HTML भाग १: ओळख

बरं कामापुरती HTML कित्येकांना येते, जे लोक नेटवर सतत सर्फिंग करत असतील, विविध ब्लॉग्जवर कमेंट्स देत असतील, त्यांना HTML च्या काही थोड्याफार फॉर्मॅटिंग टॅग्ज माहित असतील. पण कित्येक जण असेही आहेत, ज्यांना HTML चे किंचीतही ज्ञान नसेल… अश्यांसाठी, ह्म्म, नक्कीच HTML ला नवख्या असणार्‍यांसाठी ही लेखमालिका आम्ही सुरू करीत आहोत, त्याचा हा पहिला भाग, म्हणजेच HTML ची ओळख…!

या लेखात HTML काय आहे, HTML चा उपयोग काय, वेब पृष्ठे काय असतात, वेब डॉक्युमेण्ट्स काय असतात, HTML कशी शिकता येईल, त्यासाठी कोण-कोणती साधने/टूल्स लागतील, हे आपण पाहणार आहोत… नंतर या लेखमालिकेच्या पुढील भागांमध्ये HTML मधील विविध टॅग्जचा योग्य उदाहरणांसहित वापर, व इतर बरीच माहिती आपण समजावून घेणार आहोत… लेखाबाबत काही शंका असतील, तर त्या प्रतिक्रियांच्या रुपात अवश्य कळवा…

HTML काय आहे?

HTML ही एक संगणकीय भाषा आहे, ज्याद्वारे वेब पृष्ठे बनवले किंवा सजवले जातात.

• HTML हे Hyper Text Markup Language चे संक्षिप्त रूप आहे.

• HTML ही एखादी प्रोग्रॅमिंग लॅन्ग्वेज नसून मार्क-अप लॅन्ग्वेज आहे, हे प्रथम ध्यानात घ्या.

• मार्क-अप लॅन्ग्वेज ही अनेक मार्क-अप टॅग्जचा संच असते.

• HTML अशाच काही मार्क-अप टॅग्जचा वापर वेब पृष्ठे बनवण्यासाठी किंवा सजवण्यासाठी करते.

HTML टॅग्ज

HTML मार्क-अप टॅग्जना सामान्यतः HTML टॅग्ज म्हणून संबोधले जाते.

• HTML टॅग्ज हे सांकेतिक शब्द असतात व ते कोनिय कंसांनी आच्छादलेले असतात. उदा. <html>

• HTML टॅग्ज सामान्यतः जोड्यांमध्येच येतात. उदा. <b> आणि </b>

• या टॅग्जच्या जोडीतील पहिली टॅग ही स्टार्ट/ओपनिंग टॅग असते, तर दुसरी टॅग ही एण्ड/क्लोजिंग टॅग असते.

• जर या लेखामधील एखाद्या उदाहरणामध्ये तुम्हाला अजुनही अपरिचित असलेल्या टॅग्ज दिसल्या तर मुळीच घाबरून जाऊ नका. लेखाच्या उत्तरार्धापर्यंत तुम्हाला त्या टॅग्जविषयी योग्य माहिती निश्चितच मिळेल!

HTML डॉक्युमेण्ट्स आणि वेब पृष्ठे

• HTML डॉक्युमेण्ट्स हे वेब पृष्ठांचे वर्णन करतात.

• HTML डॉक्युमेण्ट्स मध्ये HTML टॅग्ज आणि साधा मजकूर असतो/असू शकतो.

• HTML डॉक्युमेण्ट्सना वेब पृष्ठे देखील म्हटले जाते.

तुमच्याकडे असणारे एखादे वेब ब्राउजर (उदा. इंटरनेट एक्स्प्लोरर, मोझिला फायरफॉक्स, ओपेरा इत्यादी) वापरण्यामागचा मूळ उद्देश एवढाच की HTML डॉक्युमेण्ट्स वाचणे आणि तुम्हाला समजण्यासाठी त्यांना वेब पृष्ठे म्हणून दर्शवणे. वेब ब्राउजर HTML टॅग्ज जशाच्या-तशा न दर्शवता त्यांचा वापर करून व्यवस्थित सजवलेले वेब पॄष्ठ दर्शवते.

खालील एक सोपे HTML उदाहरण बघा:

<html>
<body>
<h1>पहिली हेडिंग (शिर्षक)</h1>
<p>परिच्छेद</p>
</body>
</html>

वरील उदाहरणाची कारणमीमांसा:

• <html> आणि </html> मधील सर्व मजकूर वेब पृष्ठाचे वर्णन करतो.

