टेक मराठी कार्यशाळा जुलै २०१२

टेकमराठीतर्फे Microsoft Office  या विषयावर दि. २९ जुलै रोजी सकाळी ९ ते ४ या वेळात कार्यशाळा
आयोजित केली आहे.  त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही विनंती.
ही कार्यशाळा विनामुल्य आहे परंतु त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा.
संपर्कासाठी क्रमांक -९७६६२७८०८०

  • विषय: ऑफिस

वक्ते: श्री. किरण कर्णिक

कधी : दि. २९-०७-२०१२

वेळ: सकाळी ९:०० ते ४:००

स्थळ: Symbiosis Institute Of Comp. Studies & Research(SICSR), अतुर सेंटर, गोखले क्रॉस रोड, मॉडेल कॉलनी, पुणे.

Google Map: http://bit.ly/93USLP

आपण सर्वांनी या सभेला अवश्य उपस्थित रहावं.

**ही सभा सर्वांसाठी विनामूल्य आहे.

‘युनिकोड मराठी’ कार्यशाळा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि मराठी अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१०
जुलै २०१० रोजी १० ते २ या वेळेस `युनिकोड मराठीकार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.

मराठी अभ्यास केंद्राच्या प्रयत्नांमुळे शासकीय आस्थापनांमध्ये युनिकोडचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र अजूनही युनिकोड प्रणाली  आणि इन्स्क्रिप्ट कळफलक यांचा वापर करून मराठीतून काम कसे करावे, मराठीतून मेल व इंटरनेट यांचा वापर कसा करावा याबदद्ल पुरेशी जागती झालेली दिसत नाही .यादृष्टीने मराठी अभ्यास केंद्राच्या संगणकीय मराठी व माहिती तंत्रज्ञान या गटाने जनजागरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून युनिकोडचा वापर करून सर्व संगणक प्रणाल्यांमधून मराठीतून कसे काम करता येईल याची महिती देणारी एक पुस्तिका मराठी अभ्यास केंद्राने प्रकाशित केली असून ती अवघ्या ५रु.मध्ये सर्वांना उपलब्ध आहे.

या उपक्रमाचा पुढचा भाग म्हणून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि मराठी अभ्यास केंद्र या दोन संस्थांनी युनिकोड मराठीच्या कार्यशाळांची मालिका करण्याचे ठरविले आहे.वर्ड,एक्सेल ,पॉवरपॉईंट , मध्ये मराठीतून काम करणे, मराठीतून ईमेल करणे,इंटरनेटवर गुगल व इतर यंत्रणांचा वापर करून माहिती शोधणे अशा अनेक बाबींचे प्रात्यक्षिक या कार्यशाळेत दिले जाणार आहे. या कार्यशाळेचे प्रवेश शुल्क ५०रु आहे. अधिक माहितीसाठी राममोहन खानापूरकर (९८२००४००६६) किंवा सुरेश पाटील(९८९२२१९५८३) यांच्याशी संपर्क साधावा.

आपले,

दत्ता बाळसराफ, दीपक पवार

संयोजक   नवमहाराष्ट्र युवा अभियान (अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र)

९८९२७१३०४९/ ९८२०४३७६६५

स्थळ: जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयाजवळ, नरिमन पॉईंट, मुंबई, ४०००२१