छोटासा आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा व त्यावरील localhost हा पर्याय निवडा.
तुह्मी निवडलेल्या browser वर तुह्माला खाली दाखवल्याप्रमाणे स्क्रीन दिसेल.याचा अर्थ तुमच्या संगणकावर WAMP सर्व्हर कार्यान्वित झाला.
अशाप्रकारे तुह्मी तुमच्या संगणकावर WAMP सर्व्हर कार्यान्वित (install ) करू शकता.
WAMP सर्व्हरवर wordpress कसं कार्यान्वित करायचं ते पुढील लेखात पाहू.
रोहन दिघे ह्या २६ वर्षीय तरूणाने ३ वर्षापूर्वी “सोशल वेब फॅक्टरी” नावाची सोशल मिडीया ऍप्लिकेशन बनवीणारी सर्व्हिसेस कंपनी सुरू केली व नावारूपाला आणली. मेहनत व जिद्द यांनी युक्त असा हा त्याचा प्रवास त्याचाचकडून ऐकण्याची बहूमोल संधी POCC ने उपलब्ध करून दिली आहे.
रोहन दिघे ह्या २६ वर्षीय तरूणाने ३ वर्षापूर्वी “सोशल वेब फॅक्टरी” नावाची सोशल मिडीया ऍप्लिकेशन बनवीणारी सर्व्हिसेस कंपनी सुरू केली व नावारूपाला आणली. मेहनत व जिद्द यांनी युक्त असा हा त्याचा प्रवास त्याचाचकडून ऐकण्याची बहूमोल संधी POCC ने उपलब्ध करून दिली आहे.
या वाटचालीमधे आलेले चढ-उतार, एका सर्व्हिसेस कंपनीपासून सुरुवात करून स्वत:च्या कंपनीचे प्रोडक्ट “डील तडका” जे नुकतेच बाजारात आले, हे करतानाचे अनुभव, भविष्याबद्दल दृष्टीकोन ह्या सर्वांबद्दल रोहन आपल्याशी बोलेल.
ही प्रेरणादायक गोष्ट ऐकायला आवर्जून या.
वेळ: दि. ७ मे २०११, दु. ४ ते सायं. ७
स्थळ: Symbiosis Institute Of Comp. Studies & Research(SICSR), अतुर सेंटर, गोखले क्रॉस रोड, मॉडेल कॉलनी, पुणे.
मागच्या लेखात आपण उबुंतू प्रणाली बद्दल थोडक्यात माहिती पहिली.
आता आपण ती कार्यान्वयीत कशी करायची ते पाहू . त्याच्या वेगवेगळ्या पायर्या आहेत.
मागच्या लेखात आपण उबुंटु प्रणाली बद्दल थोडक्यात माहिती पहिली.
आता आपण ती कार्यान्वयीत कशी करायची ते पाहू . त्याच्या वेगवेगळ्या पायर्या आहेत.
पायरी १. प्रथम संगणकाच्या ” BIOS” settings मध्ये जाऊन boot priority option “CD” असा ठेवा आणि नंतर उबुंटु १०.१० ची CD , CD ड्राइव्हमधे ठेऊन पुन्हा: चालू (Restart) करा. (म्हणजे तुमचा संगणक तुम्ही टाकलेल्या उबुंटु १०.१० ची CD वापरून चालू होईल …)
पायरी २. संगणक चालू झाल्यावर तुम्हाला निवड करण्यासाठी मेनू दिसेल. त्यातल्या “Boot From CD ” या पर्यायावर जाऊन enter करा. त्यातल्या ” Install Ubuntu 10.10 ” या आयकॉनवर क्लीक करा.
पायरी ३. एक नवीन विंडो दिसेल. त्यातला “English” पर्याय निवडून ” Forward ” या बटणावर क्लिक करा.
पायरी ४. पुढची विंडो तुमच्या संगाणकाची माहिती दर्शवेल. (उर्वरित रिकामी जागा ई..) ” Forward ” या बटणावर क्लिक करा.
पायरी ५. पुढची विंडो तुम्हाला कोठे ” Install ” करायचे ते विचारेल. शेवटचा पर्याय ” Specify partition manually ” निवडा आणि ” Forward ” या बटणावर क्लिक करा.
पायरी ६. पुढची विंडो तुम्हाला कोणत्या ” partition ” वर ” install ” करायचे आहे ते विचारेल.
हिरवा पट्टा (sda1) हे माझ्या हार्ड डिस्कचे पहिले partition आहे. त्यावर ” Windows ” इंस्टॉल आहे. भगवा आणि निळा हे माझे दुसरे दोन partition आहेत. पांढरा पट्टा म्हणजे ते रिकामी जागा (free space) आहे. आपण त्याच्यावर उबुंटु install करणार आहोत. त्याच्या खालच्या तक्त्यात (10818 MB) free space वर जाऊन ” Add ” हे बटण दाबा.
याठिकाणी आपल्याला लागणारी जागा मोजण्यासाठी पुढील सूत्र तुम्ही वापरू शकता.
रॅम २ जी.बी. पर्यंत असल्यास:
swap partitions = रॅमची साईज (RAM Size) * २
जर रॅम २ जी.बी. पेक्षा जास्त असेल तर:
swap partition = रॅमची साईज (RAM Size) * १
** जर तुमच्या हार्ड डिस्कवर पुरेशी जागा असेल तर कधीही रॅमची साईज (RAM Size) * २ हे सूत्र वापरणे उत्तम.
रूट पार्टीशनसाठी ५० जी.बी. एवढी जागा पुरेशी असते, जर हार्ड डिस्कची जागा कमी असेल तर २० जीबी एवढी ठेवली तरी चालते.
पायरी ७. ” Create New Partition ” नवीन विंडो उघडेल. New partition size आणि Mount Point ” / ” निवडून ” Ok ” वर क्लिक करा.
पायरी ८. पुढची विंडो तुमचे तयार झालेले ” partition ” दाखवेल. (/dev/sda8). आता उर्वरित free space वर क्लिक करून ” Add ” हे बटण दाबा.
पायरी ९. परत ” Create New Partition ” नवीन विंडो उघडेल. New partition size आणि Use as : ” swap area ” निवडून ” Ok ” वर क्लिक करा.
पायरी १०. पुढची विंडो तयार झालेले नवीन ” Partition ” दाखवेल. ” Boot loader ” ” /dev /sda ” निवडून ” इंस्टॉल नाऊ ” वर क्लिक करा.
पायरी ११. Where are you ? Time Zone Kolkata निवडून ” Forward ” वर क्लिक करा.
पायरी १२. Keyboard layout ” USA ” निवडून निवडून ” Forward ” वर क्लिक करा.
पायरी १३. Who are you ? पूर्ण माहिती भरून ” Forward ” वर क्लिक करा.
पायरी १४. Welcome Window, इनस्टॉलेशनची प्रगती दर्शवेल.
ती पूर्ण झाल्यावर संगणक परत चालू होण्या पूर्वी “CD” काढून ” BIOS ” मधून ” Boot priority ” परत ” Hard Disk ” ठेवा आणि संगणक परत चालू करा.
अभिनंदन आपण यशस्वीरीत्या उबुंटु इंस्टॉल केले!
या लेखात काही नविन मुद्दे श्री. नरेश खलासी यांच्या सुचनांनुसार जोडले आहेत.