• <body> आणि </body> मधील मजकूर हा पृष्ठाचा दर्शनिय भाग आहे, म्हणजे तो वेब पृष्ठावर तुम्हाला दिसू शकतो.

• <h1> आणि </h1> मधील मजकूर हा शिर्षकासारखा जरा मोठा दिसेल.

• <p> आणि </p> मधील मजकूर परिच्छेद दर्शवेल.

या लेखाचा उपयोग घेण्यासाठी तुम्हाला काय लागेल:

• कोणतेही HTML एडिटर, उदा. नोटपॅड

• कोणतेही वेब ब्राउजर उदा. इंटरनेट एक्प्लोरर/मोझिला फायरफॉक्स/गुगल क्रोमिअम इत्यादी

आणि कशाची मुळीच गरज पडणार नाही:

• कार्यशील इंटरनेट जोडणी

• वेब सर्व्हर

• वेब साइट

(क्रमश…)

खराब वा चरे पडलेल्या Cd / DVD मधून data कसा मिळवायचा?

ओरखडे असलेल्या / खराब CD/ DVD वरील माहिती कॉपी होणे  फार कठीण काम असते.त्यातून जर  data हवा असेल तर कसा मिळवायचा? यासंबधी फार उपयुक्त लेख http://www.netbhet.com/2010/04/recover-data-from-scratched-and-damaged.html येथे प्रसिद्ध आहे.

Bad CD DVD Reader हे सॉफ्टवेअर वापरून data कसा मिळवायचा, याबद्दल विस्तृत माहिती screen shots सहित  उपलब्ध आहे.

मूळ लेखावरून:

या प्रक्रियेला लागणारा एकूण कालावधी हा CD/ DVD वरील वाचता येण्याजोगी माहीती, CD/ DVD कितपत चांगल्या परिस्थीत आहे, तुम्हाला हव्या असलेल्या माहितीची एकूण Size म्हणजे एम बी आहे की जी बी  यांसारख्या तांत्रिक बाबींवर अवलंबुन असेल. आणि हो कधीकधी जास्त scratches असतील तर काँप्यूटरचा वेग पण कमी होऊ शकतो.

Software Specifications घेताय? तुमच्यासाठी काही Tips:

सदर post, पल्लवी केळकर द्वारा प्रकाशित http://pallavikelkar.wordpress.com/2009/07/19/taking-software-specifications-tips-for-you/ या लेखाचे भाषांतर असून,http://pallavikelkar.wordpress.com च्या माध्यमातून घेतले आहे. याचे मराठी भाषांतर पल्लवी केळकर यांनीच केले आहे.

मी personally, Software Specifications घेण्याच्या प्रक्रियेत involve आहे. हे अतिशय कौशल्यपूर्ण व आव्हानात्मक काम आहे, असं मला वाटतं. Specification ची Software Development मधे अतिशय महत्वाची भूमिका आहे. तुम्हाला जेवढा त्याचा अनुभव येईल, तेवढी तुमची mastery होईल. आपण जर त्या घेताना चूक केली, तर आपल्याला ब‌र्‍याच changes मधून जावे लागते.
मला उपयुक्त वाटणारे काही मुद्दे मी reference साठी देत आहे.
१. काळजीपुर्वक ऐका: ऐकणं हेही एक कौशल्य आहे. client नक्की कशाबद्दल बोलतोय याची स्पष्ट कल्पना तुम्हाला यायलाच हवी. Client नेहमीच त्याची संकल्पना मांडण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला ती तंतोतंत पकडता आली पाहिजे. जर तुम्ही त्याचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकत असाल, तुमचं त्याच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष असेल, तर तुम्ही आणि client एकाच track वर राहाल. नाहीतर client काहीतरी वेगळंच बोलतोयं, तुम्ही वेगळंच समजलात तर नंतर त्याचा खूप त्रास होऊ शकतो.

२. जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा parallel thinking करु नका: आपण जेव्हा कुठलीही गोष्ट ऐकत असतो तेव्हा दुस‌र्‍या गोष्टींशी त्याचा संदर्भ लावत असतो. उदा. जर आपण एखद्या software च्या संकल्पनेबद्दल ऐकत असू, तर त्याचा संदर्भ दुस‌र्‍या कुठल्यातरी software शी, जे आपण पाहिले आहे किंवा वाचले आहे, त्याच्याशी लावू पाहातो. असे parallel विचार जर चालू राहिले तर, काही मुद्दे वगळले जाण्याची शक्यता असते. असा विचार आपण नंतरही करू शकतो. हे parallel विचार करणं, मूळ संकल्पनेबद्दल खूप confusion आणि गैरसमज निर्माण करू शकतं.

३. Client ची व्यावसायीक पार्श्वभूमी(Professional Background) consider करा: Client ची व्यावसायीक पार्श्वभूमी जसं की field ( commerce/ management इ.), job profile वगैरे, माहिती करून घेणं फार महत्वाचं आहे. Client जे शब्दप्रयोग करतात, ते समजून घ्यायला तुम्हाला याची मदत होईल. उदा. जर ते commerce background चे असतील, तर तुम्हाला दिसेल की, ते बरीचशी उदाहरणं accounts मधील देतील. जर तुम्हाला तुमची संकल्पना मांडायची असेल तर तशाच प्रकारची उदाहरणं तुम्ही त्यांना देउ शकता, त्यामुळे त्यांना जास्त चांगल्या प्रकारे व लवकर समजेल.

४. प्रश्न विचारा: बोलण्याच्या दरम्यान जर तुम्हाला असं वाटलं की कुठलीतरी link, logic अनुसार वगळली जातीये किंवा कुठलातरी भाग तुम्हाला समजला नाहीये तर तिथे प्रश्न विचारा. यामुळे doubts स्पष्ट होतात आणि idea जास्त चांगली समजते. जर तुम्ही प्रश्न विचारलेत तर आपसूकच त्याविषयीची विस्तृत माहिती तुम्हाला मिळेल.

५. Analyze [Input- Process- output]: प्रत्येक software चे हेच structure आहे. तुम्हाला जर एकूण Input ची संख्या, कोणत्या process होतात आणि अपेक्षित output काय आहे, याची कल्पना आली, तर software specification चा सर्व भाग पूर्ण झाला.
प्रत्येक process व Logic चा या format मधे विचार करा. Missing links असतील तर त्या तुम्ही पकडू शकाल.

६.  पडताळणी करा (Verify): तुम्हाला  ज्या काही software requirements समजल्या आहेत, त्याची client बरोबर पडताळणी (verification)  करून घ्या. त्यामुळे तुम्हाला आणि client ला, काय समजले आहे याची स्पष्ट कल्पना येईल.

७. Key points ची नोंद करा: ऐकत असताना महत्वाचे मुद्दे तुमच्या भाषेत लिहून ठेवा. पुढील संदर्भासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. कालांतराने काही मुद्दे miss होऊ शकतात, त्यावेळी हे तुम्हाला नक्की उपयोगी पडेल.

८. Technical शब्द टाळा: तुम्ही ज्यांच्याशी बोलताय त्यापैकी अनेक लोक non-technical असतील. जड जड technical शब्द वापरू नका, जे त्यांना समजायला अवघड जातील. ही गोष्ट त्यांच्यासाठी अडथळा ठरू शकते आणि communication मधे disturbance ठरू शकते. अगदी सोपी आणि सहज समजणारी भाषा वापरा.

९. जे process मधे involve आहेत, त्यांच्याशी बोला : अनेकदा ज्या माणसाकडून तुम्ही specification घेता, तो actual process मधे involve नसतो. जे involve असतात, त्यांच्याशी बोला, काम करताना येणा‍‍र्‍या practical issues बद्दल, ते तुम्हाला जास्त चांगलं मार्गदर्शन करतील. त्याची खूप मदत होते.
उदा. जर तुम्ही Inventory System ची specification घेत असाल, तर stock department चा head तुम्हाला process बद्दल व real time issues बद्दल चांगली माहिती देईल.

१०. Add your own value: सर्व शक्य solutions आणि अधिक ideas आणि सूचना, तुमच्याकडून add कशा करता येतील यावर विचार करा. हे नक्की value add करेल आणि client नक्की खूष होईल.

सदर post, पल्लवी केळकर द्वारा प्रकाशित http://pallavikelkar.wordpress.com/2009/07/19/taking-software-specifications-tips-for-you/ या लेखाचे भाषांतर असून,http://pallavikelkar.wordpress.com च्या माध्यमातून घेतले आहे. याचे मराठी भाषांतर पल्लवी केळकर यांनीच केले आहे.